Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tirupati Balaji Temple: तिरुपती बालाजी मंदिरात अखंड तेवतो ‘हा’ दिवा, काय आहे यामागील रहस्य जाणून घ्या

तिरुपती बालाजी मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत आणि श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या मंदिरांपैकी एक आहे. येथे दररोज लाखो भाविक श्री वेंकटेश्वर स्वामींच्या दर्शनासाठी येतात. या मंदिराशी संबंधित अनेक अद्भुत परंपरा आणि रहस्ये प्रसिद्ध आहेत.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 20, 2026 | 09:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • तिरुपती बालाजी मंदिरात अखंड तेवतो ‘हा’ दिवा
  • अखंड दिवा असण्यामागे काय आहे रहस्य
  • तिरुपती बालाजी मंदिराची काय आहेत वैशिष्ट्ये
 

आंध्र प्रदेशातील तिरुमला पर्वतावर वसलेले तिरुपती बालाजी मंदिर हे भगवान श्री वेंकटेश्वरांचे जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी कोट्यवधी भाविक येथे दर्शनासाठी येतात. या मंदिराशी संबंधित अनेक चमत्कार, परंपरा आणि लोकश्रद्धा प्रचलित आहेत. त्यापैकी एक म्हणजे मंदिरातील अखंड तेवत असलेला दिवा. या दिव्याबाबत भाविकांमध्ये प्रचंड श्रद्धा असून तो भगवान वेंकटेश्वरांच्या दिव्य उपस्थितीचे प्रतीक मानला जातो. तिरुपती बालाजी मंदिरात अखंड दिवा ठेवण्यामागे काय आहे रहस्य जाणून घ्या

वेंकटेश्वरांच्या कृपेचे दिव्य प्रतीक

श्री वेंकटेश्वर मंदिर अर्थातच श्री बालाजी तिरुपती मंदिरात अखंड दिवा आहे. या अखंड दिव्याबद्दल अनेक श्रद्धा आणि परंपरा प्रचलित आहे. लोकमान्यतेनुसार मंदिरातील अखंड ज्योती अनेक शतकांपासून तेवत आहे. या दिव्याला भगवान वेंकटेश्वरांच्या उपस्थितीचं आणि दैव्यी प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं.

Tirupati Temple Secrets: तिरूपती बालाजी मंदिराचे 5 मोठे रहस्य, देवाला का नेसवतात साडी-धोतर? वाचून व्हाल अवाक्

ज्ञान आणि प्रकाशाचे प्रतीक

अनेक भक्तांचा विश्वास असा आहे की, हा दिवा कधीही विझलेला नाही. मंदिराच्या परंपरेनुसार गर्भगृहात दोन प्रमुख अखंड दीप आहे. हे दीप भगवान बालाजींच्या सेवेशी निगडीत असून मंदिरातील धार्मिक प्रेमींचा मुख्य भाग आहे. तिरुमल्लामध्ये मुख्य मंदिरासमोर अखिलांडम नावाचे एक स्थान आहे. येथे मोठे दिवे दिवसरात्र प्रज्वलित ठेवले जातात. भक्त येथे कापूर अर्पण करतात आणि नारळ फोडून प्रार्थना सुद्धा करतात. अखंड दिवा, दैव्यी प्रकाश आणि ज्ञानाच प्रतीक मानला जातो.

दैवी कृपेची अखंड ज्योत

भगवान वेंकटेश्वरांच्या अखंड कृपेचं चिन्ह म्हणून त्याकडे पाहिलं जातं. लाखो भाविक या ज्योतीला नमस्कार सुद्धा करतात. हा दिवा नेमका कधी प्रज्वलित करण्यात आला याची निश्चिक माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे तो तिरुपती मंदिरातील अनेक गुढ आणि अनेक चमत्कारांपैकी एक मानला जातो. तिरुपती बालाजी मंदिरातील अखंड दिवा हा केवळ एक ज्योत नाही आहे तर केवळ शेकडो वर्षांपासून भक्तांच्या श्रद्धेचा आणि भगवान श्री वेंकटेश्वरांच्या अखंड कृपेचा प्रकाशमान प्रतीक आहे.

Sensitive Zodiac Sign: या राशींच्या व्यक्ती सहज दुखावल्या जातात; बाहेरून शांत, पण आतून अत्यंत संवेदनशील!

मंदिरातील इतर वैशिष्ट्ये

तिरुपती बालाजी मंदिर अनेक रहस्यांमुळे प्रसिद्ध आहे. भगवान वेंकटेश्वरांच्या मूर्तीवरील नैसर्गिक केस, मूर्तीचे नेहमी उबदार भासणारे स्वरूप, तसेच मंदिरातील काही प्राचीन परंपरा यांविषयी विविध लोकश्रद्धा प्रचलित आहेत. यामुळे या मंदिराचे धार्मिक महत्त्व अधिक वाढते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: तिरुपती बालाजी मंदिरातील अखंड दिवा म्हणजे काय?

    Ans: तिरुमलातील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात परंपरेनुसार अखंड दिवा तेवत ठेवला जातो. हा दिवा भगवान बालाजींच्या अखंड कृपेचे आणि सनातन श्रद्धेचे प्रतीक मानला जातो.

  • Que: या अखंड दिव्याबद्दल कोणती श्रद्धा प्रचलित आहे?

    Ans: भाविकांमध्ये अशी श्रद्धा आहे की हा दिवा अनेक शतकांपासून अखंड तेवत आहे. तो कधीही विझू नये यासाठी मंदिरातील पुजारी नियमितपणे त्याची देखभाल करतात.

  • Que: अखंड दिवा कोणत्या गोष्टीचे प्रतीक मानला जातो?

    Ans: हा दिवा ज्ञान, सकारात्मक ऊर्जा, समृद्धी, भक्ती आणि भगवान श्री वेंकटेश्वरांच्या अखंड कृपेचे प्रतीक मानला जातो.

Web Title: What is the secret behind the eternal lamp in tirupati balaji temple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Tirupati Balaji Temple

संबंधित बातम्या

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध
1

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
2

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
3

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
4

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.