Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे सुभाषचंद्र बोस यांची जयंती; जाणून घ्या 23 जानेवारीचा इतिहास

Netaji Subhash Chandra Bose : दुसरे महायुद्ध सुरु असताना सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना याची स्थापना केली. इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानसोबत मिळून रणनीती तयार केली.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 23, 2026 | 10:57 AM
birth anniversary of Netaji Subhas Chandra Bose founded the Azad Hind Sena 23 January

birth anniversary of Netaji Subhas Chandra Bose founded the Azad Hind Sena 23 January

Follow Us
Follow Us:

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रेसर नेते म्हणून सुभाषचंद्र बोस ओळखले जातात. सुभाष बोस यांचा जन्म २३ जानेवारी, १८९७ रोजी ओरिसातील एका मोठ्या बंगाली कुटुंबात झाला होता. भारतीय नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आले. मात्र यानंतर त्यांनी भारतामध्ये येऊन राष्ट्रवादाचा वसा हाती घेतला. दुसरे महायुद्ध सुरु असताना सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना याची स्थापना केली. इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानसोबत मिळून रणनीती तयार केली. त्यांच्या कार्यामुळे सुभाषचंद्र बोस यांना लोकांनी नेताजी ही उपाधी दिली. त्याचबरोबर ‘जय हिंद’ चा नारा देऊन सुभाषचंद्र बोस यांनी ‘तूम मुझें खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा’ असे आवाहन त्यांनी भारतीयांना केले. (Dinvishesh)

23 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1565: विजयनगर साम्राज्याचा अंत.
  • 1708: छत्रपती शाहू महाराजांनी राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.
  • 1849: डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल या वैद्यकशास्त्रात पदवीधर झालेल्या पहिल्या महिला ठरल्या.
  • 1943: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने लिबियाची राजधानी त्रिपोली ताब्यात घेतली.
  • 1950: नेसेटने जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी असल्याचा ठराव केला.
  • 1968: शीतयुद्ध – उत्तर कोरियाने अमेरिकन युद्धनौका यू.एस.एस. पुएब्लो ताब्यात घेतली.
  • 1973: अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनामशी शांतता कराराची घोषणा केली.
  • 1997: मॅडेलीन अल्ब्राइट अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री बनल्या.
  • 1998: नेटस्केपने मोझिलाची घोषणा केली, ज्याचा उद्देश कम्युनिकेटर कोड ओपन सोर्स म्हणून रिलीज करणे होता.
हे देखील वाचा : निवडणूक न लढवताही त्यांनी दिल्लीचे तख्त हलवले; बाळ ठाकरेंचे ‘असे’ रहस्य ज्यामुळे सरकारही होते हादरले

23 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1814: ‘सर अलेक्झांडर कनिंगहॅम’ – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी यांचा जन्म. (मृत्यू: 28 नोव्हेंबर 1893)
  • 1876: ‘ओटो डायल्स’ – नोबेल पुरस्कार, जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.(मृत्यू : 7 मार्च 1954)
  • 1894: ‘ज्योतिर्मयी देवी’ – भारतीय लेखक यांचा जन्म.(मृत्यू : 17 नोव्हेंबर 1988)
  • 1897: ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ – यांचा जन्म. (मृत्यू: 18 ऑगस्ट 1945 – फोर्मोसा, तैवान)
  • 1898: ‘पं. शंकरराव व्यासगायक’ – व संगीतशिक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 17 डिसेंबर 1956)
  • 1907: ‘हिदेकी युकावा’ – नोबेल पुरस्कार, जपानी भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 8 सप्टेंबर 1981)
  • 1918: ‘गर्ट्रूड बी. एलियन’ – नोबेल पुरस्कार, अमेरिकन बायोकेमिस्ट आणि औषधशास्त्रज्ञ यांचा जन्म.(मृत्यू : 21 फेब्रुवारी 1999)
  • 1920: ‘वॉल्टर फ्रेडरिक मॉरिसन’ – फ्रिसबीचे संशोधक, अमेरिकन व्यावसायीक यांचा जन्म.(मृत्यू : 9 फेब्रुवारी 2010)
  • 1920: ‘श्रीपाद रघुनाथ जोशी’ – व्यासंगी लेखक यांचा जन्म.
  • 1926: ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ – यांचा जन्म. (मृत्यू: 17 नोव्हेंबर 2012)
  • 1929: ‘जॉन पोलानी’ – नोबेल पुरस्कार, जर्मन-कॅनेडियन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1930: ‘डेरेक वॉलकॉट’ – नोबेल पुरस्कार, सेंट लुसियन कवी आणि नाटककार यांचा जन्म. (मृत्यू : 17 मार्च 2017)
  • 1934: ‘बरुण सेनगुप्ता’ – बंगाली पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 19 जून 2008)
  • 1934: ‘सर विल्यम हार्डी’ – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 6 एप्रिल 1864)
  • 1946: ‘अर्नोल्डो अलेमननिका’ – राग्वा देशाचे अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1947: ‘मेगावती सुकार्नोपुत्री’ – इंडोनेशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1964: ‘भरत जगदेव’ – गयाना देशाचे 7वे अध्यक्ष यांचा जन्म.
हे देखील वाचा :  माझा काका.. माझं बालपण…; दैनिक ‘सामना’तून राज ठाकरेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी

23 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1664: ‘शहाजी राजे भोसले’ – यांचे निधन. (जन्म: 18 मार्च 1594)
  • 1806: ‘विल्यम पिट द यंगर’ -युनायटेड किंगडमचे पंतप्रधान – (जन्म: 28 मे 1759)
  • 1919: ‘राम गणेश गडकरी’ – नाटककार, कवी व विनोदी लेखक यांचे निधन. (जन्म: 26 मे 1885)
  • 1959: ‘विठ्ठल नारायण चंदावरकर’ – शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित यांचे निधन.
  • 1989: ‘साल्वादोर दाली’ – स्पॅनिश चित्रकार यांचे निधन. (जन्म: 11 मे 1904)
  • 1991: ‘पद्मराजन’ – भारतीय दिग्दर्शक आणि लेखक यांचे निधन. (जन्म: 23 मे 1925)
  • 1999: ‘जय प्रित्झकर’ – हयात कॉर्पोरेशनचे सह-संस्थापक, अमेरिकन उद्योगपती यांचे निधन. (जन्म: 26 ऑगस्ट 1922)
  • 2010: ‘पं. दिनकर कैकिणी’ – शास्त्रीय गायक यांचे निधन. (जन्म: 2 ऑक्टोबर 1927)
  • 2012: ‘बिंगहॅम रे’ – ऑक्टोबर फिल्म्सचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती यांचे निधन. (जन्म: 1 ऑक्टोबर 1954)

Web Title: Birth anniversary of netaji subhas chandra bose founded the azad hind sena 23 january

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh
  • Netaji Subhash Chandra Bose

संबंधित बातम्या

International Day of Older Persons 2026: आज वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिन; जाणून घ्या १ ऑक्टोबरचा इतिहास..
1

International Day of Older Persons 2026: आज वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिन; जाणून घ्या १ ऑक्टोबरचा इतिहास..

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास
2

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..
3

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..
4

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.