आजच्या दिवशी कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज राज्याभिषेक झाला होता (फोटो - सोशल मीडिया)
आजच्या जिवशी 1894 साली छत्रपती राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) यांचा राज्याभिषेक झाला. त्यांचा राज्याभिषेक हा कोल्हापूरच्या इतिहासातील एक परिवर्तनकारी क्षण ठरला. १८९४ साली गादीवर आरूढ होताच त्यांनी समाजातील वंचित, शोषित आणि मागास घटकांच्या उन्नतीसाठी कार्याला सुरुवात केली. राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाला प्राधान्य देत मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू केले. अस्पृश्यतेविरोधात कठोर भूमिका घेत त्यांनी समाजात समतेचा संदेश दिला. आरक्षणाची संकल्पना राबवून मागासवर्गीयांना संधी देणारे ते पहिले शासक ठरले. त्यांच्या कार्यकाळात पाणीपुरवठा, शेती, उद्योग आणि सहकार क्षेत्रातही मोठी प्रगती झाली. सामान्य जनतेच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी अनेक विकासकामे केली. राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक केवळ सत्ता हस्तांतरण नव्हता, तर सामाजिक न्याय आणि समतेच्या युगाची सुरुवात होती. त्यांनी कलाकार, खेळाडू आणि पैलवान यांना राजाश्रय दिला. (Dinvishesh)
02 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
02 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष
02 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष






