Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chamundeshwari Devi: चामुंडेश्वरी देवीचा काय आहे महिमा आणि तिची पौराणिक कथा जाणून घ्या

चामुंडेश्वरी देवी ही आदिशक्तीचे उग्र, पराक्रमी आणि भक्तवत्सल स्वरूप मानली जाते. चंड-मुंड आणि महिषासुर यांसारख्या असुरांचा संहार करून धर्माचे रक्षण करणाऱ्या या देवीची भारतभर मोठ्या श्रद्धेने पूजा केली जाते. कर्नाटकातील म्हैसूरच्या चामुंडी टेकडीवरील चामुंडेश्वरी मंदिराविषयी पौराणिक कथा जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 03, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • कर्नाटकमधील म्हैसूर येथील प्रसिद्ध मंदिर
  • चामुंडेश्वरी देवीचा काय आहे महिमा
  • चामुंडेश्वरी देवीची काय आहे पौराणिक कथा
 

दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील म्हैसूर (मैसूर) शहराजवळील चामुंडी टेकडीवर वसलेले श्री चामुंडेश्वरी देवीचे मंदिर हे देशातील प्रसिद्ध शक्तिस्थळांपैकी एक मानले जाते. देवी दुर्गेचे उग्र आणि शक्तिशाली स्वरूप असलेल्या चामुंडेश्वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक येथे येतात. देवीने महिषासुराचा वध करून धर्माचे रक्षण केले, अशी पौराणिक श्रद्धा आहे. जाणून घेऊया या मंदिराची पौराणिक कथा

देवीने चंड आणि मुंड या असुरांचा वध केल्यामुळे तिला ‘चामुंडा’ हे नाव प्राप्त झाले

चामुंडेश्वरी देवी ही आदिशक्तीचं अत्यंत उग्र आणि शक्तिशाली रुप मानलं जातं. देवीच्या दुर्गेच्या भाव शक्तीपैकी एक असलेल्या चामुंडेश्वरी देवीची पूजा भारतातील अनेक भागांमध्ये केली जाते. विशेषतः कर्नाटकातील म्हैसूरच्या चामुंडी टेकडीवरील चामुंडेश्वरी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. देवीने चंड आणि मुंड या दोन असुरांचा वध केला त्यामुळे तिला चामुंडा असं नाव मिळालं. यापुढे तिच पूजनीय रुप चामुंडेश्वरी म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

Satai Devi: कोकणातील हजारो कुटुंबांची कुलदेवता, जाणून घ्या मंदिराचा इतिहास आणि महिमा

चामुंडेश्वरी देवीची पौराणिक कथा

यामागील पौराणिक कथा अशी की, देवी माहात्म्याचा शुंभ निशुंभ या असुराच्या संज्ञात चंड आणि मुंड हे बलवान सेनापती होते. युद्धादरम्यान देवीच्या क्रोधातून एक उग्र शक्ती प्रकट झाली. तिने चंड आणि मुंड यांचा वध करून त्यांची मत्सके देवीसमोर अर्पण केली. तेव्हा देवीने तिला चामुंडा असं नाव दिलं. यानंतर देवीने महिषासुराचाही पराभव केला म्हणूनच म्हैसूर परिसरात चामुंडेश्वरीला महिषासूरमर्दिनी म्हणूनही विशेष मान आहे. चामुंडेश्वरी देवीचा रंग गडद असून तिच्या हातामध्ये त्रिशूळ, तलवार, डमरू, खड्ग, ढाल, पाश इत्यादी आयुध आहेत. गळ्यात गंधमाळा आहेत. सिंह हे देवीचे वाहन आहे. उग्र रुप असले तरी भक्तांवर कृपा करणारी आणि रक्षण करणारी ही मातृशक्ती आहे. भय, संकट आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळावे म्हणून तिची उपासना केली जाते. शत्रूंचा पराभव, धैर्य, आत्मविश्वास आणि मानसिक बळ मिळाव म्हणून देवीची आराधना करतात. तांत्रिक साधना आणि शक्ती उपासनेतही चामुंडेश्वरीला विशेष स्थान आहे.

चामुंडेश्वर देवीचे सर्वांत प्रसिद्ध मंदिर

चामुंडेश्वर देवीचे सर्वांत प्रसिद्ध मंदिर चांमुडेश्वर हिल्स हे म्हैसूर येथील असलेलं चामुंडेश्वर मंदिर हे सुमारे एक हजार उंच टेकडीवर आहे. येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः दसरा उत्सवात या मंदिराचं धार्मिक महत्त्व अधिक वाढतं.

Sateri Devi Temple: संपूर्ण कोकणात आषाढात भरते सातेरी देवीची यात्रा; जाणून घ्या 700 वर्षे जुन्या मंदिराचा इतिहास

विविध ठिकाणांतील देवीचे मंदिर

मुंबईतील भायखळा परिसरात चामुंडाय देवीचं एक जुनं मंदिर आहे. दक्षिण भारतीय आणि मराठी भाविक येथे मोठ्या श्रद्धेनं दर्शनासाठी येतात. तर मुंबईतल्या दहिसर पूर्व येथे शनि आणि चामु्ंडाय देवी यांचे एक संयुक्त मंदिर आहे. मंगळवार, शुक्रवार आणि नवरात्रात येथे भक्तांची फार मोठी गर्दी असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही चामुंडेश्वरी देवीचे एक प्रसिद्ध स्थान आहे. कोकणातील ग्रामदैवतांपैकी हे एक भक्ताचं श्रद्धास्थान मानलं जातं. येथे वार्षिक यात्रा आणि धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे चौंडेश्वरी देवीचे मंदिर आहे. सांगली परंपरेत चौंडेश्वरी हे चामुंडेश्वरीचं एक रुप मानलं जातं आणि देवीला ग्रामसंरक्षिका म्हणून पूजल जातं. मंगळवार, शुक्रवार आणि नवरात्र हे देवीच्या उपासनेसाठी विशेष दिवस मानले जातात. लाल फूल, कुंकू, हळद, नारळ आणि फळांचा नैवेद्य या देवीला अर्पण केला जातो. देवीच्या कृपेसाठी दुर्गासप्तशतीमधील ‘देवी कवच’ आणि ‘अर्गला स्तोत्र’ आणि चामुंडा स्तोत्राचे पठण केले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: चामुंडेश्वरी देवी कोण आहे?

    Ans: चामुंडेश्वरी देवी ही आदिशक्ती दुर्गेचे उग्र आणि पराक्रमी स्वरूप मानले जाते. तिने चंड, मुंड आणि महिषासुर या असुरांचा संहार करून धर्माचे रक्षण केल्याची पौराणिक कथा प्रसिद्ध आहे.

  • Que: देवीला 'चामुंडेश्वरी' हे नाव कसे मिळाले?

    Ans: देवीने चंड आणि मुंड या दोन असुरांचा वध केल्यानंतर तिला 'चामुंडा' हे नाव प्राप्त झाले. पुढे भक्तांमध्ये ती चामुंडेश्वरी या नावाने पूजली जाऊ लागली.

  • Que: चामुंडेश्वरी देवीच्या हातात कोणती आयुधे असतात?

    Ans: देवीच्या विविध हातांमध्ये त्रिशूळ, खड्ग (तलवार), ढाल, पाश, डमरू आणि इतर दैवी आयुधे असतात. ही आयुधे शक्ती, संरक्षण आणि दुष्टांचा नाश यांचे प्रतीक मानली जातात.

Web Title: What is the glory and mythology of goddess chamundeshwari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Matru Navami Shraddha 2026: उद्या मातृनवमी! महिलांच्या श्राद्धासाठी हा दिवस इतका खास का? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
1

Matru Navami Shraddha 2026: उद्या मातृनवमी! महिलांच्या श्राद्धासाठी हा दिवस इतका खास का? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Shani Dev Puja Rules: शनिदेवांच्या पत्नीचा ‘हा’ श्राप नेमका काय? घरी पूजा करण्याआधी जाणून घ्या धार्मिक मान्यता
2

Shani Dev Puja Rules: शनिदेवांच्या पत्नीचा ‘हा’ श्राप नेमका काय? घरी पूजा करण्याआधी जाणून घ्या धार्मिक मान्यता

Pitru Paksha 2026: मृत्यूनंतर नाही, तर जिवंतपणीच पिंडदान! ‘या’ मंदिरातील ३ दिवसांची परंपरा नेमकी काय?
3

Pitru Paksha 2026: मृत्यूनंतर नाही, तर जिवंतपणीच पिंडदान! ‘या’ मंदिरातील ३ दिवसांची परंपरा नेमकी काय?

Venus retrograde: ३ ऑक्टोबरपासून शुक्र होणार वक्री, या राशींच्या जीवनात घडून येणार सकारात्मक बदल
4

Venus retrograde: ३ ऑक्टोबरपासून शुक्र होणार वक्री, या राशींच्या जीवनात घडून येणार सकारात्मक बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.