फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मात शनिवारचा दिवस विशेषतः शनि देवाशी संबंधित मानला जातो. अनेकजण या दिवशी शनिच्या प्रभावामुळे येणाऱ्या अडचणींना घाबरतात आणि त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी विविध उपाय करतात. अशा वेळी भगवान हनुमान यांची पूजा करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. हनुमान हे शक्ती, बुद्धी आणि भक्तीचे प्रतीक आहेत. त्यांच्या नामस्मरणाने आत्मविश्वास वाढतो. हनुमान भक्तांसाठी शनिवारचा दिवस फारच महत्त्वाचा. या दिवशी आवर्जून लोक हनुमान मंदिरात जातात. त्याला तिळाचं तेल वाहतात. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का? शनिवारीच हनुमानाची पूजा का करतात, यामागे धार्मिक श्रद्धा आणि पौराणिक कथा आहे, जाणून घेऊया
एकदा शनिदेवाचा प्रभाव सर्वांवर पडत होता. शनिदेवांची दृष्टी एखाद्यावर पडणं कठीण मानलं जातं. जेव्हा शनि देव हनुमान यांच्यावरती प्रभाव टाकायला गेले तेव्हा हनुमानजींने त्यांना आपल्या शेपटीने बांधून ठेवले आणि खूप फिरवले. त्यामुळे शनिदेवाला खूप वेदना झाल्या त्यामुळे शनिदेवांनी माफी मागितली आणि वचन दिले जे कोणी हनुमानाची भक्ती करतील त्यांना मी त्रास देणार नाही. यामुळेच अशी श्रद्धा निर्माण झाली.
zodiac sign: इंद्र योगाचा वृश्चिक आणि मीन राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा
शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने शनिच्या वाईट प्रभावापासून म्हणजेच साडेसातीपासून आणि शनि दोषापासून संरक्षण मिळते. शनिवार हा दिवस शनि देव यांना समर्पित आहे आणि हनुमान हे बल, भक्ती आणि संकटातून वाचवणारे देव मानले जातात त्यामुळे या दिवशी हनुमानाची पूजा शनि दोष कमी करण्यास मदत करते. भीती आणि अडचणी दूर करण्यास मदत करते. याशिवाय शनिवारी हनुमानाची पूजा केल्यामुळे मानसिक शांती मिळते आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते.
शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करणे, हनुमानाला तेल आणि उडीद डाळ अर्पण करणे, मंदिरात जाऊन दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते. थोडक्यात सांगायचे तर शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने शनिदेवाचा त्रास कमी होतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते म्हणूनच ही परंपरा आजचही मोठ्या श्रद्धेने पाळली जाते.
ॐ हनुमते नमः,
श्री रामदूताय नमः,
हनुमान चालीसा पठण या मंत्रांचे पठण शनिवारी करणे खूप फायदेशीर मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: शनिवारी शनि देव यांचा दिवस मानला जातो. पौराणिक कथेनुसार, हनुमानांनी शनि देवांची सुटका केली होती, त्यामुळे शनि देवांनी वचन दिले की हनुमान भक्तांना ते त्रास देणार नाहीत.
Ans: शनि दोष कमी होतो, नकारात्मक ऊर्जा दूर होते, धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो, संकटांपासून संरक्षण मिळते
Ans: हनुमान यांनी शनि देव यांना रावण च्या कैदेतून मुक्त केले, त्यामुळे शनि देव हनुमान भक्तांवर कृपा करतात.






