टीव्हीके पक्षाच्या अडचणी वाढणार (फोटो- ani)
टीव्हीके पक्षाच्या अडचणी वाढणार
मद्रास हायकोर्टाने पुढे ढकलली सुनावणी
अभिनेता विजयला अटक होणार?
अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळ्ळगम पक्षाचा नेता विजय थलापतीच्या रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विजय थलापती हा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकला आहे. दरम्यान या प्रकरणातील सुनावणी मद्रास हायकोर्टाने पुढे ढकलली आहे. दरम्यान या चेंगराचेंगरीत 40 लोकांचा हकनाक मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसानी मोठी कारवाई केली आहे.
कारूर चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी टीव्हीके पक्षाच्या जिल्हा सचिवांना अटक केली आहे. कारूर येथे झालेल्या चेंगराचेंगरीत 41 जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. या प्रकरणात अनेक वरिष्ठ नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विजय थलापती याची सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 40 लोकांचा मृत्यू झाला.
27 सप्टेंबर रोजी अभिनेता विजय याच्या पक्षाच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 40 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. विजय आपल्या रॅलीमध्ये जाणूनबुजून उशिरा आल्याचा आरोप केला जात आहे.
टीव्हीके पक्षाच्या रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर त्यांच्या पक्षाला कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी देऊ नये अशी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. दरम्यान मद्रास हायकोर्टात त्याच्यावर सुनावणी होणार होती. मात्र मद्रास हायकोर्टाने होणारी सुनावणी रद्द केली आहे.
Karur Stampede: TVK ची रॅलीसाठी विनवणी, मद्रास हायकोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय, आता काय होणार?
समोर आलेल्या माहितीनुसार, रॅली दरम्यान अचानक लाइट गेली. त्यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली. तेथे उपस्थित असलेले लोक प्रकाशाच्या दिशेने म्हणजेच लाइट्सच्या दिशेने धावले. ज्यामुळे स्थिती बिघडली. यामध्ये तब्बल 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी टीव्हीके पक्षाच्या अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मद्रास हायकोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय
टीव्हीके पक्षाच्या रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर त्यांच्या पक्षाला कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी देऊ नये अशी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. दरम्यान मद्रास हायकोर्टात आज त्याच्यावर सुनावणी होणार होती. मात्र मद्रास हायकोर्टाने आज होणारी सुनावणी रद्द केली आहे.
मोठी घोषणा अन् चेंगराचेंगरी, ३३ लोकांचा मृत्यू,अनेक बेपत्ता; थलापती विजयच्या रॅलीत झालं तरी काय?
मद्रास हायकोर्टात आज याचिकाकर्त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार होती. तामिळनाडू डिजीपी यांनी टिव्हिके पक्षाच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये असे आदेश देण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती. करूर येथे चेंगराचेंगरी झालेल्या घटनेची चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतीही परवानगी देऊ नये अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती.