Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shalivahan Shaka: शालिवाहन शकाची सुरुवात नेमकी कोणी केली? जाणून घ्या इतिहास

हिंदू कालगणनेत विक्रम संवत् आणि शालिवाहन शके या दोन कालगणना महत्त्वाच्या आहेत. इंग्रजी कॅलेंडर जरी आपल्या जीवनातील अविभाज्य भाग झाला असला तरी सुद्धा अनेक हिंदू सणवार हे या कालगणांनुसारच साजरे केले जातात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 18, 2026 | 01:01 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शालिवाहन शकाची सुरुवात नेमकी कोणी केली
  • शालिवाहन शक आणि शक सवंत म्हणजे काय
  • शालिवाहन शक आणि शक सवंतचा काय आहे इतिहास
 

 

ऐतिहासिकदृष्ट्या राजा शालिवाहनाने परकीय आक्रमकांवर (शक/हूण) मिळवलेल्या विजयाचे स्मरण आहे. हे इसवी सन ७८ मध्ये सुरू झाले असून वसंत ऋतूचे आगमन आणि नवचैतन्याचा उत्सव म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारून साजरा केला जातो. शालिवाहन शक आणि विक्रम संवत यांचा इतिहास नेमका काय आहे ते जाणून घेऊया

शालिवाहन शक साजरे करण्याची प्रमुख कारणे

ऐतिहासिक विजय

पौराणिक कथेनुसार, पैठणचा राजा शालिवाहन याने परकीय आक्रमकांचा पराभव करून दक्षिण भारतात सातवाहन साम्राज्य स्थापन केले आणि या विजयाच्या स्मरणार्थ हे शक सुरुवात झाली. यावेळी गुढीपाडवा हा शालिवाहन शकाचा पहिला दिवस आहे, जो महाराष्ट्रात नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो.

Falgun Amavasya 2026: पितृदोषातून मुक्ती देणारा दिवस, जाणून घ्या कथा आणि श्रद्धेचे महत्त्व

शालिवाहन शकची सुरुवात कशी झाली

शालिवाहनाने शकांवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून शालिवाहन शक ही नवीन कालगणना तत्कालीन मराठी मुलखात सुरू झाल्याचं म्हटलं जातं. दक्षिण भारतात ही कालगणना आजही वापरात आहे. पण हे शककर्ते राजे कोण होते? या कालगणनेविषयी आणि शककर्त्यांविषयी गेल्या काही वर्षांत आणखी एक मतप्रवाह पुढे आला आहे. शालिवाहन राजानं ही कालगणना सुरू केली नसून शकांनीच सुरू केल्याचं काही अभ्यासकांचं मत आहे.

ही कालगणना नेमकी कुणी सुरू केली?

हिंदू नववर्षाची आणि मराठी नववर्षाची सुरुवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. विक्रम संवत याच दिवशी सुरू झाले आणि शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. मराठी नववर्षाचा प्रारंभ हाच दिवस मानला जातो. पण ज्या शालिवाहनाच्या नावाने हे शक सुरू झाले त्याविषयी मात्र, आपल्याला फारशी माहिती नसते.

शालिवाहन हे शक सातवाहन राजांशी संबंधित आहे. सातवाहनांची राजधानी तत्कालीन प्रतिष्ठान आणि आताचे पैठण ही होती. या सातवाहन राजांनी दीर्घकाळ महाराष्ट्र व शेजारील प्रदेशावर राज्य केले. इसवी सनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करून सातवाहनांची या प्रदेशावरची सत्ता उखडून टाकली. त्यामुळे महाराष्ट्र आणि शेजारील प्रदेशावरील सातवाहनांचे वर्चस्व संपले आणि त्यांना दक्षिणेत जावे लागले.

Vastu Tips: घराचा रंग बदलल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते का? जाणून घ्या काय सांगते वास्तुशास्त्र

याच सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा 23 वा राजा अतिशय पराक्रमी होता. त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री असे होते. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावित असत. गौतमी ही सातकर्णीची आई होती. म्हणूनच त्याचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी असे होते. नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये तुंबळ लढाई झाली. यात शकांचा राजा नहपान हा मृत्युमुखी पडला. सातकर्णी विजयी झाला. त्याने या प्रदेशात पुन्हा एकदा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले.

सातकर्णी म्हणजे काय

नाशिकजवळ बौद्धलेणी आहेत. या लेण्यांमध्ये सातकर्णीविषयीची माहिती मिळते. सातकर्णी याचा उल्लेख येथील लेखांत वेदांचा व ब्राह्मणांचा आश्रयदाता असा केला आहे. सातकर्णी वैदिक धर्माचा पोषक असूनही तो अत्यंत धार्मिक व सहिष्णू होता. बौद्ध धर्माच्या बाबतीत तो अतिशय उदार होता. बौद्धांच्या तत्कालीन संघांना त्याने बरीच मदतही केली होती. मुंबईजवळील कार्ले येथी बौद्ध संघालाही त्याने करजक नावाचे गाव दिले होते.

शकांचे दमन करणारा शालिवाहन (सातवाहन) गौतमीपुत्र सातकर्णी असा त्याचा उल्लेख सापडतो. त्यामुळे शालिवाहन शकाचा प्रारंभ त्याच्या जीवनकाळात झाला. त्याचा कार्यकाळ इसवी सन १०६-१३० असा मानला जातो. इसवी सन ७८ पासून हे शालिवाहन शक सुरू झाले. पण गौतमीपुत्र सातकर्णीच्या शासनकाळाशी ही तिथी जुळत नाही. त्यामुळे त्याच्या जन्मापासून हे संवत सुरू झाल्याचे मानले जाते.

शक संवत

शंक संवताचा आरंभ ३ मार्च ७८ रोजी झाला. सम्राट कनिष्काने हे संवत सुरू केले. या दिवशी तो सिंहासनारूढ झाला. कनिष्क हा कुषाण राजा होता. त्याने शकांवर दीर्घकाळ राज्य केले. पण त्याच्या मृत्यूनंतर हे शक संवत म्हणून प्रसिद्ध झाले. याचे कारण म्हणजे कनिष्कानंतर शकांनी बराच काळ सत्ता गाजवली. त्यांनीही हेच संवत शक संवत म्हणून वापरले. त्यामुळे कनिष्क संवतलाच शक संवत म्हटले जाऊ लागले.

विक्रम संवत

भारतीय कालगणनेनुसार कल्प, मन्वंतर आणि युगानंतर संवत्सराचे नाव येते. नवीन संवत चालविण्याच्या शास्त्रीय विधी या आहेत ज्या शासकाला आपल्या महान कर्म किंवा विजयाची स्मृतीत आपले संवत प्रारंभ करावयाचे असेल तर त्याच्या पूर्वी आपल्या राज्याची संपूर्ण प्रजेचे ऋण त्याने अदा केले पाहिजे. भारताचे सर्वमान्य विक्रम संवत हे एकमेव राष्ट्रीय संवत आहे कारण सम्राट विक्रमादित्याने शास्त्रीय विधीचे पालन करून सवंत आरंभ केले होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शालिवाहन शक म्हणजे काय?

    Ans: शालिवाहन शक ही भारतीय कालगणनेतील एक महत्त्वाची पद्धत आहे, जी इसवी सन 78 पासून सुरू झाल्याचे मानले जाते. अनेक सण-उत्सव या कालगणनेनुसार साजरे केले जातात.

  • Que: शालिवाहन आणि सातवाहन यांचा काय संबंध आहे?

    Ans: शालिवाहन हे सातवाहन राजवंशाशी संबंधित मानले जातात. या वंशातील गौतमीपुत्र सातकर्णी हा पराक्रमी राजा होता, ज्याने शकांवर विजय मिळवला.

  • Que: विक्रम संवत आणि शालिवाहन शक यात काय फरक आहे?

    Ans: विक्रम संवत आणि शालिवाहन शक या दोन वेगवेगळ्या कालगणना आहेत. विक्रम संवत सम्राट विक्रमादित्य यांच्याशी संबंधित आहे, तर शालिवाहन शकाचा संबंध शक किंवा सातवाहन काळाशी जोडला जातो.

Web Title: Who exactly started the shalivahan saka shalivahan and vikram samvat history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • dharm
  • Hindu Festival
  • hindu religion

संबंधित बातम्या

Superstitions: खरंच मांजर आडवं गेल्याने घडतात अशुभ घटना? लिंबू-मिरची, दही-साखरसारख्या लोकमान्यतेमागील सत्य काय
1

Superstitions: खरंच मांजर आडवं गेल्याने घडतात अशुभ घटना? लिंबू-मिरची, दही-साखरसारख्या लोकमान्यतेमागील सत्य काय

Atma Parmatma: ही सृष्टी नक्की कोणाच्या तालावर? आत्मा आणि परमात्मा फरक काय
2

Atma Parmatma: ही सृष्टी नक्की कोणाच्या तालावर? आत्मा आणि परमात्मा फरक काय

Rahu Nakshatra Transit: राहू धनिष्ठा नक्षत्रात करणार संक्रमण, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
3

Rahu Nakshatra Transit: राहू धनिष्ठा नक्षत्रात करणार संक्रमण, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

महर्षी अत्रि आणि सूर्यग्रहणाची कथा; जाणून घ्या वैदिक परंपरेतील खगोलशास्त्राचा इतिहास
4

महर्षी अत्रि आणि सूर्यग्रहणाची कथा; जाणून घ्या वैदिक परंपरेतील खगोलशास्त्राचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.