Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pitru Paksha 2026: मृत्यूनंतर नाही, तर जिवंतपणीच पिंडदान! ‘या’ मंदिरातील ३ दिवसांची परंपरा नेमकी काय?

Pitru Paksha 2026: पितृपक्षात पूर्वजांच्या शांतीसाठी श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. या मंदिरात जिवंत व्यक्ती स्वतःचे पिंडदान करू शकते. या विधीला ‘आत्म पिंडदान’ किंवा ‘आत्म श्राद्ध’ म्हटले जाते.संतती नाही किंवा मृत्यूनंतर श्राद्ध करणारा वारस नाही, तसेच संन्यासी व्यक्ती हा विधी करतात.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 03, 2026 | 10:46 AM
Pitru Paksha 2026: (फोटो- सोशलमीडिया)

Pitru Paksha 2026: (फोटो- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गया येथील जनार्दन मंदिरात जिवंतपणी स्वतःचे पिंडदान करण्याची परंपरा आहे.
  • ‘आत्म श्राद्ध’ विधी तीन दिवस चालतो; तिसऱ्या दिवशी तीन पिंड अर्पण केले जातात.
  • दही-तांदळाच्या पिंडात तिळाचा वापर केला जात नाही,
 

Pitru Paksha 2026: आपण नेहमी एकतो की माणूस मरणपावल्यावर त्याचं श्राद्ध, पिंडदान केले जाते. पितृपक्षाचा पंधरवडा सुरु आहे. आपल्या पूर्वजनांना शांती मिळावे, त्यांच्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून पितृपक्षात त्यांना तर्पण करतो. पण तुम्हाला माहिती आहे का? भारतात असे एक मंदिर आहे तिथे जीवंत माणूस माणूस स्वतःच स्वतःचं पिंडदान करू शकतो. हे ऐकायला थोडं विचित्र वाटवले मात्र ते तितकच खरं आहे. कोणतं मंदिर आहे जाणून घेऊया…

बिहारमधील गया शहरात ही परंपरा हजारो वर्षापासून सुरु आहे. गया हे शहर पितरांची नगरी येथील प्रसिद्ध मंदिर म्हणून ओळखले जाते. वेद-पुराणात सुद्धा मंदिरांचे महत्त्व सांगितले आहे. देश-विदेशातून लाखो लोक इथे पूर्वजांचं पिंडदान करण्यासाठी येतात. याच गया शहरात जनार्दन मंदिर ते भस्मकूट पर्वतावर आहे. माता मंगलागौरी मंदिराच्या अगदी उत्तरेला हे मंदिर असून हे भगवान विष्णूच्या रूपाला समर्पित केले. गया मधील 54 पिंडवेदींपैकी ही एक महत्वाची वेदी मानली जाते. इथेच जिवंत व्यक्ती स्वतःसाठी पिंडदान करते. याला ‘आत्म पिंडदान’ किंवा ‘आत्म श्राद्ध’ म्हणतात. भारतात असं एकमेव ठिकाण आहे जिथे जिवंतपणी स्वतःचं पिंडदान करता येतं.

जिवंतपणी पिंडदान का करतात?

आता प्रश्न पडेल की जिवंतपणी स्वतःचं पिंडदान का करायचं?यामागे एक मोठं कारण आहे. ज्या लोकांना मूल-बाळ नाही, ज्यांच्या मागे श्राद्ध करायला कोणी वारस नाही, असे लोक इथे येऊन स्वतःच स्वतःचं पिंडदान करतात. जेणेकरून मेल्यावर त्यांच्या आत्म्याला भटकावं लागू नये आणि मोक्ष मिळावा. त्याचबरोबर जे लोक संन्यासी आहेत, ज्यांनी संसार सोडला आहे, ते पण इथे आत्म पिंडदान करतात. काही लोकांना वाटतं की आपण जिवंत असतानाच आपल्या आत्म्याच्या मुक्तीसाठी हा विधी करावा, म्हणून ते श्रद्धेने इथे येतात.

Venus retrograde: ३ ऑक्टोबरपासून शुक्र होणार वक्री, या राशींच्या जीवनात घडून येणार सकारात्मक बदल

तीन दिवस चालतो हा विधी, तिळाचा वापर नाही

हा काही एका तासाचा विधी नाही. इथे आत्म श्राद्धाची प्रक्रिया तब्बल तीन दिवस चालते.वायु पुराणानुसार, गया येथे भगवान जनार्दन स्वतः पितृ रूपात आहेत. त्यांचं फक्त दर्शन घेतलं तरी तीन ऋणातून मुक्ती मिळते. त्यामुळे इथे केलेलं श्राद्ध हे थेट विष्णू पूजेइतकं पवित्र मानलं जातं.

  • पहिल्या दिवशी संकल्प केला जातो.
  • दुसऱ्या दिवशी प्रायश्चित्त, तप, जप, मंत्रोच्चार आणि पूजा होते.
  • तिसऱ्या दिवशी पिंड अर्पण केला जातो.
या विधीत वायु पुराणातले आत्म श्राद्धाचे श्लोक म्हटले जातात. नंतर दही आणि तांदळापासून तीन पिंड बनवले जातात. महत्वाची गोष्ट म्हणजे या पिंडात तिळाचा वापर केला जात नाही. सामान्य श्राद्धात तीळ वापरतात पण आत्म पिंडदानात तीळ वापरत नाहीत.

हे तीन पिंड भगवान जनार्दनाच्या उजव्या हातावर अर्पण केले जातात.यामागची श्रद्धा काय आहे?असं मानलं जातं की व्यक्ती जिवंतपणी जे पिंडदान करते, ते भगवान जनार्दन स्वतः सांभाळून ठेवतात. आणि जेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा भगवान जनार्दन स्वतः ते पिंड विष्णुपद येथे अर्पण करतात. त्यामुळे त्या व्यक्तीच्या आत्म्याला थेट विष्णुलोकात जागा मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो.

Pitru Paksha 2026: सवाष्ण महिलेचे ‘भरणी श्राद्ध’ करावे का? धार्मिक परंपरेत वेगवेगळी मते

जनार्दन हे भगवान विष्णूचंच एक नाव आहे. विष्णूचं धाम हे मुक्तीधाम आहे. त्यांच्या चरणी गेलेल्या आत्म्याला मोक्ष मिळतो, अशी आपली मान्यता आहे. गया नगरीचा संबंध गयासुर नावाच्या राक्षसाच्या कथेशी पण जोडला आहे.म्हणूनच दरवर्षी पितृपक्षात, जो भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून ते सर्वपित्री अमावस्येपर्यंत असतो, तेव्हा या मंदिरात आत्म पिंडदान करण्यासाठी खूप गर्दी होते. हजारो वर्षांपासून चालत आलेली ही अनोखी परंपरा आजही त्याच श्रद्धेने पाळली जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Pitru paksha 2026 gaya janardan temple self pind daan rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • hindu religion
  • Pitrupaksha
  • Religion
  • religion news

संबंधित बातम्या

Navratri 2026: १०० वर्षांनंतर नवरात्रीत तयार होणार गजकेसरी योग; या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
1

Navratri 2026: १०० वर्षांनंतर नवरात्रीत तयार होणार गजकेसरी योग; या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

jitiya vrat: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी पाळले जाते जितिया व्रत, जाणून घ्या मुहूर्त पूजा पद्धत, साहित्य
2

jitiya vrat: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी पाळले जाते जितिया व्रत, जाणून घ्या मुहूर्त पूजा पद्धत, साहित्य

Pitru Paksha: श्राद्धाच्या ताटात भोपळ्याची भाजी का असते? जाणून घ्या पितृपक्षातील धार्मिक श्रद्धा आणि परंपरा
3

Pitru Paksha: श्राद्धाच्या ताटात भोपळ्याची भाजी का असते? जाणून घ्या पितृपक्षातील धार्मिक श्रद्धा आणि परंपरा

Shakambari Devi: प्रभादेवीतील शाकंबरी देवीचा काय आहे इतिहास आणि देवीची कथा जाणून घेऊया
4

Shakambari Devi: प्रभादेवीतील शाकंबरी देवीचा काय आहे इतिहास आणि देवीची कथा जाणून घेऊया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.