Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Tribal Day 2026: ‘ट्रेडिंग रील्स’ ते ‘सांस्कृतिक वारसा’! नव्या पिढीसमोर कशी येतेय आदिवासी लोककला?

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआयटीआर ) च्या परिसरातील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाची स्थापना १९६५ मध्ये झाली. संग्रहालयात महाराष्ट्रातील आदिवासी जीवन, कला, हस्तकला आणि वाद्यांची माहिती जतन करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 09, 2026 | 02:35 AM
world tribal day 2026

world tribal day 2026

Follow Us
Follow Us:

पुण्यातील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय ठरते महत्त्वाचा संदर्भ
आदिवासी संस्कृती आता सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरांपर्यंत पोहोचतेय
९ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो जागतिक आदिवासी दिन

पुणे/गायत्री पवळे: जंगल, शेती, सण-उत्सव आणि सामुदायिक जीवनाशी जोडलेली आदिवासी संस्कृती आता सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरांपर्यंत पोहोचत आहे. विशेषतः जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी नृत्य, पारंपरिक वाद्ये आणि लोककलांचे व्हिडिओ ‘रील्स’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शेअर केले जातात. त्यामुळे पूर्वी विशिष्ट भौगोलिक परिसरापुरती मर्यादित असलेली ही वाद्यपरंपरा नव्या पिढीसमोर डिजिटल माध्यमातून येत आहे. मात्र, या वाद्यांकडे केवळ ‘ट्रेंडिंग कंटेंट’ म्हणून न पाहता त्यामागील सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्याची गरज आहे.

दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी १९९४ मध्ये हा दिवस निश्चित केला असून, १९८२ मध्ये जिनिव्हा येथे झालेल्या आदिवासी लोकसंख्येबाबतच्या संयुक्त राष्ट्रांच्या कार्यगटाच्या पहिल्या बैठकीच्या स्मरणार्थ ही तारीख निवडण्यात आली. महाराष्ट्रातील आदिवासी वाद्यपरंपरेचा अभ्यास करण्यासाठी पुणे हे महत्त्वाचे केंद्र आहे.

आदिवासी समाजात निसर्गाला का देव मानलं जातं? जाणून घ्या यामागील सांस्कृतिक आणि पारंपरिक कारणे

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआयटीआर ) च्या परिसरातील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाची स्थापना १९६५ मध्ये झाली. संग्रहालयात महाराष्ट्रातील आदिवासी जीवन, कला, हस्तकला आणि वाद्यांची माहिती जतन करण्यात आली आहे. येथे सुमारे १,३५९ वस्तू प्रदर्शित असून, त्यामध्ये विविध पारंपरिक वाद्यांचाही समावेश आहे. या संग्रहालयाच्या माहितीनुसार आदिवासी वाद्यांचे वायुवाद्य, तालवाद्य, तंतुवाद्य आणि सहाय्यक तालवाद्य असे वर्गीकरण केले जाते. वारली समाजातील ‘धाक’, कोरकू समाजातील ‘धिमकी’, माडिया गोंड समाजातील ‘मंदारी’, तसेच विविध समुदायांमध्ये वापरला जाणारा ढोल यांचा त्यात समावेश आहे.

यातील तारपा हे विशेष लक्षवेधी वाद्य आहे. वारली समाजाशी संबंधित तारपा वादनावर आधारित नृत्याची परंपरा महाराष्ट्रात आढळते. भारत सरकारच्या आदिवासी कार्य मंत्रालयाच्या ‘आदि कलाकार’ पोर्टलवरही तारपा नृत्याचा संबंध वारली समाजाशी नोंदविण्यात आला आहे. या नृत्याला कापणीच्या काळाशी जोडलेले सांस्कृतिक महत्त्व असल्याचे नमूद आहे.

World Tribal Day 2024: जागतिक आदिवासी दिवस 9 ऑगस्टलाच का साजरा केला जातो? जाणून घ्या रंजक इतिहास

आज तारपाचा आवाज पारंपरिक उत्सवांबरोबरच मोबाईलच्या स्क्रीनवरही ऐकू येतो. काही सेकंदांच्या रीलमधून वाद्याचे सूर, पारंपरिक वेशभूषा आणि समूह नृत्य लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे डिजिटल माध्यमे ही आदिवासी कलांसाठी नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी साधन ठरू शकतात. मात्र, या प्रक्रियेत वाद्याचा इतिहास, कलाकारांचे योगदान आणि समुदायाचा सांस्कृतिक संदर्भ जपणे तितकेच महत्त्वाचे आहे.तारपा ते रील्स हा केवळ तंत्रज्ञानाचा प्रवास नाही; तो परंपरेला नव्या माध्यमातून मिळालेल्या व्यासपीठाचा प्रवास आहे.

Web Title: Tarapa dance to social media reels world tribal day 2026 navarashtra special day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • navarashtra special
  • Tribal Community
  • world tribal day

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

International Podcast Day: ऑडिओ कंटेंट निर्मितीतील क्रांती म्हणजे पॉडकास्ट; वाचा कसा होता ‘या’ माध्यमाचा रंजक प्रवास?
2

International Podcast Day: ऑडिओ कंटेंट निर्मितीतील क्रांती म्हणजे पॉडकास्ट; वाचा कसा होता ‘या’ माध्यमाचा रंजक प्रवास?

Translation Day : ‘या’ खास दिवशी केला जातो जगाला जवळ आणणाऱ्या ‘ज्ञानदूतांचा’ गौरव; जाणून घ्या 30 सप्टेंबरचा रंजक इतिहास
3

Translation Day : ‘या’ खास दिवशी केला जातो जगाला जवळ आणणाऱ्या ‘ज्ञानदूतांचा’ गौरव; जाणून घ्या 30 सप्टेंबरचा रंजक इतिहास

World Rabies Day: कुत्रा किंवा कोणताही प्राणी चावल्यास घाबरू नका, ‘या’ 5 गोष्टी त्वरित करा; वाचू शकतो जीव
4

World Rabies Day: कुत्रा किंवा कोणताही प्राणी चावल्यास घाबरू नका, ‘या’ 5 गोष्टी त्वरित करा; वाचू शकतो जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.