Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Liberation War : भारताच्या निर्णायक भूमिकेमुळे बांगलादेश बनले स्वतंत्र राष्ट्र; जाणून घ्या 26 मार्चचा इतिहास

भारताच्या ठाम पाठिंबा आणि लष्करी मदतीमुळे १९७१ मध्ये बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळाले. लाखो निर्वासितांना आश्रय देत भारताने मानवतेची जबाबदारी पार पाडली,

  • By प्रीति माने
Updated On: Mar 26, 2026 | 10:45 AM
Bangladesh Independence Day Bangladesh became independent nation by India decisive March 26th

Bangladesh Independence Day Bangladesh became independent nation by India decisive March 26th

Follow Us
Close
Follow Us:

Bangladesh Liberation War : आजचा दिवस बांगलादेशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. २६ मार्च १९७१ रोजी बांगलादेशने पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची घोषणा केली. या स्वातंत्र्यलढ्यात लाखो लोकांनी बलिदान दिले आणि देशाच्या मुक्तीसाठी संघर्ष केला.या पार्श्वभूमीवर भारतानेही महत्त्वाची भूमिका बजावली. बांगलादेश (Bangladesh) मुक्ती युद्धामध्ये भारताने आपली ताकद दाखवून दिली.  भारताने बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा दिला. लाखो निर्वासितांना आश्रय देत भारताने मानवतेची मोठी जबाबदारी पार पाडली. पुढे डिसेंबर १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले, ज्यामध्ये भारतीय सैन्याने निर्णायक विजय मिळवून बांगलादेशच्या निर्मितीस मदत केली. या युद्धामुळे दक्षिण आशियाच्या राजकारणात मोठा बदल झाला आणि बांगलादेश स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आला. (Dinvishesh)

26 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1552 : गुरू अमर दास हे शिखांचे तिसरे गुरू बनले.
  • 1902 : नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे केंद्रीय मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले.
  • 1910 : लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध मधील कुंडल रोडवर रेल्वे स्थानकाजवळ कारखाना उभारण्यास सुरूवात केली.
  • 1942 : ऑश्विझ छळछावणी (Concentration Camp) पोलंडमधील ओश्फिन्चिम ह्या शहराजवळ नाझी जर्मनीने उभारलेली एक मोठी छळछावणी होती येथे पहिल्या महिला कैदी दाखल झाल्या.
  • 1971 : बांगलादेशचा स्वातंत्र्यदिन
  • 1972 : नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पहिली जागतिक संस्कृत परिषद सुरू झाली.
  • 1974 : गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलन सुरू झाले.
  • 1979 : अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.
  • 2000 : व्लादिमीर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
  • 2013 : त्रिपूरा उच्‍च न्यायालयाची स्थापना.
हे देखील वाचा : एकत्र सत्तेत, पण मतभेद कायम! भाजप–शिंदेसेनेतील संघर्ष चिघळला, महायुतीत मिठाचा खडा

26 मार्च रोजी जन्म दिनविशेष

  • 1874 : ‘रॉबर्ट फ्रॉस्ट’ – अमेरिकन कवी यांचा जन्म. (मृत्यू: 29 जानेवारी 1963)
  • 1875 : ‘सिंगमन र्‍ही’ – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 19 जुलै 1965)
  • 1879: ‘ओथमर अम्मांन’ (Othmar Hermann Ammann) – जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज चे रचनाकार ( यांचा जन्म. (मृत्यू: 22 सप्टेंबर 1965)
  • 1881 : ‘गुच्चियो गुच्ची’ – गुच्ची फॅशन कंपनी चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 2 जानेवारी 1953)
  • 1898: ‘रुडॉल्फ दास्स्लेर’ – पुमा से कंपनी चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 27 ऑक्टोबर 1974)
  • 1907 : ‘महादेवी वर्मा’ – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 11 सप्टेंबर 1987)
  • 1909 : ‘बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर’ – साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतक चे पहिले संपादक यांचा जन्म. (मृत्यू: 27 नोव्हेंबर 2000)
  • 1930 : ‘सांड्रा डे ओ’कॉनोर’ – अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश ( मृत्यू : 1 डिसेंबर 2023)
  • 1933 : ‘कुबेरनाथ राय’ – भारतीय लेखक व हिन्दी निबंधकार. ( मृत्यू: 5 जून 1996)
  • 1973 : ‘लॅरी पेज’ – गुगल चे सह-संस्थापक यांचा जन्म.
  • 1985 : ‘प्रॉस्पर उत्सेया’ – झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
हे देखील वाचा : एका बाजूला ‘Purple Day’चा माणुसकीचा हात, तर दुसरीकडे स्वतःची सुट्टी शोधण्याचा आनंद; वाचा ‘या’ दिवसाचे महत्त्व

26 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1827 : ‘लुडविग व्हान बेथोव्हेन’ – अठराव्या शतकातील एक श्रेष्ठ व प्रभावी संगीतकार यांचे निधन. (जन्म: 16 डिसेंबर 1770)
  • 1885 : ‘अंसन स्तागेर’(Anson Stager) – वेस्टर्न युनियन चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 20 एप्रिल 1825)
  • 1932 : ‘हेनरी मार्टिन लेलैंड’ – कैडिलैक आणि लिंकन कंपनी चे स्थापक यांचे निधन. (जन्म: 16 फेब्रुवारी 1843)
  • 1945 : ‘डेविड लॉयड जॉर्ज’ – यूनाइटेड किंगडम चे प्रधानमंत्री यांचे निधन ( जन्म: 17 जानेवारी 1863)
  • 1996 : ‘के. के. हेब्बर’ – चित्रकार यांचे निधन.
  • 1996 : ‘डेव्हिड पॅकार्ड’ – हेल्वेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म: 7 सप्टेंबर 1912)
  • 1997 : ‘नवलमल फिरोदिया’ – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती यांचे निधन. (जन्म: 9 सप्टेंबर 1910)
  • 1999: ‘आनंद शंकर’ – प्रयोगशील संगीतकार यांचे निधन. (जन्म: 11 डिसेंबर 1942)
  • 2003 : ‘हरेन पंड्या’ – गुजरातचे माजी गृह मंत्री यांचे निधन. (जन्म: 25 जून 1950)
  • 2008 : ‘बाबुराव बागूल’ – दलित साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 17 जुलै 1930)
  • 2009 : ‘ग्रिसेल्डा अल्वारेझ’ – मेक्सिकोतील पहिल्या महिला गव्हर्नर यांचे निधन (जन्म: 5 एप्रिल 1913)
  • 2012 : ‘माणिकराव गोडघाटे‘ – प्रसिद्ध पराङमुख गीतकार व कवी यांचे निधन. (जन्म: 10 मे 1940)

Web Title: Bangladesh independence day bangladesh became independent nation by india decisive march 26th

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

ऐतिहासिक अन् प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना; जाणून घ्या 25 मार्चचा इतिहास
1

ऐतिहासिक अन् प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना; जाणून घ्या 25 मार्चचा इतिहास

प्रसिद्ध कथालेखक व कादंबरीकार ‘श्रीपाद नारायण पेंडसे’ यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या २४ मार्चचा इतिहास
2

प्रसिद्ध कथालेखक व कादंबरीकार ‘श्रीपाद नारायण पेंडसे’ यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या २४ मार्चचा इतिहास

शहीद दिन 2026 : भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या बलिदानाची आठवण करुन देणारा दिवस; जाणून घ्या 23 मार्चचा इतिहास
3

शहीद दिन 2026 : भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या बलिदानाची आठवण करुन देणारा दिवस; जाणून घ्या 23 मार्चचा इतिहास

World Water Day 2026 : पाणीटंचाईची गंभीरता अधोरेखित करणारा दिवस; जाणून घ्या २२ मार्चचा इतिहास
4

World Water Day 2026 : पाणीटंचाईची गंभीरता अधोरेखित करणारा दिवस; जाणून घ्या २२ मार्चचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.