Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Utqiagvik : अमेरिकेचा ‘हा’ भाग आता अंधारात बुडाला; २ महिने उगवणारच नाही सूर्य, जाणून घ्या यामागील रंजक वैज्ञानिक कारण

Utqiagvik darkness 64 days : अलास्कातील उटकियाग्विक शहराने वार्षिक "ध्रुवीय रात्री" मध्ये प्रवेश केला आहे. आता ते 64 दिवसांसाठी अंधारात बुडाले जाईल, थेट सूर्यप्रकाश मिळणार नाही.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 23, 2025 | 09:35 AM
The city of Utkiagvik Alaska has been in darkness for 64 days The sun will rise again in 2026

The city of Utkiagvik Alaska has been in darkness for 64 days The sun will rise again in 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • अलास्कातील उटकियाग्विक शहरात ६४ दिवस सूर्य उगवणार नाही, शहर ध्रुवीय रात्रीत दाखल.
  • सुमारे ४,४०० लोक पूर्ण अंधारात राहतील, फक्त नागरी संधिप्रकाशाचा हलका प्रकाश मिळेल.
  • ही घटना पृथ्वीच्या झुकावामुळे दरवर्षी घडते आणि सूर्य आता २२ जानेवारी २०२६ पर्यंत दिसणार नाही.

Utqiagvik darkness 64 days : हिवाळ्याने जगभर आपली चाहूल लावली आहे, परंतु अमेरिकेतील अलास्कामधील उटकियाग्विक (Utkiagvik Alaska in winter) (पूर्वीचे नाव बॅरो) शहरात परिस्थिती काहीशी वेगळी आणि धक्कादायक आहे. येथील लोकांनी वार्षिक “ध्रुवीय रात्री”चा सामना करण्यास सुरुवात केली आहे आणि आता संपूर्ण शहर ६४ दिवसांसाठी अक्षरशः अंधारात बुडणार आहे. २२ नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा अंधार आता थेट २२ जानेवारी २०२६ पर्यंत कायम राहणार आहे.

“ध्रुवीय रात्र” म्हणजे काय?

ही घटना पृथ्वीच्या अक्षावरील २३.५ अंश झुकावामुळे घडते. उत्तर ध्रुवाजवळील प्रदेशांमध्ये हिवाळ्यात सूर्य क्षितिजाखाली कायम राहतो आणि थेट सूर्यप्रकाश मिळत नाही. उटकियाग्विक हे ७१.१७° उत्तर अक्षांशावर असल्याने हे शहर पूर्णपणे आर्क्टिक सर्कलमध्ये मोडते. त्यामुळे येथे प्रत्येक वर्षी जवळपास दोन महिन्यांसाठी सूर्य उगवत नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Defense : पाकिस्तानने आता युद्धासाठी तयार राहावे, भारताचा धोरणात्मक संयम संपला; ‘Two-Front war’ साठी इंडियन आर्मी सज्ज

थंडीचा कहर आणि वातावरणातील बदल

उटकियाग्विकमधील तापमान दिवसातून क्वचितच शून्य अंशांपेक्षा वर जाते. समुद्राचे तापमानही फक्त ३७% वेळेस शून्यापेक्षा जास्त नोंदले जाते. सूर्यप्रकाशाचा अभाव आणि सततचा अंधार तापमान आणखी कमी करतो. तथापि, संपूर्ण काळोख नसतो. रहिवाशांना दररोज काही तास नागरी संधिप्रकाशाचा मंद निळसर प्रकाश अनुभवायला मिळतो, पण ते पुरेसे उजेड देत नाही.

Today the sun will rise at 12:26 in Utqiagvik (formerly known as Barrow), Alaska to set just 30 minutes later. It will be the last time the town sees the sun this year. Next sunrise will be on January 22nd, 2026 after 1561 hours of darkness. pic.twitter.com/0ZBNw4Wt9j — Massimo (@Rainmaker1973) November 17, 2025

credit : social media

रहिवासी कसे जगतात?

उटकियाग्विकमध्ये सुमारे ४,४०० लोक राहतात. कठोर हवामान, हिमवादळे आणि अंधार असूनही येथील रहिवाशांनी या वातावरणाशी स्वतःला जुळवून घेतले आहे. हिवाळ्यात जरी अंधार पसरलेला असला, तरी उन्हाळ्यात परिस्थिती याच्या अगदी उलट असते त्या वेळी येथे सतत ८० दिवस सूर्यास्त होत नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Japan-China Tensions : तैवान वादाचा स्फोट! जपान-चीन संघर्षात आता अमेरिकेची धडक एंट्री; Trumpने घेतली कोणाची बाजू?

सूर्य पुन्हा कधी दिसेल?

उटकियाग्विकमध्ये पुढील सूर्यउदय २६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १:२३ वाजता अपेक्षित आहे. हा दिवस “ध्रुवीय रात्रीचा शेवट” मानला जातो आणि शहरात पुन्हा प्रकाश आणि उबदारपणाची चाहूल लागते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उटकियाग्विकमध्ये सूर्य का उगवत नाही?

    Ans: पृथ्वीच्या २३.५° अक्षीय झुकावामुळे ध्रुवीय रात्री निर्माण होते.

  • Que: ही अंधाराची वेळ किती दिवस टिकते?

    Ans: सुमारे ६४ दिवस.

  • Que: सूर्य पुन्हा कधी उगवेल?

    Ans: २६ जानेवारी २०२६ रोजी.

Web Title: The city of utkiagvik alaska has been in darkness for 64 days the sun will rise again in 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 09:35 AM

Topics:  

  • America

संबंधित बातम्या

Japan-China Tensions : तैवान वादाचा स्फोट! जपान-चीन संघर्षात आता अमेरिकेची धडक एंट्री; Trumpने घेतली कोणाची बाजू?
1

Japan-China Tensions : तैवान वादाचा स्फोट! जपान-चीन संघर्षात आता अमेरिकेची धडक एंट्री; Trumpने घेतली कोणाची बाजू?

देशात थंडीचा कडाका आणखी वाढणार; दक्षिणेत पावसाचा इशारा
2

देशात थंडीचा कडाका आणखी वाढणार; दक्षिणेत पावसाचा इशारा

सोन्याहून महाग आहे ही एक ‘टॉयलेट सीट’, 107 कोटींना विकल्या जाणाऱ्या या वस्तूत नक्की आहे तरी काय?
3

सोन्याहून महाग आहे ही एक ‘टॉयलेट सीट’, 107 कोटींना विकल्या जाणाऱ्या या वस्तूत नक्की आहे तरी काय?

John Kiriakou : भारत पाकिस्तानला हरवेल! Ex-CIA अधिकाऱ्याचा धडाकेबाज दावा; इम्रान पक्षाला दिले धक्कादायक उत्तर
4

John Kiriakou : भारत पाकिस्तानला हरवेल! Ex-CIA अधिकाऱ्याचा धडाकेबाज दावा; इम्रान पक्षाला दिले धक्कादायक उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.