Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Varadahasta Patnadevi: खानदेशातील प्रमुख शक्तिपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरदहस्त पाटणादेवीचा महिमा जाणून घ्या

खानदेशाची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंडिकादेवीचे हे प्राचीन मंदिर ‘वरदहस्त शक्तीपीठ’ म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर यादवकालीन इतिहास, हेमाडपंती स्थापत्य आणि निसर्गसौंदर्यामुळे पाटणादेवीला धार्मिक तसेच पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 21, 2026 | 10:21 AM
फोटो सौजन्य- gemini.

फोटो सौजन्य- gemini.

Follow Us
Follow Us:
  • खानदेशातील प्रमुख शक्तिपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरदहस्त पाटणादेवीचा महिमा
  • खानदेशाची कुलस्वामी म्हणून चंडिका देवीची ओळख
  • डोंगरी नदीच्या काठी आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले मंदिर
 

पाटणादेवी हे खानदेशातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक मानले जाते. डोंगरी नदीच्या काठी आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या या परिसरात हिरव्यागार डोंगररांगा, धबधबे आणि वनसंपदा पाहायला मिळते. चंडिका देवी कोण आहे आणि तिचा महिमा जाणून घेऊया

चंडिकादेवी खानदेशाची कुलस्वामी असल्याची मान्यता

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगावपासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावरती गौताळा औट्रम घाट अभयारण्याच्या निसर्गरम्य परिसरात बसलेलं श्रीक्षेत्र पाटणादेवी हे खानदेशातील एक प्रमुख शक्तीपीठ मानलं जातं. येथे विराजमान असलेली चंडिकादेवी ही खानदेशाची कुलस्वामी मानली जाते.

डोंगरी नदीच्या काठी आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले मंदिर

हिरव्यागार डोंगररांगा, धबधबे, प्राचीन मंदिरे आणि समृद्ध इतिहास त्यामुळे हे ठिकाण धार्मिक तसेच पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. मंदिराजवळ असणाऱ्या अत्यंत प्राचीन दगडामुळे या देवीला पाटणादेवी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. हे मंदिर डोंगरी नदीच्या काठी आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी बसलेलं आहे. प्राचीन काळी पाटणा किंवा विजवलगड हा यादवकालीन महत्त्वाचा प्रांत होता. हे शहर व्यापार, कला, विद्या आणि धार्मिक केंद्र म्हणून प्रसिद्ध होतं. शहरात जलव्यवस्थेची उत्कृष्ट सोय धातूच्या खाणी आणि समृद्ध अशी वनसंपदा होती.

Vindhyavasini Temple: विंध्यवासिनी मंदिर का आहे लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र? जाणून घ्या पौराणिक इतिहास

मंदिराची रचना

यादवराजांच्या घरात इथे अनेक मंदिरे बांधण्यात आली. चंडिकादेवीचं मंदिरही त्याच काळातली मानलं जातं. मंदिराची रचना हेमांडपती शैलीची असून त्यातील दगडी कोरीव काम आजही पाहणाऱ्यांना थक्क करतं. मंदिर परिसर भारतीय पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली आहे. पाटणादेवी हे वरदहस्त शक्तीपीठ म्हणून ओळखलं जातं.

पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, दक्ष प्रजापतीच्या यज्ञात अपमान झाल्यामुळे सतीने आत्मदान केलं. त्यानंतर भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीच्या देहाचे तुकडे केले. ज्या ठिकाणी देवीचा उजवा हात अर्थातच वरदहस्त पडला तेथे हे शक्तीपीठ निर्माण झालं अस म्हटलं झालं.

Vagheshwari Devi: वाघेश्वरी देवीचा काय आहे महिमा आणि कथा जाणून घ्या

स्थानिक कथा

आजून एका स्थानिक कथेनुसार, गोविंदस्वामी नावाचे महान भक्त डोंगरावरील देवीची उपासना करत असतं. वृद्धापकाळामुळे त्यांना रोज डोंगर चढण कठीण झालं त्यांनी देवीला विनंती केली की ती त्यांच्या मागे खाली यावी, देवीनेही होकार दिला पण एक अट घातली मागे वळून पाहायचे नाही. गोविंदस्वामी चालत असताना त्यांच्या मनात शंका आली आणि त्यांनी मागे वळून पाहायलं त्याक्षणी देवी त्या ठिकाणी स्थिर झाली तेथे आजचं पाटणादेवी उभं असल्याची श्रद्धा आहे. देवीच्या मंदिरासमोर आजही गोविंदस्वामीची समाधी असल्याचं सांगितलं जातं. मंदिरातील देवीची मूर्ती सुमार नऊ फुट उंच आणि सुमारे अठरा हातांची आहे. देवी वाघावर आरुढ असून विविध आयुध धारण केली आहेत. चंड आणि मुंड या दैत्याचा वध केल्यामुळे देवीला चंडिका नाव असं प्राप्त झालं आहे. पाटणा देवीला अनेक जण सप्तशृंगी देवीची बहीण देखील मानतात. त्यामुळे नाशिकचा सप्तशृंगी गड आणि जळगावचा पाटणा देवी या दोन्ही शक्तींस्थानांमध्ये विशेष धार्मिक संबंध असल्याची श्रद्धा सुद्धा आढळते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाटणादेवी मंदिर कुठे आहे?

    Ans: पाटणादेवी मंदिर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावपासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर गौताळा औट्रम घाट अभयारण्याच्या परिसरात आहे.

  • Que: पाटणादेवीला वरदहस्त शक्तीपीठ का म्हणतात?

    Ans: पौराणिक मान्यतेनुसार सतीचा उजवा हात म्हणजेच वरदहस्त या ठिकाणी पडला. त्यामुळे पाटणादेवीला वरदहस्त शक्तीपीठ म्हटले जाते.

  • Que: पाटणादेवी मंदिर किती प्राचीन आहे?

    Ans: हे मंदिर यादवकालीन असल्याचे मानले जाते. मंदिराची वास्तुरचना हेमाडपंती शैलीशी संबंधित असून येथील दगडी कोरीव काम विशेष आकर्षण आहे.

Web Title: What is the glory of varadahasta patnadevi in khandesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 10:21 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Khandesh

संबंधित बातम्या

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Shani Transit: ९ ऑक्टोबरपासून शनि बदलणार आपली चाल, या राशींच्या लोकांच्या जीवनात होणार मोठे बदल
2

Shani Transit: ९ ऑक्टोबरपासून शनि बदलणार आपली चाल, या राशींच्या लोकांच्या जीवनात होणार मोठे बदल

Shani Sade Sati: शनीच्या साडेसातीदरम्यान सोन्याचे दागिने घालणे शुभ की अशुभ, काय सांगते ज्योतिषशास्त्र
3

Shani Sade Sati: शनीच्या साडेसातीदरम्यान सोन्याचे दागिने घालणे शुभ की अशुभ, काय सांगते ज्योतिषशास्त्र

Sarva Pitru Amavasya: देशभरात अशी साजरी होते सर्वपित्री अमावस्या; जाणून घेऊया पितृस्मरणाच्या वेगवेगळ्या परंपरा
4

Sarva Pitru Amavasya: देशभरात अशी साजरी होते सर्वपित्री अमावस्या; जाणून घेऊया पितृस्मरणाच्या वेगवेगळ्या परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.