Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रामराज्य म्हणजे काय? त्याग, कर्तव्य आणि आदर्श राज्यकारभाराची कथा, जाणून घ्या

भारतीय संस्कृतीत श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून गौरवण्यात आले आहे. मर्यादा म्हणजे नियम, मूल्ये आणि आचारसंहिता, तर पुरुषोत्तम म्हणजे सर्वोत्तम पुरुष.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 25, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • रामराज्य म्हणजे काय
  • राज्यकारभाराची कथा काय आहे
  • त्याग, कर्तव्य आणि आदर्श राज्यकारभाराची कथा
 

कल्पिनेतून असे व्यक्तिमत्त्व निर्माण होणार नाही, असे श्रीरामाचे जीवन होते. पित्याच्या अज्ञाचे पालन करून अयोध्येचे राज्य सोडून वनवास स्वीकारला. कुठे वसुंधरेचे राज्य आणि कुठे वनवास पण रामाला राजगादीचा कुठलाही मोह निर्माण झाला नाही. आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श मित्र आणि आदर्श राजा म्हणून ज्यांच्या आजही प्रेरणादायी म्हणून पाहिले जाते तो म्हणजे मर्यादापुरुषोत्तम राम. आपल्या मर्यादा त्यांनी कधीच ओलांडल्या नाही.‌ जिथे जिथे त्यागाचा विषय आला तिथे राम पुढे होता आणि भोगात मागे होता.

वंदे वाल्मिकी कोकीळ

वाल्मिकींनी रामायण महाकाव्य लिहिताना त्यात स्पष्टपणे सांगितले की, मी लोकसंग्रहासाठी हे काव्य लिहीत नाही. राम देवाचाच आवतार आहे, हे त्यांनी इतर ठिकाणी हजारो वेळा सांगितले असेल. पण काव्यात मात्र राम हा सामान्य माणूस होता.‌ आणि त्याने आपल्या आदर्श गुणांमुळे देवत्व प्राप्त केलं आहे.. वाल्मिकी रामायणात कुठेही देव म्हणून चरित्र वाल्मिकींनी रेखाटले नाही.

रामायण या महाकाव्यात श्रीरामांचे संपूर्ण जीवन वर्णन केले आहे. अयोध्येचे राजा दशरथ यांचे ज्येष्ठ पुत्र असलेले श्रीराम बालपणापासूनच गुणी, नम्र आणि कर्तव्यदक्ष होते. वडिलांच्या एका वचनासाठी त्यांनी १४ वर्षांचा वनवास स्वीकारला ही त्यांच्या आदर्श पुत्रत्वाची सर्वोच्च उदाहरण आहे.

वनवासातही त्यांनी धर्माचा मार्ग सोडला नाही. भाऊ लक्ष्मण यांच्याशी असलेले त्यांचे प्रेम, तसेच सीता यांच्यावरील निष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे पैलू आहेत. रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर श्रीरामांनी अन्यायाविरुद्ध उभे राहत त्याच्याशी युद्ध केले आणि अधर्माचा नाश केला.

Ram Navami: विविध देशांत रामकथा कशा प्रसिद्ध आहेत? जाणून घ्या इतिहास

श्रीराम हे केवळ आदर्श पती आणि भाऊ नव्हते, तर एक उत्तम राजादेखील होते. अयोध्येत परतल्यानंतर त्यांनी न्याय, समता आणि प्रजेसाठी कल्याणकारी असे राज्यकारभार केला, ज्याला “रामराज्य” असे म्हटले जाते. त्यांच्या राज्यात प्रजेवर अन्याय होत नव्हता आणि सर्वजण सुखी होते.

Kendra Drishti Yog: सूर्य-गुरू तयार करणार केंद्र दृष्टी योग, या राशींच्या लोकांच्या बॅंक बॅलन्समध्ये होणार मोठी वाढ

श्रीरामांचे जीवन आपल्याला अनेक मौल्यवान शिकवणी देते सत्याचा मार्ग कधीही सोडू नये, कर्तव्याला सर्वोच्च मान द्यावा आणि नात्यांमध्ये प्रेम व विश्वास टिकवावा. आजच्या काळातही त्यांच्या आदर्शांचे महत्त्व तितकेच आहे.

रावणाविरुद्ध युद्ध — धर्माची स्थापना

वनवासाच्या काळात लंकेचा राजा रावण याने सीतेचे अपहरण केले. ही घटना श्रीरामांच्या जीवनातील निर्णायक वळण ठरली. त्यांनी अन्याय आणि अधर्माविरुद्ध उभे राहत रावणाशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला.

या युद्धात हनुमान आणि सुग्रीव यांसारख्या मित्रांनी त्यांना साथ दिली. शेवटी श्रीरामांनी रावणाचा पराभव करून धर्माची स्थापना केली. या विजयाचा सण म्हणजेच दिवाळी म्हणून साजरा केला जातो.

रामराज्य — आदर्श शासनाची संकल्पना

वनवास पूर्ण करून अयोध्येत परतल्यानंतर श्रीरामांनी राज्यकारभार स्वीकारला. त्यांच्या राज्यात न्याय, समता आणि प्रजेसाठी कल्याण यांना सर्वोच्च स्थान होते. “रामराज्य” ही संकल्पना आजही आदर्श शासनाचे प्रतीक मानली जाते.

त्यांच्या राज्यात कोणावरही अन्याय होत नव्हता. प्रत्येक व्यक्ती सुखी आणि समाधानी होती. राजा म्हणून त्यांनी स्वतःच्या सुखापेक्षा प्रजेच्या कल्याणाला अधिक महत्त्व दिले.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: रामराज्य म्हणजे काय?

    Ans: श्रीराम यांच्या राज्यकालातील आदर्श शासनपद्धतीला “रामराज्य” म्हणतात. या राज्यात न्याय, समता आणि प्रजेसाठी कल्याण यांना सर्वोच्च महत्त्व दिले गेले होते.

  • Que: रामराज्याचे मुख्य वैशिष्ट्य काय होते?

    Ans: सर्वांसाठी समान न्याय, प्रजेचे सुख आणि सुरक्षितता, धर्म आणि नैतिकतेवर आधारित निर्णय, कोणावरही अन्याय किंवा भेदभाव नव्हता

  • Que: रामराज्य आदर्श का मानले जाते?

    Ans: कारण श्रीराम यांनी स्वतःच्या सुखापेक्षा प्रजेच्या कल्याणाला अधिक महत्त्व दिले. त्यांनी नेहमी धर्म आणि सत्याचा मार्ग स्वीकारला.

Web Title: What is ram rajya what is the story of rajya darbara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • ram navami

संबंधित बातम्या

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
1

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
2

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
3

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.