फोटो सौजन्य - सोशल मीडिया
परिचारिकांच्या या खास मह्त्त्वामुळे १२ मे हा दिवस विशेष आहे. पण याची सुरुवात कधी व कशी झाली? हे आता आपण जाणून घेऊया.
१२ मे १८२० रोची प्रसिद्ध परिचारिका फ्लोरेंस नाइटिंगेल यांचा जन्म झाला होता. त्यांच्याच स्मृतीप्रत्यर्थ दरवर्षी १२ मे रोजी अंतरराष्ट्रीय नर्स दिवस साजरा केला जातो.
नाइटिंगेल या केवळ परिचारिका नव्हत्या तर त्या एक समाजसुधारकही होत्या. क्रिमिया युद्धादरम्यान त्यांनी ज्या पद्धतीने काम केले, त्याचे कौतुक आजही जगभर होते. तसेच त्यांना ‘द लेडी विथ द लॅम्प’ या नावानेही ओळखले जाते, कारण त्या युद्धाच्या काळातही संसर्गजन्य आजाराने बाधित सैनिकांवर उपचार करत होत्या. त्यांच्या उपचारामुळे हजारो जखमी सैनिक पुन्हा बरे झाले. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे आज महिलांसाठी नर्सिंग हे क्षेत्र खुले झाले.
आजच्या दिवशी इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्स दरवर्षी खास थीम निश्चित करते. यानुसार यंदाची थीम “आमच्या परिचारिका, आमचे भविष्य: सेवेची आर्थिक शक्ती” अशी ठरवण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात जेव्हा सर्व कामे थांबली होती, तेव्हा लोकांच्या उपचाराकरिता परिचारिकांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.त्यांच्या सेवेची आठवण करून देणारा हा दिवस आहे.






