
Dinvishesh
आज १७ मे, भारताच्या इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडून गेल्या. याच इतिहासाला आपल्या ग्रंथांमधून लोकांपर्यंत पोहोचणारे प्रसिद्ध इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई यांची आज जयंती आहे. ज्यांना मराठा साम्राज्याचा इतिहासाचे सर्वोत्कृष्ट भाष्यकार म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म १७ मे १८६५ रोजी रत्नागिरी येथे झाला होता. त्यांंच्या योगदानाबद्दल त्यांना १९५७ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी लिहिलेले ग्रथं गुजराती, कन्नड, हिंदी अशा भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आले आहेत. न्यू हिस्टरी ऑफ मराठी मेन’, ‘करंटस ऑफ मराठा हिस्टरी, शालोपयोगी, बालपयोगी महाराष्ट्राचा इतिहास, यांसारखे ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. याशिवाय ज्ञानविस्तार, रत्नाकर मनोरंजन, चित्रमय जगत, सह्याद्री यांसारख्या विषयांवरही त्यांनी लेखन केले आहे.
17 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
1756 : ब्रिटनने फ्रान्सविरुद्ध युद्ध घोषित केले.
1792 : न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली.
1872 : सालबाईचा तह ब्रिटिश आणि मराठ्यांमध्ये झाला.
1940 : दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने बेल्जियममधील ब्रुसेल्स शहर ताब्यात घेतले.
1949 : राष्ट्रकुलमध्ये राहण्याचा भारताचा निर्णय.
1983 : लेबनॉन, इस्रायल आणि अमेरिका यांनी लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.
1990 : जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या मानसिक विकारांच्या यादीतून समलैंगिकता काढून टाकली.
1995 : जॅक शिराक फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष झाले.
2004 : अमेरिकेतील पहिला कायदेशीर समलिंगी विवाह झाला.
2007 : 1953 नंतर प्रथमच, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाच्या रेल्वेने एकमेकांच्या देशात प्रवेश केला.
17 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)
1749 : ‘एडवर्ड जेन्नर’ – देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर यांचा जन्म. (मृत्यू: 26 जानेवारी 1823)
1865 : ‘गोविंद सखाराम सरदेसाई’ – महाराष्ट्राचा इतिहास लिहणारे इतिहासकार रियासतकार यांचा जन्म. (मृत्यू: 29 नोव्हेंबर 1959)
1868 : ‘होरॅस डॉज’ – डॉज मोटर कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 10 डिसेंबर 1920)
1934 : ‘रॉनाल्ड वेन’ – ऍपल इन्क कंपनी चे सहसंस्थापक यांचा जन्म.
1945 : ‘भागवत चंद्रशेखर’ – लेगस्पिनर यांचा जन्म.
1951 : ‘पंकज उदास’ – गझल गायक यांचा जन्म.
1966 : ‘कुसय हुसेन’ – सद्दाम हुसेन मुलगा यांचा जन्म. (मृत्यू: 22 जुलै 2003)
1979 : ‘मुक्ता बर्वे’ – अभिनेत्री यांचा जन्म.
17 मे रोजी मृत्यू दिनविशेष
1886 : ‘जॉन डीयेर’ – डीयेर एंड कंपनीची स्थापक यांचे निधन. (जन्म: 7 फेब्रुवारी 1804)
1972 : ‘रघुनाथ कृष्ण फडके’ – शिल्पकार यांचे निधन.
1996 : ‘रुसी शेरियर मोदी’ – कसोटी क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 11 नोव्हेंबर 1924)
2012 : अमेरिकन गायिका डोना समर यांचे निधन. (जन्म: 31 डिसेंबर 1948)
2014 : द लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स चे स्थापक सी. पी. कृष्णन नायर यांचे निधन. (जन्म: 9 फेब्रुवारी 1922)