फोटो सौजन्य- सोशल मीडिया
National Book Reading Day : राष्ट्रीय पुस्तक वाचन दिन हा दरवर्षी 6 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश वाचनाच्या महत्त्वाला ओळख देणे आणि लोकांना पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. वाचनामुळे माणसाच्या ज्ञानात वाढ होते, विचारशक्ती वाढते आणि मनोरंजनाच्या माध्यमातून आपली सृजनशीलता अधिक प्रखर होते. आजच्या डिजिटल युगात, लोकांच्या हातात मोबाईल, लॅपटॉप जास्त असतो, पण पुस्तक वाचनाचं महत्त्व मात्र कमी होत चाललं आहे.
नॅशनल पुस्तक वाचन दिन निमित्ताने, आपण स्वतःला आणि इतरांना एक पुस्तक वाचण्याचं आवाहन करू शकतो. यातून केवळ माहितीच मिळत नाही तर आपल्याला वेगवेगळ्या संस्कृती, विचारधारा, आणि अनुभवांशी जोडले जातं. वाचनामुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते, स्मरणशक्ती सुधारते, आणि मानसिक तणाव कमी होतो.






