Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पांरपारिक पत्रांपासून ते डिजिटल सेवांपर्यंत… ; पुण्याच्या टपाल खात्याने स्वत:ला कसे बदललं? लोकांचा पोस्टमनवर ‘विश्वास’ कायम

Pune Postal Service : बदलते युग आणि डिजिटल क्रांतीतनंतरही पुणे टपाल सेवा आणि पोस्टमनवर अजूनही पुणेकरांचा विश्वास कायम आहे. सायकलपासून सुरु झालेला प्रवास आता डिजिटल बँकिंग आणि आधार सेवेपर्यंत पोहोचला आहे. याची रंजक कहाणी जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: May 26, 2026 | 08:17 AM
Pune Postal Service

Pune Postal Service

Follow Us
Follow Us:
  • पांरपारिक पत्रांपासून ते डिजिटल सेवांपर्यंत
  • पुण्याच्या टपाल खात्याने स्वत:ला कसे बदललं?
  • लोकांचा पोस्टमनवर ‘विश्वास’ कायम
Pune Postal Service : किरण ढोणे : मोबाईल, इंटरनेट आणि डिजिटल युगामुळे संवादाची साधने बदलली असली, तरी प्रत्येक घरापर्यंत विश्वासाने पोहोचणारी सेवा म्हणजे टपाल सेवा. उन्हाचा कडाका असो, मुसळधार पाऊस असो किंवा वाहतुकीची कोंडी. पोस्टमन मात्र रोजच्या रोज नागरिकांच्या दारात पत्र, पार्सल आणि पेन्शन पोहोचवत असतात.

वानवडी विभागात कार्यरत असलेले पोस्टमन विजय बबन दांडेकर सांगतात, “टपाल खात्यात ३५ वर्षे झाली. त्यापैकी १९ वर्षे पोस्टमन म्हणून काम करतोय. आधी सायकलवरून पत्र वाटायचो, आता दुचाकी आली; पण कष्ट काही कमी झालेले नाहीत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरोघरी पत्रं पोहोचवताना लोकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंदच आमच्या कामाची खरी पावती असते.”

World Thyroid Day : सुस्त जीवनशैलीमुळे वाढतोय थायरॉईडचा विळखा; जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि बचावाचे सोपे उपाय

दररोज ७० ते ८० पत्रे आणि पार्सल पोहोचवण्यासाठी पोस्टमनना अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. वाढते तापमान, पावसाळ्यातील अडचणी, वाहतूक आणि कामाचा वाढता ताण यामुळे त्यांचे जीवन अधिक कष्टमय बनले आहे. तरीही लोकांच्या सुख-दुःखाच्या बातम्या वेळेत पोहोचवण्याची जबाबदारी ते प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.

कोथरूड टपाल विभागातील पोस्टमन उषा जगताप सांगतात, “सकाळी कार्यालयात गेल्यावर टपालाची छाननी करावी लागते. त्यानंतर विभागनिहाय पत्रांचे वाटप होते आणि आम्ही वितरणासाठी बाहेर पडतो. उन्हामुळे खूप त्रास होतो, थकवाही येतो; पण वेळेत सेवा पोहोचवणे गरजेचे असते. नागरिकांकडून मिळणारे कौतुक आमच्यासाठी मोठे बळ असते.”

पुण्यातील पोस्टमन आज केवळ पत्रवाटप करत नाहीत, तर स्पीड पोस्ट, आधार सेवा, बचत योजना, विमा सेवा आणि पार्सल वितरण यांसारख्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यामुळे बदलत्या काळातही टपाल विभागावरील लोकांचा विश्वास कायम असल्याचे दिसून येते.

पुण्यातील टपाल सेवेचा इतिहास आणि बदल

भारतात आधुनिक टपाल सेवेची अधिकृत सुरुवात १८५४ मध्ये झाली. पुणे जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ) इमारतीची उभारणी सुमारे १८७२ मध्ये ब्रिटिश काळात करण्यात आली. पुणे जीपीओसमोर असलेला ‘झिरो माइल स्टोन’ किंवा ‘झिरो किलोमीटर दगड’ हा शहरातील अंतर मोजण्याचा मूळ संदर्भबिंदू मानला जातो. या दगडापासून इतर शहरांचे अंतर मोजले जात असे.

हा दगड ब्रिटिशांच्या ‘ग्रेट ट्रिगोनोमेट्रिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ मोहिमेचा भाग होता. देशभरात अशा सुमारे ८० झिरो माइल स्टोन उभारण्यात आले होते. पुणे टपाल विभागात पुणे, सातारा, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश असून, या विभागात २,१८३ शाखा टपाल कार्यालये, ४८६ उपटपाल कार्यालये आणि १० मुख्य टपाल कार्यालये कार्यरत आहेत.

मागील तीन वर्षांत झालेले महत्त्वाचे बदल

  • टपाल सेवेत डिजिटल व्यवहारांची सुविधा वाढवण्यात आली. काही प्रमुख कार्यालयांत टॅबलेटद्वारे डिजिटल पेमेंट सेवा सुरू करण्यात आली.
  • आधार कार्ड अद्ययावत करणे, बचत योजना, विमा आणि पार्सल सेवा यांना अधिक प्राधान्य देण्यात आले.
  • ‘एडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी (APT) 2.0’ प्रणाली लागू करून टपाल व्यवहार अधिक संगणकीकृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
  • वाढत्या शहर विस्तारामुळे बाणेरसारख्या भागांत नवीन उपटपाल कार्यालये सुरू करण्यात आली.

ग्रामीण भागातील पोस्टमनचे महत्व

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आजही पोस्टमनच नागरिकांसाठी बँक, माहिती केंद्र आणि शासकीय सेवांचा आधार ठरत आहे. दुर्गम गावांमध्ये पत्रांसोबतच पेन्शन, आधार सेवा, बँकिंग व्यवहार आणि शासकीय कागदपत्रे पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी पोस्टमन पार पाडत आहेत.

पुणे विभागाचे पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जयभाये म्हणाले, “डिजिटल युगात टपाल विभागाने स्वतःमध्ये मोठे बदल केले आहेत. पारंपरिक पत्रसेवेसोबतच आता पार्सल, आधार सेवा, आर्थिक सेवा आणि डिजिटल व्यवहार यांवर अधिक भर दिला जात आहे. मात्र, या सगळ्या बदलांमध्ये पोस्टमन हा नागरिक आणि टपाल विभाग यांच्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा आजही कायम आहे.”

World Football Day 2026 : गोल, जोश आणि जगभरातील चाहत्यांचा जल्लोष! जाणून घ्या ‘जागतिक फुटबॉल दिन’ का आहे इतका खास?

Web Title: Pune postal service trust from letters to digital services

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 07:30 AM

Topics:  

  • Marathi News
  • pune news

संबंधित बातम्या

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव
1

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित
2

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल
3

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी
4

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.