जपान आणि चीनमधील वादात अमेरिका कोणाच्या बाजूने उभी राहिली? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Japan-China Tensions : तैवानच्या (Taiwan) मुद्यावरून चीन (china) आणि जपानमध्ये (Japan) वाढत्या तणावाने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात नव्या सामरिक समीकरणांची सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने जपानसोबतची भागीदारी “अटळ आणि कायमस्वरूपी” असल्याचा पुनरुच्चार करत स्पष्ट इशारा दिला आहे “टोक्योवर धोका आला, तर वॉशिंग्टन मागे हटणार नाही!” जपानमधील अमेरिकेचे राजदूत जॉर्ज ग्लास यांनी केलेल्या या घोषणेने चीनच्या धोरणांवर थेट दबाव वाढला असून संपूर्ण प्रदेशात सुरक्षेचे समीकरण आणखी गुंतागुंतीचे बनत आहे.
अमेरिकन राजदूत जॉर्ज ग्लास यांनी सांगितले की, सेनकाकू बेटांसह जपानच्या संरक्षणाबाबत अमेरिका पूर्णतः वचनबद्ध आहे. पूर्व चीन समुद्रातील ही निर्जन बेटे जपानच्या प्रशासनाखाली आहेत; मात्र चीन त्यावर मालकीचा दावा करत त्यांना “दियाओयू” म्हणतो. अलीकडे चीनने या परिसरात नौदल गस्त आणि लष्करी हालचाली वाढवल्यानंतर परिस्थिती अधिक धोकादायक बनली. ग्लास यांनी चीनच्या वर्तनाला “चिथावणीखोर आणि प्रादेशिक स्थैर्यासाठी हानिकारक” असे संबोधले. त्यांनी चीनने जपानी सीफूड आयातबंदी आणि आर्थिक दबाव तंत्राला “एखाद्या मोठ्या शक्तीची आर्थिक जबरदस्ती” म्हटले.
China is threatening them now. They are accusing them of crimes from 80 years ago. That Japan ALREADY apologized for. Apologies are SIGNIFICANT for Japanese people. The United States invited Japan’s most powerful warship into -Pearl Harbor- to fly the Rising Sun. PAX AMERICANA pic.twitter.com/VbANTILNTw — Abides (@_Abides_) November 21, 2025
credit : social media
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Defense : पाकिस्तानने आता युद्धासाठी तयार राहावे, भारताचा धोरणात्मक संयम संपला; ‘Two-Front war’ साठी इंडियन आर्मी सज्ज
जपानचे पंतप्रधान साने ताकाची यांनी केलेल्या विधानामुळे वाद पेटला. त्यांनी म्हटले की,
“जर चीनने तैवानवर हल्ला केला, तर तो जपानसाठी अस्तित्वाचा धोका ठरेल आणि जपान सामूहिक स्वसंरक्षणाचा अधिकार वापरू शकेल.”
चीनने या वक्तव्याचा तीव्र निषेध करत ताकाची यांनी विधान मागे घ्यावे अशी मागणी केली. मात्र ताकाची यांनी ठाम उत्तर दिले—
“जपानची भूमिका सुसंगत आणि स्पष्ट आहे; आम्ही ती मागे घेणार नाही.”
जपानच्या विधानानंतर बीजिंगने कठोर कारवाई करत:
या निर्बंधांचा परिणाम आता पर्यटन क्षेत्रात दिसू लागला असून लाखो चिनी पर्यटकांनी बुकिंग रद्द केली आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Reality : पाकिस्तानने हदद्च केली पार! दहशतवादासोबतच ‘हे’ काम करून जगभरातून बनले निंदेचे कारण
तैवान हा चीनच्या दृष्टिकोनातून स्वतःचा भूभाग आहे; तर जपान आणि अमेरिका त्याला स्वतंत्र सार्वभौम लोकशाही मानतात. त्यामुळे तैवानचे बदलते भू-राजकीय समीकरण हे फक्त एक वाद नव्हे, तर इंडो-पॅसिफिक शक्तिसंतुलनाचा मध्यबिंदू आहे.
Ans: अमेरिका जपानच्या बाजूने ठामपणे उभी आहे आणि सैन्य संरक्षणाची हमी दिली आहे.
Ans: तैवानवरील वक्तव्य आणि सेनकाकू बेटांवरील मालकी वादामुळे चीन–जपान संघर्ष वाढला.
Ans: आयातबंदी, प्रवास निर्बंध आणि जपानी सैनिकी तंत्रज्ञान निर्यातीवर आक्षेप.






