Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापूरच्या नव्या पर्वाची सुरुवात! छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक; जाणून घ्या 02 एप्रिलचा इतिहास

कोल्हापूरच्या इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक. १८९४ साली गादीवर विराजमान झाल्यानंतर त्यांनी समाजातील वंचित, मागास आणि शोषित घटकांच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचले.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 02, 2026 | 10:34 AM
Kolhapur Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Coronation April 2nd History

Kolhapur Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Coronation April 2nd History

Follow Us
Follow Us:

आजच्या जिवशी 1894 साली छत्रपती राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) यांचा राज्याभिषेक झाला. त्यांचा राज्याभिषेक हा कोल्हापूरच्या इतिहासातील एक परिवर्तनकारी क्षण ठरला. १८९४ साली गादीवर आरूढ होताच त्यांनी समाजातील वंचित, शोषित आणि मागास घटकांच्या उन्नतीसाठी कार्याला सुरुवात केली. राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाला प्राधान्य देत मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू केले. अस्पृश्यतेविरोधात कठोर भूमिका घेत त्यांनी समाजात समतेचा संदेश दिला. आरक्षणाची संकल्पना राबवून मागासवर्गीयांना संधी देणारे ते पहिले शासक ठरले. त्यांच्या कार्यकाळात पाणीपुरवठा, शेती, उद्योग आणि सहकार क्षेत्रातही मोठी प्रगती झाली. सामान्य जनतेच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी अनेक विकासकामे केली. राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक केवळ सत्ता हस्तांतरण नव्हता, तर सामाजिक न्याय आणि समतेच्या युगाची सुरुवात होती. त्यांनी कलाकार, खेळाडू आणि पैलवान यांना राजाश्रय दिला. (Dinvishesh)

 

02 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1870: ‘गणेश वासुदेव जोशी’ यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची ( पब्लिक असेंब्लीची) स्थापना झाली.
  • 1982: फॉकलंड युद्ध – अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे ताब्यात घेतली.
  • 1894: छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.
  • 1989 : तणावग्रस्त संबंध सुधारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह हवाना, क्युबा येथे आले.
  • 1990 : भारतीय लघु उद्योग विकास बैंक (Small Industries Development Bank of India (SIDBI)) स्थापना झाली.
  • 1998 : निजामुद्दीन तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस कोकण रेल्वेवर धावू लागली.
  • 2011: भारताने 28 वर्षांनी क्रिकेट विश्वचषक जिंकला
हे देखील वाचा : मोबाईल विसरा, पुस्तकांच्या जादुई जगात फिरा! जाणून घ्या का साजरा केला जातो हा खास दिन अन् याचे महत्व

02 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष

  • 1618 : ‘फ्रॅन्सिस्को मारिया ग्रिमाल्डी’ – इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1805 : ‘हान्स अँडरसन’ – डॅनिश परिकथालेखक यांचा जन्म.
  • 1875 : ‘वॉल्टर ख्राइसलर’ – ख्राइसलर कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 18 ऑगस्ट 1940)
  • 1898 : ‘हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय’ – हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते व सरोजिनी नायडू यांचे बंधू यांचा जन्म. (मृत्यू: 23 जून 1990)
  • 1902 : पतियाळा घराण्याचे गायक बडे गुलाम अली खाँ यांचा जन्म. (मृत्यू: 25 एप्रिल 1968)
  • 1926 : कवी व गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: 15 जून 1979)
  • 1942 : भारतीय इंग्रजी-अभिनेते रोशन सेठ यांचा जन्म.
  • 1969 : हिंदी चित्रपट अभिनेता अजय देवगण यांचा जन्म.
  • 1972 : भारतीय नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांचा जन्म.
  • 1981 : भारतीय स्टँड-अप कॉमेडीयन कपिल शर्मा यांचा जन्म.
हे देखील वाचा  : अन्न भेसळीवर सरकारने बसवावा वचक! सणासुदीच्या काळात ठेवली पाहिजे करडी नजर

02 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1872 : ‘सॅम्युअल मोर्स’ – मोर्स कोड तारायंत्राचे जनक आणि चित्रकार यांचे निधन. (जन्म: 27 एप्रिल 1791)
  • 1933 : महाराजा के. एस. रणजितसिंह – क्रिकेट खेळाडू यांचे निधन. (जन्म: 27 एप्रिल 1791)
  • 1992: आगाजान बेग ऊर्फ आगा – हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते यांचे निधन.
  • 2005 : पोप जॉन पॉल (दुसरा) यांचे निधन. (जन्म: 18 मे 1920)
  • 2009 : गजाननराव वाटवे – गायक आणि संगीतकार यांचे निधन. (जन्म: 8 जून 1917)

Web Title: Kolhapur rajarshi chhatrapati shahu maharaj coronation april 2nd history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh
  • Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj

संबंधित बातम्या

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास
1

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..
2

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..
3

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…
4

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.