उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर जाऊन गणरायाचे दर्शन घेतले (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : आज मोठ्या दिमाखामध्ये गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. घरोघरी थाटामाटामध्ये गणराय विराजमान झाले आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये गणशोत्सवाचा मोठा उत्साह दिसून येत आहे. असाच उत्साह राजकीय वर्तुळामध्ये देखील दिसून येतो आहे. राजकीय नेत्यांनी देखील आपापल्या घरांमध्ये गणपती बाप्पांचे स्वागत केले असून पूजाअर्चा केली आहे. यामध्ये सर्वांत जास्त चर्चा ही ठाकरे कुटुंबाच्या गणपतीची सुरु आहे. याचे कारण म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या घरी गेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या घरी जात गणरायाचे दर्शन घेतले आहे.
राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर दाखल झाले. शिवतीर्थावर सर्व ठाकरे कुटुंब एकत्र असल्याचे दिसून आले. यावेळी उद्धव ठाकरे हे संपूर्ण कुटुंबासह शिवतीर्थावर दाखल झाले. त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आल्याचे दिसून आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये देखील चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज ठाकरेंच्या यांच्या घरी पहिल्यांदाच एवढ्या वर्षानंतर उद्धव ठाकरे हे दाखल झाले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर आले आहेत. यापूर्वी राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने मातोश्रीवर भेट द्यायला गेले होते. शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर अनेक वर्षानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर गेल्याचे दिसून आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीमध्ये जात आठवणींना उजाळा दिला होता. यानंतर आता उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर आल्याचे दिसून आले. ठाकरे कुटुंबाच्या वंशावळीच्या फोटोखाली राज-उद्धव या ठाकरे बंधूंनी फोटो देखील काढले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवतीर्थावर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण कुटुंबासह गणरायाचे दर्शन घेतले. यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दाराआड चर्चा देखील झाली आहे. 10 मिनिटे हे दोन्ही भावंडे खोलीमध्ये चर्चा करत असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही भावांमध्ये कोणती राजकीय खलबते सुरु असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्याचबरोबर ठाकरे बंधूंच्या या एकत्रित येण्यामुळे विरोधकांची धाकधुक वाढली आहे.
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) August 27, 2025
राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचे हे एकत्रित येणे नवीन राजकीय युतीचा श्रीगणेशा असल्याची चर्चा सुरु आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावर राज-उद्धव हे ठाकरे बंधू एकत्रित आले. यावेळी तब्बल 20 वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर आले असल्याचे दिसून आले. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची ही युती महत्त्वाची मानली जात आहे. मागील वाद विवाद विसरुन ठाकरे बंधू हे एकत्रित येत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईवर वचर्स्व राखण्यासाठी आणि महायुतीला शह देण्यासाठी ठाकरे बंधू यांचे एकत्रित येणे उद्धव ठाकरे यांना मोठे फायदेशीर ठरणार आहे.