Bangarwadi Marathi writer Venkatesh Madgulkar death anniversary 28 August history Marathi dinvishesh
मराठी साहित्य विश्वामध्ये बहूमूल्य योगदान देणारे व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांनी अनेक कांदबरी आणि कथासंग्रहांचे लेखन केले आहे. विख्यात साहित्यिक ग. दि. माडगूळकर ह्यांचे व्यंकटेश हे धाकटे बंधू होते. त्यांनी अनेक कादंबरी, कथासंग्रह लिहिले. यातील एक लोकप्रिय कादंबरी म्हणजे बनगरवाडी आहे. याचबरोबर वावटळ, पुढचं पाऊल, करुणाष्टक आणि सत्तांतर अशा अनेक कादंबरी लिहिल्या आहेत. आजच्या दिवशी 2001 साली व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांची साहित्यकृती अजूनही त्यांचे अस्तित्व टिकवून आहे.
28 ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
1845 : सायंटिफिक अमेरिकन मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
1916 : पहिले महायुद्ध – जर्मनीने रोमानियाविरुद्ध युद्ध पुकारले.
1916 : पहिले महायुद्ध – इटालीने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले.
1931 : फ्रान्स आणि सोव्हिएत युनियनने युद्धविरामावर स्वाक्षरी केली.
1937 : टोयोटा मोटर्स एक स्वतंत्र कंपनी बनली.
1990 : इराकने कुवेतला स्वतःचा प्रांत म्हणून घोषित केले.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
28 ऑगस्ट जन्म दिनविशेष
1749 : ‘योहान वूल्फगाँग गटे’ – जर्मन महाकवी, कलाकार यांचा जन्म. (मृत्यू : 22 मार्च 1832)
1855 : ‘नारायण गुरु’ – भारतीय समाजसुधारक यांचा जन्म.
1896 : ‘रघुपती सहाय गोरखपुरी’ – उर्दू शायर यांचा जन्म. (मृत्यू : 3 मार्च 1982)
1906 : ‘चिंतामणी गोविंद पेंडसे’ – रंगभूमी अभिनेते यांचा जन्म.
1918 : ‘राम कदम’ – मराठी चित्रपट प्रसिद्ध संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 19 फेब्रुवारी 1997)
1928 : ‘एम. जी. के. मेनन’ – भारतीय पदार्थ वैज्ञानिक यांचा जन्म.
1928 : ‘उस्ताद विलायत खाँ’ – सुप्रसिद्ध सतारवादक यांचा जन्म. (मृत्यू : 13 मार्च 2004)
1934 : ‘सुजाता मनोहर’ – सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा यांचा जन्म.
1938 : ‘पॉल मार्टिन’ – कॅनडाचे पंतप्रधान यांचा जन्म.
1952 : ‘जगदीश सिंग खेहर’ – भारताचे 44 वे सरन्यायाधीश यांचा जन्म.
1954 : ‘रवी कंबुर’ – भारतीय-इंग्लिश अर्थशास्त्री यांचा जन्म.
1965 : ‘सातोशी ताजीरी’ – पोकेमोन चे निर्माते यांचा जन्म.
1966 : ‘प्रिया दत्त’ – माजी खासदार यांचा जन्म.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
28 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष
1667 : ‘मिर्झाराजे जयसिंग’ – जयपूर चे राजे यांचे निधन. (जन्म : 15 जुलै 1611)
1969 : ‘रावसाहेब पटवर्धन’ – भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत यांचे निधन.
1984 : ‘मुहम्मद नागुब’ – इजिप्तचे पहिले राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म : 19 फेब्रुवारी 1901)
2001 : ‘व्यंकटेश माडगूळकर’ – लेखक, चित्रकार, पटकथाकार यांचे निधन. (जन्म : 6 जुलै 1927)