Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manikarnika Ghat: काशीतील मणिकर्णिका घाट का आहे जगप्रसिद्ध, जाणून घ्या या घाटाचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व

उत्तर प्रदेशातील प्राचीन आणि सांस्कृतिक शहरांची ओळख असलेल्या वाराणसीमध्ये अनेक धार्मिक घाट आहेत. मात्र या घाटांपैकी 'मणिकर्णिका घाटा'ला विशेष महत्त्व का आहे? मुक्तीधाम घाट का म्हणतात? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 01, 2026 | 11:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • काशीतील मणिकर्णिका घाट का आहे जगप्रसिद्ध
  • मणिकर्णिका घाटाचा काय आहे इतिहास आणि धार्मिक महत्त्व
  • मणिकर्णिका घाटावरील आगळ्यावेगळ्या प्रथा कोणत्या
 

 

उत्तर प्रदेशातील प्राचीन आणि सांस्कृतिक शहर असलेल्या वाराणसी (काशी) मध्ये अनेक प्रेक्षणीय आणि धार्मिक घाट आहेत. परंतु, या सर्व घाटांमध्ये ‘मणिकर्णिका घाट’ हा सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि रहस्यमयी मानला जातो. हा केवळ एक घाट नसून हिंदू धर्मातील सर्वात मोठे आणि पवित्र ‘महास्मशान’ आहे.

मणिकर्णिका नावाचा इतिहास आणि पौराणिक कथा

‘मणिकर्णिका’ या नावामागे हिंदू पुराणांमध्ये अत्यंत रंजक कथा आढळतात. एका कथेनुसार, भगवान विष्णूंनी अनेक वर्षे तपश्चर्या करून येथे एक कुंड (तलाव) तयार केला होता. ज्यावेळी भगवान शिव आणि माता पार्वती या कुंडाजवळ आले, तेव्हा भगवान शिवाच्या आनंदाश्रूंनी ते कुंड भरले. त्याच वेळी माता पार्वतीच्या कानातील एक दागिना म्हणजेच ‘मणी’ (मणिकर्णिका) या कुंडात पडला. तेव्हापासून या स्थानाला ‘मणिकर्णिका’ असे नाव पडले.

मोक्षप्राप्तीचे ‘मुक्तीधाम’

हिंदू धर्मात अशी ठाम श्रद्धा आहे की, मणिकर्णिका घाटावर ज्या व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात, त्याला थेट ‘मोक्ष’ प्राप्त होतो. म्हणजेच तो आत्मा जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो. काशी खंड या ग्रंथानुसार, येथे देहत्याग करणाऱ्या किंवा अंत्यसंस्कार होणाऱ्या व्यक्तीच्या कानात स्वतः भगवान शिव ‘तारक मंत्र’ फुंकतात, ज्यामुळे त्या आत्म्याला सद्गती मिळते. याच कारणामुळे भारताच्या कानाकोपऱ्यातून वृद्ध आणि आजारी लोक आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस घालवण्यासाठी काशीत येतात.

मणिकर्णिका घाटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील चितांचा अग्नी कधीही विझत नाही. येथे वर्षभरात ३६५ दिवस सुरू असतात. एका पाठोपाठ एक मृतदेह येथे आणले जातात. डोळ्यांसमोर जळणाऱ्या चिता, मंत्रोच्चार आणि गंगेचा संथ प्रवाह यामुळे येथील वातावरण एकाच वेळी वैराग्य आणि शांततेचा अनुभव देते.

Varanasi: वाराणसीला का म्हटले जाते मोक्षनगरी? काय आहे काशीचा …

घाटावरील काही आगळ्यावेगळ्या प्रथा

या घाटावर आगळ्यावेगळ्या प्रथा प्रचलित आहे त्यापैकी एक म्हणजे राखेची होळी (मसाण होळी) देशभरात जिथे रंगांची होळी खेळली जाते, तिथे काशीमध्ये रंगपंचमीच्या सुमारास मणिकर्णिका घाटावर चितेच्या राखेने (भस्माने) होळी खेळली जाते. भगवान शिव आपल्या गणांसह येथे होळी खेळतात, अशी धारणा आहे.

त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीच्या काळात येथे रात्रीच्या वेळी देशातील विविध भागांतून आलेल्या नगरवधू (वेश्या) महादेवाच्या दरबारात नृत्य सादर करतात. पुढील जन्मी आपल्याला हे दलदलीचे आयुष्य मिळू नये, अशी प्रार्थना त्या देवाकडे करतात.

मान्यतेनुसार, मणिकर्णिका घाट हा केवळ मृत्यूचा घाट नाही, तर तो मानवी जीवनाची नश्वरता आणि अध्यात्माची सर्वोच्च पायरी दर्शवणारे स्थान आहे. येथे येणारा प्रत्येक व्यक्ती संसारातील मोह-माया विसरून काही काळासाठी का होईना, वैराग्य अनुभवतो. गंगेच्या काठावर जळणाऱ्या चिता माणसाला आयुष्याचे अंतिम सत्य काय आहे, याची जाणीव करून देतात.

Varanasi History: राजा देवोदासामुळे शिवांनी काशी का सोडली? काय आहे स्कंदपुराणातील आख्यायिका

ऐतिहासिक वारसा आणि पुनरुत्थान

मणिकर्णिका घाटाला आधुनिक आणि भक्कम स्वरूप देण्यामध्ये मराठा साम्राज्याचे मोठे योगदान आहे. १८ व्या शतकात (१७३० च्या सुमारास) आपल्या महाराष्ट्रातील होळकर घराण्याच्या महान राज्यकर्त्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी या घाटाचा जीर्णोद्धार केला. त्यांनी घाटाच्या पायऱ्या, मणिकर्णिका कुंड आणि जवळील मंदिरांचे बांधकाम करून या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाला एक नवी ओळख दिली.

असे मानले जाते की, मणिकर्णिका घाट हा माणसाला अहंकाराची आणि जगाच्या नश्वरतेची जाणीव करून देतो. श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येकाचा शेवट याच राखेत होणार आहे, हा शाश्वत संदेश हा घाट दर सेकंदाला देत असतो. म्हणूनच, काशीला भेट देणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूसाठी मणिकर्णिका घाटाचे दर्शन हे जीवनाचा एक अविस्मरणीय आणि डोळे उघडणारा अनुभव ठरते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मणिकर्णिका घाट कुठे आहे?

    Ans: मणिकर्णिका घाट हा उत्तर प्रदेशातील वाराणसी (काशी) येथे गंगा नदीच्या तीरावर स्थित आहे. हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र घाटांपैकी एक मानला जातो.

  • Que: मणिकर्णिका घाटाचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: हिंदू धर्मातील श्रद्धेनुसार, मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार झाल्यास आणि काशीमध्ये प्राणत्याग झाल्यास मोक्षप्राप्ती होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे हा घाट अत्यंत पवित्र मानला जातो.

  • Que: मणिकर्णिका घाटाला 'महास्मशान' का म्हटले जाते?

    Ans: या घाटावर वर्षभर, दिवस-रात्र अंत्यसंस्कार सुरू असतात. त्यामुळे मणिकर्णिका घाटाला 'महास्मशान' म्हणून ओळखले जाते.

Web Title: Why is manikarnika ghat in kashi world famous history and religious importance of this ghat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • dharm
  • Religion

संबंधित बातम्या

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या
1

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या

Pitru Paksha: श्राद्ध करावं की नाही? अंधश्रद्धा आणि श्रद्धेच्या पलीकडे पितृपक्षाचा वेगळा अर्थ
2

Pitru Paksha: श्राद्ध करावं की नाही? अंधश्रद्धा आणि श्रद्धेच्या पलीकडे पितृपक्षाचा वेगळा अर्थ

Samsaptak Yog: २८ सप्टेंबरला शुक्र शनिची होणार युती, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ
3

Samsaptak Yog: २८ सप्टेंबरला शुक्र शनिची होणार युती, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम
4

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.