
international mother earth day 2026 theme our power our planet marathi news special report
International Mother Earth Day 2026 : आज २२ एप्रिल! आपण ज्या पृथ्वीवर श्वास घेतो, जिच्या अन्नावर जगतो आणि जिच्या कुशीत वाढतो, त्या पृथ्वीमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस (international mother earth day 2026). १९७० मध्ये अमेरिकेतून सुरू झालेली ही चळवळ आज एक जागतिक जनआंदोलन बनली आहे. मात्र, ५६ वर्षांनंतरही आपण खरोखरच पृथ्वी सुरक्षित केली आहे का? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. २०२६ च्या ‘वसुंधरा दिना’ची संकल्पना “Our Power, Our Planet” ही आपल्याला आपल्या वैयक्तिक ताकदीची जाणीव करून देण्यासाठी मांडण्यात आली आहे.
वसुंधरा दिनाची मुहूर्तमेढ शांततावादी कार्यकर्ते जॉन मॅककॉनेल आणि अमेरिकन सिनेट सदस्य गेलॉर्ड नेल्सन यांनी रोवली. पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्यास काय परिणाम होऊ शकतात, हे जगाला दाखवण्यासाठी त्यांनी या दिवसाची सुरुवात केली. २००९ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी याला अधिकृत मान्यता दिली. आजच्या घडीला १८० पेक्षा जास्त देशांमध्ये कोट्यवधी लोक या मोहिमेत सहभागी होतात. पण हा दिवस केवळ भाषणांपुरता मर्यादित न राहता, तो प्रत्यक्ष कृतीचा दिवस व्हावा, अशी अपेक्षा पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इराणला कमी लेखण्याची चूक भोवली! इराणसमोर अमेरिकेची प्रतिमा धुळीस, टीकेची झोड
वाढते प्रदूषण आणि हवामान बदल (Climate Change) यामुळे पृथ्वी सध्या ‘आयसीयू’मध्ये असल्यासारखी स्थिती आहे. जागतिक तापमानात झालेली वाढ, उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवरील वितळणारे बर्फ आणि समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीमुळे अनेक बेटे पाण्याखाली जाण्याची भीती आहे. तसेच, प्लास्टिक प्रदूषण हे आजच्या काळातील सर्वात मोठे ‘स्लो पॉयझन’ ठरत आहे. समुद्रातील माशांपासून ते आपण खातो त्या अन्नापर्यंत मायक्रोप्लास्टिक पोहोचले आहे. जंगलतोडीमुळे जैवविविधता धोक्यात आली असून अनेक प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजाती कायमच्या नष्ट झाल्या आहेत.
2026 International Earth Day: The heart of all matter is God
God is inherently present to the whole of creation and every part of it. Teilhard de Chardin says: “The heart of all matter is the heart of God… Read more: https://t.co/UASjnRfaMT pic.twitter.com/ak5lPDYcw5 — St Columbans Mission (@ColumbanMission) April 21, 2026
credit – social media and Twitter
यावर्षीचा मुख्य भर हा अक्षय ऊर्जेच्या (Renewable Energy) वापराकडे वळण्यावर आहे. कोळसा आणि पेट्रोल-डिझेलच्या अतिवापरामुळे होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि हायड्रोजन इंधनाचा वापर वाढवणे काळाची गरज आहे. “Our Power” म्हणजे केवळ सरकार किंवा मोठ्या कंपन्यांची ताकद नव्हे, तर तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य माणसांची निवड! आपण कोणते उत्पादन वापरतो, आपण कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करतो आणि आपण निसर्गाला किती महत्त्व देतो, यावरच पृथ्वीचे भविष्य अवलंबून आहे.
१. प्लास्टिकचा त्याग: प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करा.
२. वृक्षारोपण: आपल्या वाढदिवशी किंवा कोणत्याही खास प्रसंगी किमान एक झाड लावा आणि ते जगवा.
३. पाण्याची बचत: पाण्याचा थेंब न थेंब वाचवा, पावसाचे पाणी जमिनीत जिरवा (Rainwater Harvesting).
४. ऊर्जा बचत: विनाकारण दिवे आणि पंखे चालू ठेवू नका, सौर उपकरणांचा वापर करा.
५. जनजागृती: आपल्या कुटुंबात आणि मित्रमंडळींमध्ये पर्यावरणाचे महत्त्व सांगा.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Light Pollution : भारत-चीनचा विकास की धोका? दोन देशांमुळे बिघडतोय पृथ्वीचा समतोल?
पृथ्वी ही आपल्याला पूर्वजांकडून मिळालेली मालमत्ता नसून ती आपण आपल्या पुढच्या पिढीकडून उसनी घेतलेली ठेव आहे. जर आपण आज निसर्गाशी संतुलन राखले नाही, तर भविष्यातील पिढ्यांना फक्त प्रदूषित हवा आणि उघड्या-बोडक्या टेकड्याच पाहायला मिळतील. आजच्या दिवशी आपण सर्वांनी मिळून संकल्प करूया—”माझी पृथ्वी, माझी जबाबदारी!”