Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: हळद, कुंकू आणि बुक्का का आहेत खास? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

भारतीय संस्कृती हळद, कुंकू आणि बुक्का या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हळदीचे तर आयुर्वेदिक असे आश्चर्यकारक गुणधर्म आहेत. तसेच ते कसे बनवतात याबद्दल जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 15, 2026 | 02:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • हळद, कुंकू आणि बुक्का का आहेत खास
  • हळद, कुंकू आणि बुक्का पूजेमध्ये का केला जातो समावेश
  • धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे
 

भारतीय संस्कृती प्रत्येक गोष्ट धर्माशी जोडली गेलेली आहे. हळद आणि कुंकू दोन्ही गोष्टी वरवर साध्या वाटतात. हळदीचे आयुर्वेदिक गुणधर्म सर्वांना माहीत आहेतच. त्याचबरोबर धार्मिक विधीत त्याला सर्वात मोठं स्थान आहे. हळदकुंकू हे सौभाग्याचे लेण समजलं जातं. घरात आलेल्या सुहासिनीला हळदीकुंकू दिल्याशिवाय पाठवू नये, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे नात्यात एक गोडवा आणि आपुलकीही निर्माण होते. बुक्का वारकरी संप्रदायात असतो. पंढरीच्या पांडुरंगाला बुक्का लावला जातो. या तिन्हींबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात

कुंकूचा वापर

हिंदू संस्कृतीमध्ये चाली, रूढी, परंपरा, नीती आणि मूल्ये यांचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेहमी संक्रमण झाल्या आहेत. रिती, रिवाज, रूढी, परंपरा नीती आणि मूल्ये ही समाजाला एकजीव व एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करतात. संस्कृतीमधून येणार समान आचरण आणि सभ्यतेमधून येणारी समान जीवनपद्धती ही समाजाची वीण घट्ट बांधून ठेवते. त्यामुळे मानवी जीवनात त्याज्य असे काहीच नसते. जे काही आहे त्यामागे काही तरी तत्व असते आणि हे तत्व समाजाला पुढे घेऊन जाण्यास मदत करते.

Chaitra Amavasya: चैत्र अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, पूर्वजांच्या शापातून होईल मुक्ती

हळद

भारतीय संस्कृती आणि सभ्यता यामध्ये कुंकू, हळद, बुक्का ,शेंदूर, गुलाल, विभूती, अष्टगंध आणि चंदन याला अनन्यसाधारण पारंपरिक महत्त्व आहे. वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर या सर्व पावडर किंवा संमिश्रे आहेत. मात्र अध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर या पवित्र गोष्टी आहेत. आज आपण कुंकू, हळद, बुक्का याबाबत विस्तृत आणि सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

हळदीकुंकूचे महत्त्व

कुंकवाचा करंडा आणि हळदीकुंकू समारंभ हे दोन शब्द तुमच्या कानी अनेक वेळा पडले असतील. कुंकू हे भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र अशी बाब आहे. लग्न झालेल्या स्त्रीच्या दृष्टीने कुंकू हे तिच्या सौभ्याग्च प्रतीक आहे. कपाळाच्या मध्यभागी कुंकू लावण्याची जुनी प्रथा आहे. काळानुरूप कपाळावरील कुंकवाचा आकार कमी कमी होत गेला. आताच्या स्त्रीया या कुंकवाच्या बदल्यात टिकली लावतात. उत्तर भारतीय स्त्रिया या कुंकवाने त्यांची मांग भरतात. पुरुषांमध्ये जेव्हा कुंकू लावले जाते तेव्हा त्यात थोडं पाणी मिसळून ते लावले जाते त्याला गंध किंवा टिळा म्हटले जाते. भारतीय स्त्रिया जेव्हा एकमेकींचा निरोप घेतात त्यावेळी एकमेकीला हळदीकुंकू लावतात. सध्याच्या युगात हळदीकुंकवाचे कार्यकम आयोजित केली जाण्याची प्रथा लोकप्रिय आहे. नैसर्गिक कुंकू हे हळद, बेकिंग सोडा, लिंबू आणि गुलाबजल वापरून केले जाते. रासायनिक कुंकू हे रेड लीड ऑक्साइड वापरून तयार केले जाते. रासायनिक कुंकवाचे अनेक दुष्परिणामही होतात.

Pradosh vrat: प्रदोष व्रताच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, नोकरी आणि व्यवसायात होईल प्रगती

हळद ही आरोग्यदायी आणि गुणकारी असून तिचा वापर वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होतो. असे असले तरी अध्यात्मिक दृष्टीने हळद ही सूर्याचे व समृद्धीचे प्रतीक आहे. लग्नाच्यापूर्वी वर आणि वधू यांना हळद लावली जाते. यातून त्यांनी भावी आयुष्यात समृद्धी साधावी असा संदेश दिला जातो. हळद अंगावर असेल तर जीवजंतू यांच्या संसर्गापासून संरक्षण होते. हळद ही एकाग्रता वाढवते. खंडोबाच्या जेजुरीला हळद (भंडारा) उधळली जाते आणि ती एक जुनी प्रथा आहे.

बुक्का

बुक्का हा काळा रंगाचा असतो. वारकरी संप्रदायमध्ये बुक्याला मानाचे स्थान आहे. वैष्णव पंथात बुक्का अग्रस्थानी आहे. तुळस आणि बुक्का याला वारकरी पंथात महत्त्वाचे स्थान आहे. देवाप्रती आदर व भक्ती प्रकट करण्यासाठी बुक्का कपाळाला लावतात. सत्यनारायण पूजेतही बुक्का असतो. भजन आणि कीर्तन यातही बुक्का लावला जातो. नैसर्गिक बुक्का हा तुळशीच्या काड्या किंवा चंदन आणि कापूर याच्या एकत्र मिश्रण करून जाळून बनवतात. रासायनिक बुक्का हा आर्यन ऑक्साईडपासून तयार केला जातो. बुक्याला अबीर बुक्का असेही म्हणतात. आज्ञ चक्र जेथे असते त्या कपाळाच्या मधोमध बुक्का लावून भावनिक स्थिरत्व साधले जाते. तसेच बुक्यातून वैराग्य प्रकट केले जाते. बुक्का लावल्याने मोह आणि माया यापासून माणूस मुक्त होतो. एकादशी दिवशी विठ्ठलाच्या पूजेत बुक्का हा असायलाच हवा. अन्याय ती पूजा पूर्ण होत नाही.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: हळद, कुंकू आणि बुक्का यांना इतके महत्त्व का आहे?

    Ans: या तिन्ही गोष्टी भारतीय परंपरेत शुभ, पवित्र आणि आध्यात्मिक उर्जेचे प्रतीक मानल्या जातात. त्या धार्मिक विधींमध्ये आवश्यक मानल्या जातात.

  • Que: हळदीचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे?

    Ans: हळद समृद्धी आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. वैज्ञानिकदृष्ट्या ती अँटीसेप्टिक असून त्वचा आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

  • Que: बुक्का म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय आहे?

    Ans: बुक्का हा काळा रंगाचा पावडर असतो, जो विशेषतः वारकरी संप्रदायात वापरला जातो. तो वैराग्य आणि भक्तीचे प्रतीक आहे.

Web Title: Why turmeric kumkum and bukka are special know their religious and scientific significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • astro tips
  • dharm
  • hindu religion

संबंधित बातम्या

Chandra Gochar 2026: चंद्राने मंगळाच्या राशीत केला प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदाच फायदा
1

Chandra Gochar 2026: चंद्राने मंगळाच्या राशीत केला प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदाच फायदा

Hanuman story: हनुमानाची भक्ती आणि नारदमुनींचा अहंकार काय आहे यामागील कथा जाणून घ्या
2

Hanuman story: हनुमानाची भक्ती आणि नारदमुनींचा अहंकार काय आहे यामागील कथा जाणून घ्या

Blue Moon 2026: ३१ मे रोजी दुर्मिळ ब्लू मूनचा योग, मेष राशींसह या राशींच्या लोकांच्या जीवनात होणार सकारात्मक बदल
3

Blue Moon 2026: ३१ मे रोजी दुर्मिळ ब्लू मूनचा योग, मेष राशींसह या राशींच्या लोकांच्या जीवनात होणार सकारात्मक बदल

Numberlogy: मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.