Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या शाहिस्ता खानची महाराजांनी छाटली बोटं; जाणून घ्या 05 एप्रिलचा इतिहास

शिवाजी महाराजांसोबत झालेल्या चकमकीत शाइस्ता खानाची तीन बोटे कापली गेली. या घटनेनंतर शाइस्ता खानाने घाबरून पुणे सोडले. ही लढाई शिवाजी महाराजांच्या चातुर्य, धाडस आणि युद्धनीतीचे उत्कृष्ट उदाहरण मानली जाते.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 05, 2026 | 11:15 AM
Chhatrapati Shivaji Maharaj severed three fingers of Shaista Khan April 5th in History

Chhatrapati Shivaji Maharaj severed three fingers of Shaista Khan April 5th in History

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती शिवाजी यांनी स्वराज्यासाठी प्राण पणाला लावून अनेक लढाई केल्या. शत्रूसोबत कधी शक्ती तर कधी युक्तीने लढत देत स्वराज्यनिर्मिती केली. यामध्ये पुण्यातील लाल किल्ल्यावर झालेल्या शाहिस्ताखावरील हलल्याचा आवर्जुन उल्लेख केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहिस्ता खान यांच्यातील लढाई मराठा इतिहासातील अत्यंत धाडसी घटना मानली जाते. १६६३ साली शाहिस्ता खान पुण्यातील लाल महाल येथे मुक्कामाला होता. त्यावेळी शिवाजी महाराजांनी रात्रीच्या वेळी गुप्तपणे हल्ला करण्याची योजना आखली. महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी लग्नसमारंभाच्या वेशात शहरात प्रवेश केला आणि अचानक लाल महालावर धाड टाकली. या अचानक हल्ल्यामुळे मुघल सैन्य गोंधळले. या चकमकीत शाहिस्ता खानाचा हात जखमी झाला आणि त्याची तीन बोटे कापली गेली. या घटनेनंतर शाहिस्ता खानाने घाबरून पुणे सोडले. ही लढाई शिवाजी महाराजांच्या चातुर्य, धाडस आणि युद्धनीतीचे उत्कृष्ट उदाहरण मानली जाते. (Dinvishesh)

 

05 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1663 : शिवाजी महाराजांनी 200 घोडेस्वारांसह मुघल सुभेदार शाहिस्तेखानवर दहा हजार सैन्यासह पुण्याच्या लाल महालात तळ ठोकून अचानक हल्ला केला. शाहिस्तेखान खिडकीतून फरार; मात्र पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याची तीन बोटे तुटली.
  • 1679 : जुल्फिकारखानने राजारामाला पकडण्यासाठी रायगडाला वेढा घातला. पुढे प्रतापगडाला शत्रूंनी वेढा दिला तेव्हा राजाराम महाराजांना पन्हाळगडावर जावे लागले.
  • 1930: महात्मा गांधींनी 241 मैलांचा प्रवास करून दांडी यात्रा पूर्ण केली.
  • 1949 : भारत स्काउट – गाईडची स्थापना झाली.
    1957 : भारतात प्रथमच केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षाने निवडणूक जिंकली आणि एम.एस. नंबुद्रीपाद केरळचे मुख्यमंत्री झाले.
  • 1964 : राष्ट्रीय समुद्री दिवस
  • 1999 : भारताच्या मालकीचं पहिलं जहाज एस.एस. लॉयल्टी लंडनला रवाना झालं.
  • 2000 : जळगाव नगरपालिकेच्या 17 माजली इमारतीचे उद्घाटन.
  • 2000 : अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. –10 या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.
  • 2010 : नक्षलवाद्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात भीषण हल्ल्यात, दंतेवाडा, छत्तीसगड येथे 73 CRPF जवान शहीद झाले.
हे देखील वाचा : दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? विलीनीकरणाच्या चर्चेवर जय पवारांचे सूचक वक्तव्य

05 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष

  • 1827 : ‘सर जोसेफ लिस्टर’ – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद यांचा जन्म. (मृत्यू: 10 फेब्रुवारी 1912)
  • 1856 : ‘बुकर टी. वॉशिंग्टन’ – अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 14 नोव्हेंबर 1915)
  • 1908 : ‘बाबू जगजीवनराम’ – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 6 जुलै 1986)
  • 1909 : ‘अल्बर्ट आर. ब्रोकोली’ – जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 27 जून 1996)
  • 1916 : ‘ग्रेगरी पेक’ – हॉलीवूड अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू: 12 जून 2003)
  • 1920 : ‘डॉ. रफिक झकारिया’ – महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य यांचा जन्म. (मृत्यू: 9 जुलै 2005)
  • 1920 : ‘आर्थर हॅले’ – इंग्लिश कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू: 24 नोव्हेंबर 2004)
  • 1961 : ‘प्रशांत दामले’ – मराठी चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
  • 1966 : ‘आसिफ मांडवी’ – भारतीय-अमेरिकन अभिनेते आणि निर्माते आसिफ मांडवी यांचा जन्म.
हे देखील वाचा : भारताचा अथांग सागरी वारसा; ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये भारत कसा बनतोय जागतिक लीडर? वाचा सविस्तर

05 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1917 : ‘शंकरराव निकम’ – स्वातंत्र्यशाहीर यांचे निधन.
  • 1922 : ‘पंडिता रमाबाई’ – आर्य महिला समाजच्या संस्थापिका यांचे निधन. (जन्म: 23 एप्रिल 1858)
  • 1940 : ‘चार्लस फ्रिअरी’ तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते यांचे निधन. (जन्म: 12 फेब्रुवारी 1871)
  • 1964 : ‘गोपाळ विनायक भोंडे’ – नकलाकार यांचे निधन.
  • 1993 : ‘दिव्या भारती’ – हिंदी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 25 फेब्रुवारी 1974)
  • 1996 : ऑर्गनवादक भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे यांचे निधन.
  • 1998 : ‘रुही बेर्डे’ – चित्रपट व नाट्य अभिनेत्री यांचे निधन.

Web Title: Chhatrapati shivaji maharaj severed three fingers of shaista khan april 5th in history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायक नारायणराव व्यास यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या ०४ एप्रिलचा इतिहास
1

शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायक नारायणराव व्यास यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या ०४ एप्रिलचा इतिहास

स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर घेतला अखेरचा श्वास; जाणून घ्या 03 एप्रिलचा इतिहास
2

स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर घेतला अखेरचा श्वास; जाणून घ्या 03 एप्रिलचा इतिहास

कोल्हापूरच्या नव्या पर्वाची सुरुवात! छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक; जाणून घ्या 02 एप्रिलचा इतिहास
3

कोल्हापूरच्या नव्या पर्वाची सुरुवात! छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक; जाणून घ्या 02 एप्रिलचा इतिहास

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्नाने सन्मान; जाणून घ्या 1 एप्रिलचा ऐतिहासिक दिवस
4

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्नाने सन्मान; जाणून घ्या 1 एप्रिलचा ऐतिहासिक दिवस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.