फोटो सौजन्य- pinterest
दशमहाविद्यांपैकी तिसरे स्वरूप मानली जाणारी माता त्रिपुरसुंदरी ही आदिशक्तीचे सौंदर्य, ज्ञान, प्रेम आणि सामर्थ्य यांचे प्रतीक आहे. श्रीविद्या उपासनेत त्रिपुरसुंदरी देवीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. तिची भक्तिभावाने उपासना केल्यास मनःशांती, आध्यात्मिक प्रगती आणि जीवनात सकारात्मकता प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. त्रिपुरसुंदरी देवी कोण आहे, काय आहे तिचा महिमा आणि कथा सविस्तर जाणून घेऊया
त्रिपुरसुंदरी देवी ही सनातन परंपरेतील शाक्त परंपरेतील अत्यंत पूजनीय देवी आहे. तिला ललिता, षोडशी आणि राजराजेश्वरी, श्रीविद्या देवी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. दहा महाविद्यांपैकी ती तिसरी महाविद्या मानली जाते. सौदर्यं, ज्ञान, प्रेम, शक्ती आणि विश्वासाच्या सृष्टीचं संचालन करणारी आदिशक्ती म्हणून तिची उपासना केली जाते.
त्रिपुरसुंदरी देवीचा अर्थ तीन प्रकारे सांगितला जातो. तीनही लोकांतील स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या सर्वांमध्ये सुंदर असलेली देवी. याशिवाय जागृत, स्वप्न आणि सुशुक्ती या तीन अवस्थांवरती आदिराज्य करणारी शक्ती. ब्रम्हा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींनाही शक्ती देणारी आदिशक्ती. यामुळे तिला संपूर्ण विश्वाची जननी मानलं जातं.
प्राचीन काळी ब्रम्हाडपुराण आणि ललितोपाख्यान यामध्ये देवीची एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. एकदा बंडासूर नावाच्या बलाढ्य असुराने कठोर तप करून अनेक वरदान मिळविली. त्याच्या अत्याचारामुळे देव, ऋषी आणि मानव सर्वजण त्रस्त झाले. देवाने आदिशक्तीची आराधना केली तेव्हा दिव्य तेजातून लाल कमळावरती विराजमान असलेल्या त्रिपुरसुंदरी देवी प्रकट झाल्या. त्यांच्या हातात पाश, अंकुश, उसाच धनुष्य आणि फुलांचे पाच बाण होते. देवीने आपल्या असंख्य शक्तींना सोबत घेऊन बंडासुराशी युद्ध केलं. अनेक दिवस चालेलं युद्धानंतर देवीने त्यांचा संहार केला आणि धर्माची पुर्नस्थापना केली.
त्रिपुरसुंदरी देवीचं स्वरुप अत्यंत शांत, तेजस्वी आणि करुणमय आहे. तिच्या अंगावरती लाल किंवा गुलाबी वस्त्र आहे. चार भुजा असून तिच्या हातात उसाच धनुष्य, पाश आणि अंकुश आहे. कमळावरती विराजमान तिचं स्वरुप आहे. तिच्या हातात असलेल्या प्रत्येक आयुध्याचा अध्यात्मिक अर्थ आहे. उसाच धनुष्य मनाचं प्रतीक दर्शवतं, पाच बाण ही पाच इंद्रिय दर्शवतं, पाश हे प्रेम आणि भक्तीने बांधून घेणं असा अर्थ दर्शवतो तर अंकुश म्हणजे मनावरती नियंत्रण ठेवणं.
त्रिपुरसुंदरी देवी ही श्रीविद्या उपासनेचा केंद्रस्थान आहे. तिच्या उपासनेत श्रीचक्र किंवा श्रीयंत्राला विशेष महत्त्व आहे. श्रीचक्र हे संपूर्ण विश्वाची रचना आणि परम शक्तीचं प्रतीक मानलं जातं. अनेक साधक श्रीचक्राची पूजा करून अध्यात्म उन्नती, मनशांती आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. त्रिपुरसुंदरी देवीची भक्ती केल्याने मनाला शांतता मिळते, नकारात्मक विचार दूर होतात, बुद्धी विवेक आणि निर्णयक्षमता वाढते. कुटुंबात प्रेम वाढतं, आर्थिक आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होतं, अध्यात्मिक प्रगती होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: त्रिपुरसुंदरी देवी या दशमहाविद्यांपैकी एक असून त्यांना ललिता, षोडशी आणि राजराजेश्वरी या नावांनीही ओळखले जाते.
Ans: पौराणिक कथेनुसार, भंडासुराचा संहार करून धर्माची स्थापना करण्यासाठी आदिशक्तीने त्रिपुरसुंदरी देवीचे रूप धारण केले.
Ans: देवीचे स्वरूप सदैव सोळा वर्षांच्या तेजस्वी युवतीप्रमाणे असल्याचे वर्णन आढळते. त्यामुळे त्यांना 'षोडशी' असे संबोधले जाते.






