Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mamata Banerjee Birthday : राजकारणातील दीदी अर्थात ममता बॅनर्जी यांचा जन्मदिन; जाणून घ्या 05 जानेवारीचा इतिहास

पश्चिम बंगालच्या सीएम आणि तृणमृस कॉंग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी आपल्या आक्रमक राजकीय खेळीने राजकारणामध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 05, 2026 | 10:55 AM
West Bengal CM and Trinamool Congress leader Mamata Banerjee birthday 5th January

West Bengal CM and Trinamool Congress leader Mamata Banerjee birthday 5th January

Follow Us
Close
Follow Us:

Mamata Banerjee Birthday : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म राजधानी कोलकात्यात ५ जानेवारी १९५५ रोजी झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. ममता बॅनर्जी महाविद्यालयात असल्यापासून राजकारणात पाऊल ठेवलं. त्यांनी काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर स्वत:चा तृणमूल काँग्रेस पक्ष स्थापन केला. पश्चिम बंगालमधील डाव्यांची ३ दशकांपासूनची सत्ता उलथवून टाकत त्या मुख्यमंत्री झाल्या. विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात सक्रिय असलेल्या ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या कामाच्या, नेतृत्त्व गुणांच्या जोरावर त्यांनी राजकारणामध्ये आपली वेगळी निर्माण केली आहे.

05 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1671 : छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांकडून साल्हेर काबीज केले.
  • 1832 : दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • 1999 : द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना झाली, या पक्षाचे नंतर नाझी पक्षात रूपांतर झाले.
  • 1924 : महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य लोकांसाठी खुला केला.
  • 1933 : सॅन फ्रान्सिस्कोमध्ये गोल्डन गेट ब्रिजचे बांधकाम सुरू झाले.
  • 1949 : पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.
  • 1957 : विक्रीकर कायदा लागू झाला.
  • 1974 : अंटार्क्टिकामध्ये सर्वाधिक तापमान (15º सेल्सिअस) 15º सेल्सिअस नोंदवले गेले.
  • 1998 : ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना भारतातील कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रण क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2005 : पालोमार वेधशाळा-आधारित खगोलशास्त्रज्ञांनी एरिस हा बटू ग्रह शोधला.
  • 2022 : कझाकिस्तान, देशातील अशांतता थांबवण्यासाठी देशव्यापी आणीबाणी घोषित करण्यात आली.
हे देखील वाचा : काँक्रीटच्या जंगलातील ‘रंगीत पाहुणे’; पाहा तुमच्या बाल्कनीत येणाऱ्या पक्ष्यांचे अनोखे ‘मूड्स’ आणि रंग

05 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1592 : ‘शहाजहान’ – 5वा मुघल सम्राट यांचा जन्म. (मृत्यू : 22 जानेवारी 1666)
  • 1855 : ‘किंग कँप जिलेट’ – अमेरिकन संशोधक व उद्योजक यांचा जन्म. (मृत्यू : 9 जुलै 1932)
  • 1868 : ‘गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे’ – मराठी संतकवी यांचा जन्म.
  • 1869 : ‘व्यंकटेश तिरको कुलकर्णी’ – कन्नड साहित्यिक यांचा जन्म.
  • 1883 : ‘डोम सझतोजय’ – हंगेरी देशाचे 35वे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 22 ऑगस्ट 1946)
  • 1892 : ‘कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी’ – लेखक व मराठी भाषातज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 12 जून 1964 – मुंबई)
  • 1903 : ‘हॅरोल्ड गॅटी’ – ऑस्ट्रेलियन नेव्हिगेटर आणि विली पोस्ट यांच्यासोबत सिंगल-इंजिन मोनोप्लेन विमानातून संपूर्ण जगाची परिक्रमा करणारे पहिले व्यक्ती यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑगस्ट 1957)
  • 1913 : ‘श्रीपाद नारायण पेंडसे’ – मराठी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 24 मार्च 2007)
  • 1922 : ‘मोहम्मद उमर मुक्री’ – विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 4 सप्टेंबर 2000)
  • 1925 : ‘रमेश मंत्री’ – मराठी साहित्यिक यांचा जन्म.
  • 1928 : ‘विजय तेंडूलकर’ – मराठी साहित्यिक यांचा जन्म.
  • 1928 : ‘झुल्फिकार अली भुट्टो’ – पाकिस्तान देशाचे 4थे राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू : 4 एप्रिल 1979)
  • 1934 : ‘ मुरली मनोहर जोशी’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
  • 1941 : ‘मन्सूर अली खान पतौडी’ – भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे 9वे व शेवटचे नबाब यांचा जन्म. (मृत्यू : 22 सप्टेंबर 2011)
  • 1948 : ‘पार्थसारथी शर्मा’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 20 ऑक्टोबर 2010)
  • 1948 : ‘फय्याज’ – अभिनेत्री आणि गायिका यांचा जन्म.
  • 1955 : ‘ममता बॅनर्जी’ – पश्चिम बंगालच्या 8 व्या व पहिल्या महिला मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1972 : ‘मनीष सिसोदिया’ – दिल्लीचे उपमुख्यमंत्री, आम आदमी पार्टीचे संस्थापक यांचा जन्म.
हे देखील वाचा : स्तन कापले, मेंटली टॉर्चर केलं अन्…. भारताची पहिली महिला गुप्तहेरचा अंगावर काटा आणणारा मृत्यू

05 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1847 : ‘त्यागराज’ – कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ आणि गायक यांचे निधन.
  • 1933 : ‘काल्व्हिन कूलिज’ – अमेरिकेचे 30 वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 4 जुलै 1872)
  • 1939 : ‘अमेलिया इअरहार्ट’ – अटलांटिक महासागर एकट्याने पार करणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक यांचे निधन. (जन्म : 24 जुलै 1897)
  • 1943 : ‘जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर’ – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 1 फेब्रुवारी 1864)
  • 1952 : ‘नवाब इफ्तिखार अली खान पतौडी’ – 8वे पतौडी यांचे निधन. (जन्म : 16 मार्च 1910)
  • 1961 : ‘नारायण ताम्हनकर’ – बालसाहित्यिक यांचे निधन. (जन्म : 30 ऑगस्ट 1813)
  • 1982 : ‘रामचंद्र चितळकर’ – भारतीय संगीतकार यांचे निधन. (जन्म : 12 जानेवारी 1918)
  • 1990 : ‘रमेश बहल’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांचे निधन.
  • 1992 : ‘दत्तात्रय गणेश गोडसे’ – इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार यांचे निधन. (जन्म : 3 जुलै 1914)

Web Title: West bengal cm and trinamool congress leader mamata banerjee birthday 5th january

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 04 जानेवारीचा इतिहास
1

Dinvishesh : अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 04 जानेवारीचा इतिहास

पुरुषप्रधान समाजाला स्त्रियांच्या समानतेची…! सावित्रीबाई फुले यांचे विचार जीवनास देतील प्रेरणा, वाढेल शिकण्याची गोडी
2

पुरुषप्रधान समाजाला स्त्रियांच्या समानतेची…! सावित्रीबाई फुले यांचे विचार जीवनास देतील प्रेरणा, वाढेल शिकण्याची गोडी

स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योति सावित्रीबाई फुलेंची जयंती; जाणून घ्या 03 जानेवारीचा इतिहास
3

स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योति सावित्रीबाई फुलेंची जयंती; जाणून घ्या 03 जानेवारीचा इतिहास

थोर समाजसेवक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 02 जानेवारीचा इतिहास
4

थोर समाजसेवक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 02 जानेवारीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.