Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mari Aai Story: रोगराईपासून गावाचे रक्षण करणारी मरिआई देवी कोण? जाणून घ्या तिची कथा

महाराष्ट्रातील ग्रामदैवतांच्या परंपरेत मरिआई देवीला अत्यंत मानाचे स्थान आहे. ग्रामीण भागात मरिआई ही गावाचे रक्षण करणारी, रोगराईपासून संरक्षण करणारी आणि संकटांचे निवारण करणारी शक्तीस्वरूप माता मानली जाते. मरिआई कोण आहे, काय आहे तिचा महिमा आणि इतिहास जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 17, 2026 | 09:51 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • रोगराईपासून गावाचे रक्षण करणारी मरिआई देवी
  • मरिआई देवी कोण आहे
  • काय आहे या देवीचा महिमा आणि इतिहास
 

मरिआई किंवा मरिअंबा ही महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणातील अनेक भागात पूजली जाणारी एक महत्त्वाची ग्रामदैवता आहे. ग्रामीण भागात तिला रोगांपासून संरक्षण करणारी, गावाचं रक्षण करणारी आणि संकट दूर करणारी माता म्हणून मानलं जातं. मरिआई ही आदिशक्ती किंवा पार्वती याचं एक लोकदैवत स्वरुप मानलं जातं. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये त्यांच्या उत्पती बाबत वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात त्यामुळे मरिआईची एकच सार्वत्रिक कथा उपलब्ध नाही पण तरीही एक कथा अनेकांना माहीत असेल, जाणून घेऊया त्या कथेबाबत

रोगराईपासून संरक्षण करणारी आणि गावाचे रक्षण करणारी देवी

फार वर्षांपूर्वी एका गावात अचानक भयानक रोगराई पसरली. ताप, देवी, कांजण्या आणि इतर साथींच्या आजारांमुळे अनेक लोक आजारी पडू लागले. गावकऱ्यांनी अनेक उपाय केले पण रोग काही कमी होत नव्हता. संपूर्ण गाव भीतीच्या सावटाखाली आला त्याच काळात गावातील एका वृद्ध भक्त स्त्रीला स्वप्न पडलं. स्वप्नात एक तेजस्वी देवी प्रकट झाली आणि म्हणाली मी या भूमीची रक्षण कर्ती आहे माझी भक्तीभावानं पूजा करा, गाव स्वच्छ ठेवा, एकमेंकांना मदत करा आणि श्रद्धा ठेवून प्रार्थना करा. तुमच्या गावावरील संकट दूर होईल. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी गावाच्या वेशींवरती देवीची स्थापना केली. सर्वांनी मिळून गावाची स्वच्छता केली, पूजा अर्चा केली आणि एकमेंकांची सेवा केली.

Manudevi Temple: सातपुड्याच्या निसर्गरम्य पर्वतरांगांतील जागृत देवीस्थान; काय आहे या देवीचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व

देवीच्या कृपेने एका गावातील भीषण साथीची रोगराई दूर

लोककथेनुसार, काही दिवसांत ही रोगराई ओसरु लागली, गाव पुन्हा सुखी झालं त्या दिवसांपासूनच गावकऱ्यांनी देवीला मरिआई म्हणून मान दिला. काही अभ्यासकांच्या मते, मरि हा शब्द जु्न्या द्रविड भाषेमध्ये रोगराई किंवा महामारी या अर्थाशी संबंधित आहे त्यामुळे मरि आईला पूर्वी देवी, कांजण्या, कॉलरा किंवा इतर साथींच्या रोगांपासून संरक्षण करणारी देवी म्हणून पूजलं जात असे.

सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, बीड, धाराशिव आदी जिल्ह्यांत मरिआईची मंदिरे

महाराष्ट्रातली सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, बीड, धाराशिव आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये मरि आईची स्थानिक मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिरांचा इतिहास आणि स्थापना स्थानिक लोकपंरपरेनुसार वेगवेगळा आहे.

अनेक गावांमध्ये भजन, गोंधळ, पालखी आणि सामुदायिक पूजेचे आयोजन केले जाते

चैत्र, आषाढ किंवा स्थानिक परंपरेनुसार जत्रा भरवल्या जातात. देवीला हळद, कुंकू, फुल, ओटी, नारळ अर्पण केली जाते. अनेक गावांमध्ये भजन, गोंधळ, पालखी आणि सामुदायिक पूजा देखील केली जाते. मरिआईची अनेक सामुदायिक मंदिरे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आढळतात. अनेक गावांमध्ये त्या ग्रामदैवत म्हणून प्रतिष्ठित आहेत.

Tripurasundari Devi: त्रिपुरसुंदरी देवीचा महिमा आणि काय आहे तिची कथा, जाणून घ्या

ग्रामीण भागातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचा महत्त्वाचा भाग

साथींच्या रोगावरती आधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध होण्यापूर्वी मरिआईची पूजा केली जात असे. आजही ग्रामीण भागामध्ये मरिआईची जत्रा धार्मिक आणि सांस्कृतिकष्ट्या महत्त्वाची मानली जाते. अनेक ठिकाणी गावाच्या वेशीवरती मरिआईचं मंदिर देखील असतं ते गावाच्या रक्षणाचं प्रतीक मानलं जातं. मरिआई देवी या महाराष्ट्रातल्या लोकप्रिय ग्रामदैवतांपैकी एक आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मरिआई देवी कोण आहे?

    Ans: मरिआई देवी ही महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणातील अनेक भागांत पूजली जाणारी ग्रामदैवत असून ती गावाचे आणि ग्रामस्थांचे रक्षण करणारी देवी मानली जाते.

  • Que: मरिआई देवीला रोगराईपासून संरक्षण करणारी देवी का म्हणतात?

    Ans: लोकश्रद्धेनुसार देवी, कांजण्या, कॉलरा आणि इतर साथीच्या रोगांपासून गावाचे संरक्षण करण्यासाठी मरिआई देवीची पूजा केली जात असे.

  • Que: मरिआई देवीची कथा काय सांगते?

    Ans: लोककथेनुसार एका गावात रोगराई पसरल्यानंतर देवीने स्वप्नात दर्शन देऊन स्वच्छता, श्रद्धा आणि सामूहिक प्रार्थनेचा संदेश दिला. त्यानंतर गावावरील संकट दूर झाल्याची श्रद्धा आहे.

Web Title: Who is mari aai devi her glory and history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Dombivli News: संस्कारांचा वारसा जतनासाठी डोंबिवलीत उपकर्म उत्सव; २०० ब्राह्मण कुटुंबांचा सहभाग
1

Dombivli News: संस्कारांचा वारसा जतनासाठी डोंबिवलीत उपकर्म उत्सव; २०० ब्राह्मण कुटुंबांचा सहभाग

Panchak Upay: पंचक दोष टाळण्यासाठी करा हे घरगुती उपाय, राहूचा तणाव होईल दूर
2

Panchak Upay: पंचक दोष टाळण्यासाठी करा हे घरगुती उपाय, राहूचा तणाव होईल दूर

Shadashtak Yog: २ सप्टेंबरला शनि-शुक्र षडाष्टक योग! या राशींवर होऊ शकतो करिअर आणि आरोग्यावर परिणाम
3

Shadashtak Yog: २ सप्टेंबरला शनि-शुक्र षडाष्टक योग! या राशींवर होऊ शकतो करिअर आणि आरोग्यावर परिणाम

Jatashankar Mahadev Temple: गिरनार पर्वतावरील जटाशंकर महादेव मंदिराची काय आहे आख्यायिका, जाणून घ्या
4

Jatashankar Mahadev Temple: गिरनार पर्वतावरील जटाशंकर महादेव मंदिराची काय आहे आख्यायिका, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.