लातूर : जिल्ह्यात जवळपास १० च्यावर साखर कारखाने आहेत. साखर कारखान्याचे प्रशासन सांगत आहे की विक्रमी ऊस गाळप झाला आहे, पण कारखान्याच्या क्षेत्रातील सभासदांचा, शेतकऱ्यांचा ऊस शेतात उभा आहे, त्या उसाला तूरे फुटत आहेत. मग साखर कारखान्यांनी नेमका कोणाचा, कुठल्या ऊसाचे विक्रमी गाळप केले असा प्रश्न माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
लातूर जिल्ह्यातील ऊस गळपाचा प्रश्न गंभीर बनला आहे. १४-१५ महिने होऊनही ऊस तोड न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. याची दखल घेऊन माजी पालकमंत्री तथा निलंगा विधासभेचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी चक्क उसाच्या फडातच पत्रकार परिषदेचे आयोजन करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.यावेळी पत्रकारांशी बोलताना आ. पाटील म्हणाले की, कारखाने लबाडी करत आहेत, सभासद व कारखाना क्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर घेऊन न जाता बाहेरील उसाचे गाळप करण्यात येत आहे. जर कारखान्यांनी विक्रमी ऊस गाळप केला असेल तर शेतकऱ्यांच्या शेतात उसाचे टिपूर ही शिल्लक राहिले नसते. कारखान्यांनी कार्यक्षेत्रा बाहेरील ऊस गाळप केल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात शेतकरी यांना गावात फिरू देणार नाहीत. ऊसाचे टिपूर घेऊन त्यांना जाब विचारतील. विरोधी पक्ष म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी सरकारला धारेवर धरणारच. सरकारने शेतकऱ्याचा अंत पाहू नये.
[read_also content=”आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा! 2050 मध्ये भारतातील ही दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार; यापूर्वी जगात पाच शहरे पूर्णपणे समुद्रात बुडाली https://www.navarashtra.com/maharashtra/there-will-be-a-big-natural-disaster-in-2050-these-two-major-cities-in-india-will-sink-into-the-sea-earlier-five-cities-in-the-world-were-completely-submerged-in-the-sea-241986.html”]