Crime Against Womens
एनसीआरबी अहवाल: केंद्र सरकर सरकारची राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB) देशभरातील गुन्हेगारीचा डेटा गोळा करते आणि तो अहवाल म्हणून प्रकाशित केला जातो. हा अहवाल केवळ आकडेवारीच देत नाही तर कोणत्या राज्यात किंवा शहरात कोणत्या प्रकारचे गुन्हे वाढले आहेत आणि कुठे सुधारणा करण्यात आल्या आहेत, यासंबंधीची माहिती प्रसिद्ध केली जाते.
नुकताच, २०२३ चा एनसीआरबीने देशभरातील गुन्हेगारीचा अहवाल प्रसिद्ध केला असून त्याचे आकडे धक्कादायक आहेत. महिला आणि मुलांवरील गुन्हे पुन्हा एकदा अव्वल स्थानावर आहेत, तर सायबर गुन्हे आणि आर्थिक गुन्हे देखील देशभरात वेगाने वाढले आहेत. तर, महिलांवरील सर्वाधिक गुन्हे कुठे होतात आणि एकूण गुन्हेगारी दरात कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे.
TVK Karur Stampede: करूर चेंगराचेंगरी प्रकरणात विजयला अटक होणार? पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई
एनसीआरबीच्या ताज्या अहवालानुसार, दिल्लीत महिलांवरील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहेत. या प्रकरणांमध्ये थोडीशी घट झाली असली तरी, महिला गुन्हेगारीच्या बाबतीत देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये दिल्ली अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, एकूण गुन्ह्यांच्या बाबतीत दिल्लीने अनेक राज्ये आणि शहरांना मागे टाकले आहे. २०२३ मध्ये, दिल्लीत महिलांविरुद्ध १३,३६६ गुन्हे दाखल झाले. मुंबईत ६,०२५ आणि बेंगळुरूतील ४,८७० पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
२०२२ च्या तुलनेत महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये ५.७ टक्क्यांनी घट झाली आहे. जेव्हा ही संख्या १४,२४७ होती. यामध्ये बलात्कार, छेडछाड, घरगुती हिंसाचार आणि हुंडाबळी यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. दिल्लीमध्ये महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांची संख्या इतर शहरांपेक्षा दुप्पट आहे.
NCRBच्या अहवालानुसार, संपूर्ण देशात सायबर गुन्ह्यांमध्ये ३१.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या अहवालानुसार, २०२२ मध्ये ६५,८९३ गुन्हे नोंदवले गेले, तर ताज्या अहवालानुसार, २०२३ मध्ये ८६,४२० गुन्हे नोंदवले गेले होते. एकूण गुन्ह्यांमध्ये कर्नाटक अव्वल आहे. कर्नाटकात २१,८८९ गुन्हे नोंदवले गेले होते. त्यानंतर १८,२३६ गुन्हे तेलंगणामध्ये नोंदवले गेले. १०,७९४ प्रकरणांसह उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. या गुन्ह्यांपैकी ६९ टक्के गुन्ह्यांमध्ये फसवणुकीचा समावेश होता. २०२३ मध्ये एकूण २०४,९७३ आर्थिक गुन्हे नोंदवले गेले, जे २०२२ च्या तुलनेत ६ टक्के जास्त आहे.
Devendra Fadnavis News: दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत देणार; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन
नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी) ने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये अनुसूचित जमाती (एसटी) विरुद्धच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. २०२२ मधील १०,०६४ प्रकरणांच्या तुलनेत २०२३ मध्ये एकूण १२,९६० प्रकरणे नोंदली गेली असून, ही वाढ २८.८ टक्क्यांची आहे.
दरम्यान, एनसीआरबीच्या २०२२ च्या ‘भारतातील गुन्हे’अहवालानुसार, अनुसूचित जातीं (एससी) विरुद्ध गुन्ह्यांमध्येही वाढती प्रवृत्ती दिसून आली आहे. देशभरात एससींविरुद्ध ५७,५८२ गुन्हे नोंदवले गेले, जे २०२१ मधील ५०,९०० प्रकरणांच्या तुलनेत १३.१% अधिक आहेत. गुन्ह्यांचा दर देखील २०२१ मधील २५.३ वरून २०२२ मध्ये २८.६ वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, दलित आणि आदिवासी समुदायांवरील अत्याचारांची वाढती नोंद ही सामाजिक सुरक्षेविषयी गंभीर चिंता व्यक्त करणारी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मणिपूरमध्ये २०२२ मध्ये अनुसूचित जमातींविरुद्ध फक्त एकच गुन्हा दाखल झाला होता परंतु २०२३ मध्ये त्यात अनपेक्षित वाढ झाली. २०२३ मध्ये ३,३९९ गुन्हे नोंदवले गेले. २०२२ मध्ये फक्त एकच गुन्हा नोंदवला गेला तर २०२१ मध्ये अनुसूचित जमातींविरुद्ध गुन्ह्याचा एकही गुन्हा नोंदवला गेला नाही. मे २०२३ पासून राज्यात मेतेई आणि कुकी-झो समुदायांमध्ये जातीय हिंसाचार (मणिपूरमध्ये संघर्ष) सुरू आहे.