Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

water conservation day: कोण होते महाराष्ट्राचे ‘जलनायक’? ज्यांच्या कार्यामुळे १० मे रोजी साजरा होतो ‘जलसंधारण दिन’!

water conservation day: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा १० मे हा स्मृतीदिन राज्यभर 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा होतो. त्यांचे जलसंधारणातील योगदान आणि 'जलनायक' प्रवासाचा आढावा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 10, 2026 | 09:41 AM
Sudhakarrao Naik

Sudhakarrao Naik

Follow Us
Follow Us:

 

water conservation day: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांचा आज (१० मे) स्मृतीदिन असून हा दिवस महाराष्ट्र सरकारने ‘जलसंधारण दिन’ म्हणून घोषित केला आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ कायमचा नाहीसा करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र जलसंवर्धन खात्याची निर्मिती केली. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना ‘जलनायक’ म्हणून ओळख मिळाली.

सुधाकरराव नाईक यांचा जन्म यवतमाळमधील पुसदम येथील गहुली गावात झाला. त्यांचे वडील लोकनेते बाबासाहेब नाईक हे अत्यंत कडक शिस्तीचे तर काका वसंतराव नाईक हे मायाळू स्वभावाचे होते. लहानपणापासूनच अशा जेष्ठांच्या तालमीत सुधाकरराव नाईक यांनी राजकारणाचे धडे गिरवले असल्याने पुढे त्यांनी १९९१-९३ काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले.

Rabindranath Tagore : नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोरांच्या ‘या’ कवितेत दडलंय मनाच्या सामर्थ्यांचं गुपित? जयंतीनिमित्त वाचा सविस्तर

स्वतंत्र जलसंवर्धन खात्याची निर्मिती

सुधाकरराव नाईक यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात भीषण दुष्काळ होता. परंतु, जलसंवर्धन करण्यासाठी कोणत्याही योजना आणि पुरेसा निधी नसल्याने जलसंधारणाची कामे होत नव्हती. या काळातच जमीनीतील पाण्याची पातळी खूपच खालावली होती. या परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रातील जनतेला येत्या पाच ते दहा वर्षात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते याचा अंदाज बांधून त्यांनी स्वतंत्र जलसंवर्धन खात्याची निर्मिती केली. तसेच इतर योजनांमधील निधी जलसंधारणाकडे वळवला. त्यामुळे त्या काळात अनेक ठिकाणी जलसंवर्धनाची कामे यशस्वी झाली.

राज्य जलसंधारण सल्लागार समितीचे अध्यक्ष

स्वतंत्र जलसंवर्धन खात्याची निर्मिती केल्यानंतर त्यांनी राज्यभर दौरे करून भूजलपातळी वाढवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले. राज्य जलसंधारण सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जलचळवळ सुरू केली. तसेच जलसंधारणाचे कार्य झाले नाही तर भविष्यात महाराष्ट्राचे वाळवंट होईल असा इशारच त्यांनी त्यावेळी दिला होता. त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांचा स्मृतिदिन ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले.

Maharana Pratap Jayanti : मुघलांची प्रचंड सत्ता आणि मोठी प्रलोभने… तरीही महाराणा प्रताप अकबरासमोर का झुकले नाहीत?

शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचे सोडवले प्रश्न

त्यांनी त्यांच्या कार्यकाळात फक्त धरणं न बांधता पाणी अडवण्याचा आणि जिरवण्याच्या उपाययोजना अंमलात आणल्या. जमिनी सिंचनाखाली आणून शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. याच्या धाडसी प्रयत्नांमुळेच त्यांना ‘पाणीदार नेता’ म्हणून देखील ओळखले जाते.

Web Title: Sudhakarrao naik punyatithi maharashtra jalsandharan din water conservation day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 09:41 AM

Topics:  

  • cm of maharashtra
  • Dam Water Level

संबंधित बातम्या

खडकपूर्णा प्रकल्पात ७ टक्केच जलसाठा; बुलढाणा जिल्ह्यात मोजक्याच प्रकल्पांतच पुरेसा साठा, पेयजल अन् सिंचनाची चिंता वाढली
1

खडकपूर्णा प्रकल्पात ७ टक्केच जलसाठा; बुलढाणा जिल्ह्यात मोजक्याच प्रकल्पांतच पुरेसा साठा, पेयजल अन् सिंचनाची चिंता वाढली

Maharashtra Shasan : भटके-विमुक्त बांधवांच्या हक्कांसाठी विशेष अभियान! अभियानाची मुख्य माहिती, मूळ उद्देश काय ? 
2

Maharashtra Shasan : भटके-विमुक्त बांधवांच्या हक्कांसाठी विशेष अभियान! अभियानाची मुख्य माहिती, मूळ उद्देश काय ? 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.