Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sri Sri Ravi Shankar :आधुनिक काळातील ऋषींच्या आध्यात्मिक प्रवासाचे रहस्य काय? पहा एका क्लिकवर

Sri Sri Ravi Shankar :नारद भक्ती सूत्रातील 'परमप्रेमरूपा' भक्तीचे साक्षात उदाहरण म्हणजे श्री श्री रविशंकर. त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांचा बालपणीचा प्रवास, सुदर्शन क्रियेचा जन्म आणि जागतिक शांततेसाठी त्यांचे यो

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 13, 2026 | 09:40 AM
Sri Sri Ravi Shankar

Sri Sri Ravi Shankar

Follow Us
Follow Us:

Sri Sri Ravi Shankar : नारद भक्ती सूत्रात भक्तीची व्याख्या करताना नारद मुनींनी म्हटले की, “सा त्वस्मिन परमप्रेमरूपा “ म्हणजेच भक्ती हे साक्षात परम प्रेमाचे रूप आहे. प्रेम आणि शांतीचे प्रतीक असलेले श्री श्री रविशंकरजी हे एक आदर्श उदाहरण आहेत. आज आपण त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल जाणून घेऊया..

जन्म, बालपण आणि शिक्षण

श्री श्री रविशंकर यांचा जन्म १३ मे १९५६ रोजी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी तामिळनाडूतील पापनाशम येथे झाला. बालपणापासूनच अत्यंत शांत आणि गंभीर वृत्तीचे असणारे रविशंकर, जेव्हा इतर मुले खेलण्यात व्यस्त असत, तेव्हा ते तासनतास ध्यानात मग्न असत. त्यांच्या या आध्यात्मिक ओढीमुळे आई विशालाक्षी पूजेची भांडी लपवून ठेवत असे. आद्य शंकराचार्यांच्या जयंतीदिनी त्यांचा जन्म झाल्याने ते संन्यासी होतील, अशी भीती त्यांना वाटत असे. असे म्हटले जाते की बालपणी त्यांच्या केवळ स्पर्शाने अनेकांचे शारीरिक कष्ट दूर होत असे.

लहानपणापासून चाणाक्ष बुद्धीमत्ता असणारे रवीशंकर यांना पहिल्या इयत्तेऐवजी थेट चौथ्या इयत्तेत प्रवेश देण्यात आला होता. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्यांना संस्कृत गीता आणि वैदिक ऋचा अवगत होत्या. त्यांनी आधुनिक विज्ञानात पदवी मिळवण्याबरोबरच वैदिक साहित्याचा सखोल अभ्यास केला होता.

water conservation day: कोण होते महाराष्ट्राचे ‘जलनायक’? ज्यांच्या कार्यामुळे १० मे रोजी साजरा होतो ‘जलसंधारण दिन’!

आध्यात्मिक प्रवास आणि सुदर्शन क्रिया

मार्च १९८२ मध्ये शिमोगा येथे त्यांना दैवी आध्यात्मिक अनुभव आला आणि त्यातूनच सुदर्शन क्रिया जन्माला आली. १९७५ मध्ये अवघ्या १९ व्या वर्षी बंगळूरू येथील सभेत ‘वैदिक ज्ञान आणि विज्ञान’ या विषयावर भाषण देऊन त्यांनी सर्वाना मंत्रमुग्ध केले. सुरवातीच्या आध्यात्मिक प्रवासात ते महर्षी योगी याच्याशी जोडले गेले. परंतु १९८३ पासून त्यांनी स्वतंत्रपणे सुदर्शन क्रियेचा प्रचार सुरू केला. स्वट्झर्लंडमध्ये त्यांनी पहिला वर्ग घेतला आणि आज १८० देशात त्यांचे कार्य पसरले आहे.

Nurses Day: रुग्णांच्या सेवेसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या परिचारिकांना मानाचा मुजरा! आता यंदाच्या ‘नर्स डे’ची खास थीम पहा एका क्लिकवर..

आश्रम आणि सामाजिक कार्य

१९८८ मध्ये बंगळुरजवळ एका लहान झोपडीत सुरू झालेला त्यांचा आश्रम आज विशाल वटवृक्ष झाला आहे. जगभरात शांती प्रस्थापित करण्यासाठी त्यांचे कार्य निरंतर सुरु आहे. त्यांच्या कुंडलीतील ग्रहयोग सुचवतात कि, आगामी काळात त्यांना अधिक मान सन्मान प्राप्त होईल आणि त्यांचे कार्य विश्वाच्या कल्याणासाठी प्रगतीपथावर राहील.

Web Title: Sri sri ravi shankar birthday spiritual journey sudarshan kriya benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • education
  • Happy Lifestyle

संबंधित बातम्या

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत
1

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’
2

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!
3

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार
4

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.