फोटो सौजन्य - सोशल मीडिया
Rabindranath Tagore Jayanti: आजचा दिवस (७ मे) भारताच्या महान साहित्यिकांपैकी एक असलेल्या रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीचा आहे. संगीतकार, तत्त्वज्ञ, कवी आणि कलाकार अशा विविध भूमिकेतून रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय साहित्य आणि संगीताला एक नवी दिशा दिली. त्यांच्या कर्तव्याचा गौरव म्हणून त्यांना ‘बंगालचे कवी’ संबोधले जाते. मनाच्या सामर्थ्यांचं
‘कवीगुरू’ म्हणून वंदले जाणाऱ्या टागोर यांना ‘गीतंजली’ या काव्यसंग्रहासाठी साहित्त्यातील नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या कर्तत्वाची यादी ही भारत ते बांगलादेशाच्या राष्टगीत रचण्यापर्यंतच्या प्रवासात विस्तारली आहे. १९१९ साली घडलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून ब्रिटिशानी त्यांना ‘नाईटहूड’ (सर) पदवी परत देऊ केली.
तरी आज आपण त्यांच्या जयंती प्रसंगी गीतांजलीमधील एका कवितेच्या माध्यमातून त्यांच्या गहन विचारांचा बोध घेऊया…
जिथे मन निर्भय असते आणि मस्तक ताठ असते.
जिथे ज्ञान मुक्त असते.
जिथे जगाचे विभाजन संकुचित घरगुती भिंतींमुळे लहान लहान तुकड्यात झाले असते.
जिथे शब्द सत्याच्या गाभाऱ्यातून बाहेर पडतात.
जिथे अथक प्रयत्न परिपूर्णतेच्या दिशेने आपले बाहू पसरतात.
जिथे विवेकाचा निर्मळ प्रवाह मृतप्राय झालेल्या जुन्या चालीरीतीच्या रखरखीत वाळवंटात हरवून जात नाही.
जिथे तुझेच मार्गदर्शन लाभल्यामुळे मन सतत विस्तारणाऱ्या विचारांच्या आणि कृतीच्या दिशेने पुढे जात असते.
स्वातंत्र्याच्या अशा त्या स्वर्गात, हे माझ्या पित्या, माझ्या देशास जागृत होऊ दे.
गीतेच्या ३५ व्या अध्यायातील ही कविता ब्रिटिश राजवटीच्या काळात लिहली आहे. त्यामुळे टागोर एका अशा स्वातंत्र्य राष्ट्राचे स्वप्न पाहत होते. जिथे लोकांना निर्भय विचार करण्याचे आणि बोलण्याचे स्वातंत्र्य उपभोगता येईल. परंतु, हि कविता केवळ राजकिय स्वातंत्र्यापुरती मर्यादित नाही. ती आपल्या अंतर्मनातील सामर्थ्याविषयी आहे. एखाद्या व्यक्तीने खऱ्या अर्थाने निर्भय आणि स्पष्टवक्ता होण्यासाठी, मनातील मुक्तता मिळवण्यासाठी आत्मशंका, लोकांच्या टीकेचे, भीतीचे सर्व आंतरिक अडथळे पार केले पाहिजेत.
कवीगुरूंनी असेही व्यक्त केले आहे की, विचार सत्याच्या खोल गर्भातून आले पाहिजेत. ही कविता स्वत:शी सत्यनिष्ठ आणि प्रमाणिक असणे किती अत्यावश्यक आहे हे दर्शवते. सचोटीचा पहिला आविष्कार आतूनच होतो. कवी ‘माझा देश जागा होवो,’ याप्रकारे प्रार्थनेचा शेवट करतात. तेव्हा ते वैयक्तिक आणि सामूहिक अशा दोन्ही दृष्टीकेनांतून स्वातंत्र्याचे चित्रण करतात. ते म्हणतात की स्वातंत्र्याची पहिली ठिणगी मनात पेटली पाहिचे, जी नंतर राष्ट्रात पसरेल.






