Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Tiger Day: वाघ वाढले अन् आता जंगल कमी पडतेय! व्याघ्रसंवर्धनाचे यश की सहअस्तित्वाची नवी परीक्षा?

वाघाला स्वतःचे स्वतंत्र क्षेत्र आवश्यक असते. त्यामुळे संख्या वाढताच तरुण वाघ नवीन अधिवासाच्या शोधात जंगलाबाहेर पडतात. अनेकदा त्यांचा मार्ग शेती, गावांच्या वेशी आणि रस्त्यांमधून जातो.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 29, 2026 | 04:11 PM
World Tiger Day: वाघ वाढले अन् आता जंगल कमी पडतेय! व्याघ्रसंवर्धनाचे यश की सहअस्तित्वाची नवी परीक्षा?

World Tiger Day: वाघ वाढले अन् आता जंगल कमी पडतेय! व्याघ्रसंवर्धनाचे यश की सहअस्तित्वाची नवी परीक्षा?

Follow Us
Follow Us:

वाघांची संख्या वाढत असताना त्यांचे अधिवास वाढलेले नाहीत”
महाराष्ट्राने व्याघ्र संवर्धनात उल्लेखनीय यश मिळवले
जंगलातील परिसंस्था होतेय अधिक सक्षम

सुनयना सोनवणे /पुणे: कधीकाळी वाघ वाचवण्याची चिंता होती. आज त्यांच्यासाठी जंगल वाचवण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील व्याघ्रसंवर्धनाचे हे यश जितके अभिमानास्पद आहे, तितकेच ते नवे प्रश्नही निर्माण करते. वाघांची संख्या वाढत असताना त्यांचे अधिवास मात्र वाढलेले नाहीत. परिणामी, जंगलाबाहेर पडणारे वाघ आणि वाढता मानव-वन्यजीव संघर्ष हे संवर्धनासमोरील नवे वास्तव बनले आहे.
चिखलातील पंजांचे ठसे आता केवळ जंगलापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ते गावांच्या वेशीपर्यंत पोहोचत आहेत. काही वर्षांपूर्वी अपवाद असलेले हे चित्र आता महाराष्ट्रातील अनेक भागांत दिसते. व्याघ्रसंवर्धनाच्या यशाची ही खूण असली, तरी त्याचबरोबर नव्या संघर्षाची चाहूलही आहे.

महाराष्ट्राने व्याघ्र संवर्धनात उल्लेखनीय यश मिळवले आहे. २०१८ मध्ये राज्यात ३१२ वाघ होते. २०२२ च्या व्याघ्र गणनेत ही संख्या ४४४ वर पोहोचली. ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतील संरक्षण, शिकारीवर नियंत्रण आणि अधिवास व्यवस्थापनामुळे हे यश शक्य झाले. ही वाढ केवळ आकडेवारी नाही, तर जंगलातील परिसंस्था अधिक सक्षम होत असल्याचे द्योतक आहे.

मात्र प्रत्येक वाघाला स्वतःचे स्वतंत्र क्षेत्र आवश्यक असते. त्यामुळे संख्या वाढताच तरुण वाघ नवीन अधिवासाच्या शोधात जंगलाबाहेर पडतात. अनेकदा त्यांचा मार्ग शेती, गावांच्या वेशी आणि रस्त्यांमधून जातो. विदर्भासह राज्यातील अनेक भागांत पाळीव जनावरांवरील हल्ले, मानवी जीवितहानी आणि भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. दुसरीकडे, रस्ते अपघात, रेल्वेमार्ग, विषबाधा आणि अधिवासाचे तुकडीकरण यामुळे वाघांच्याही अस्तित्वावर धोका निर्माण होत आहे.

देवनार कत्तलखान्यातून मांस का खरेदी केले जात नाही? राणीबागेतील वाघांना दिले जाते निकृष्ट दर्जाचे मांस

आज व्याघ्र संवर्धन केवळ जंगलापुरते मर्यादित राहिलेले नाही. जंगलातील प्रत्येक हालचालीवर आता तंत्रज्ञानाची नजर आहे. कॅमेरा ट्रॅप वाघांची ओळख पटवतात, रेडिओ कॉलर त्यांच्या स्थलांतराचा मागोवा घेतात, ड्रोन दुर्गम भागांवर लक्ष ठेवतात, तर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हजारो छायाचित्रांचे विश्लेषण करून संभाव्य संघर्षग्रस्त क्षेत्रांचा अंदाज देते. त्यामुळे संवर्धन अधिक वैज्ञानिक आणि परिणामकारक होत आहे.

तज्ज्ञांच्या मते, व्याघ्र संवर्धनाचा पुढील टप्पा म्हणजे केवळ ‘संख्यावाढ’ नव्हे, तर ‘सहअस्तित्व’ आहे. जंगलातील अधिवास वाढवणे, वन्यजीव कॉरिडॉरचे संरक्षण, स्थानिकांना वेळेवर नुकसानभरपाई, जनजागृती आणि विकासकामांमध्ये पर्यावरणीय नियोजन यांवर भर दिल्याशिवाय संघर्ष कमी होणार नाही.

‘व्याघ्रसंवर्धनाचे खरे यश वाघांची संख्या मोजण्यात नाही, तर त्यांना सुरक्षित जंगल आणि माणसाला सुरक्षित आयुष्य देणारे सहअस्तित्व निर्माण करण्यात आहे. अन्यथा प्रत्येक व्याघ्र गणनेत वाढणारे आकडे आनंद देतील; पण गावाच्या वेशीवर उमटणारे पंजांचे ठसे नव्या संघर्षाची आठवण करून देत राहतील.’
– उत्कर्ष पाटील, वन्यजीव अभ्यासक

व्याघ्रसंवर्धन एका नजरेत –
भारतातील एकूण वाघ (२०२२) : ३,६८२
जगातील जंगली वाघांपैकी भारतातील वाटा : सुमारे ७५%
भारतातील व्याघ्र प्रकल्प : ५८
व्याघ्र राखीव क्षेत्र : ८२,८३६ चौ. कि.मी. (देशाच्या सुमारे २.५% भूभाग)

Bhandara: भंडाऱ्यात वाघाचा धुमाकूळ; 15 दिवसांत 2 जणांचा बळी, वाघाच्या भीतीने मुले शाळेत जाईना; गावकऱ्यांत भीती

वाघसंख्येत आघाडीची राज्ये (२०२२)
* मध्य प्रदेश – ७८५
* कर्नाटक – ५६३
* उत्तराखंड – ५६०
* महाराष्ट्र – ४४४
* तामिळनाडू – ३०६

महाराष्ट्रातील वाघसंख्या
* २०१४ – १९०
* २०१८ – ३१२
* २०२२ – ४४४
* २०१८ ते २०२२ वाढ – सुमारे ४२%

Web Title: Maharashtra achieved remarkable success in tiger conservation number increase tiger reserve project tadoba news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • Nagpur News
  • tiger
  • Tiger Project

संबंधित बातम्या

Nitin Gadkari : ‘जातीच्या नावाखाली तिकीट घेणारा…’ जातीच्या राजकारणावर गडकरींचा निशाणा
1

Nitin Gadkari : ‘जातीच्या नावाखाली तिकीट घेणारा…’ जातीच्या राजकारणावर गडकरींचा निशाणा

Nagpur News :दत्ता मेघे इन्स्टिट्यूट झाले अदानीचे
2

Nagpur News :दत्ता मेघे इन्स्टिट्यूट झाले अदानीचे

Nagpur News : जिल्ह्यातील १४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित
3

Nagpur News : जिल्ह्यातील १४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

Nagpur News : कोराडी उड्डाणपुलाला ‘ब्लॉक ‘चा ब्रेक
4

Nagpur News : कोराडी उड्डाणपुलाला ‘ब्लॉक ‘चा ब्रेक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.