
Dinvishesh
आज, १४ मे जगाच्या इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडून गेल्या आहेत. यातीलच भारताच्या इतिहासातील एक सर्वात महत्त्वपूर्ण घटना म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म. १४ मे १६५७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी यांचा जन्म झाला होता. ज्यांनी आपल्या कर्तुत्वाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. स्वराज्य, धर्म आणि स्वाभिमानासाठी कठोर संघर्ष केला. त्यांचा पराक्रमाची कहाणी, त्यांचे धैर्य, निडरपणा आणि निष्ठा आजही अनेकांना प्रेरणा देतात. संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या पाच लाख फौजेश सलग आठ वर्षे कठोर युद्ध लढले. पण फितुरीमुळे संभाजी राजे पकडले. शत्रूच्या ताब्यात असताना त्यांना अनेक वेदनांचा सामना करावा लागला. अखेर स्वराज्यासाठी लढता लढता ११ मार्च १६८९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
14 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
1796 : इंग्लंडमधील ग्लुसेस्टर काउंटीमधील बर्कले येथील आठ वर्षांच्या जेम्स फिलिप या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली.
1900 : पॅरिसमध्ये दुसऱ्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
1940 : दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
1948 : इस्रायलच्या स्वातंत्र्याची घोषणा
1955 : सोव्हिएत रशिया, अल्बेनिया, बल्गेरिया, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रोमानिया आणि पूर्व जर्मनी या साम्यवादी राष्ट्रांमधील वीस वर्षांच्या परस्पर संरक्षणासाठी वॉर्सा करारावर पोलंडमधील वॉर्सा येथे स्वाक्षरी झाली.
1960 : एअर इंडियाने मुंबई-न्यूयॉर्क सेवा सुरू केली.
1963 : कुवेत संयुक्त राष्ट्र संघात सामील झाला.
1965 : चीनने सकाळी 7.30 वाजता दुसऱ्या अणुबॉम्बचा यशस्वी स्फोट केला.
1973 : अमेरिकेने स्कायलॅब या आपल्या अवकाशातील प्रयोगशाळेचे प्रक्षेपण केले.
1982 : ऑल इंडिया रेडिओचे आकाशवाणी असे नामकरण करण्यात आले.
1997 : देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची साखर आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कलम चारखाली नोंदणी झाली. इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी साखर कारखाना असे त्याचे नाव देण्यात आहे.
2001 : भारत आणि मलेशिया यांच्यात सात करार झाले.
2012 : अयशस्वी लँडिंग, अग्नी एअर फ्लाइट सीएचटी नेपाळमध्ये क्रॅश झाली, 15 लोक ठार झाले. यात ‘तरुणी सचदेव’ (रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार) यांचाही मृतू.
2021 : चीनने मंगळावर पहिले रोव्हर ‘झुरोंग’ यशस्वीरित्या उतरवले.
14 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)
1657 : ‘छत्रपती संभाजी महाराज’ – यांचा जन्म. (मृत्यू: 11 मार्च 1689)
1907 : ‘आयुब खान’ – फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 19 एप्रिल 1974)
1909 : ‘वसंत शिंदे’ – विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित यांचा जन्म. (मृत्यू: 4 जुलै 1999)
1923 : ‘मृणाल सेन’ – दिग्दर्शक यांचा जन्म.
1926 : ‘डॉ. इंदुताई पटवर्धन’ – आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका यांचा जन्म. (मृत्यू: 8 फेब्रुवारी 1999)
1965 : ‘सचिन खेडेकर’ – भारतीय अभिनेते यांचा जन्म.
1981 : ‘प्रणव मिस्त्री’ – भारतीय संगणक शास्त्रज्ञ यांचा जन्म.
1990 : ‘मार्क झकरबर्ग’ – फेसबुकचे सहसंस्थापक यांचा जन्म.
1998 : ‘तरुणी सचदेव’ – रसना च्या जाहिरातीतील बालकलाकार यांचा जन्म. (मृत्यू: 14 मे 2012)
14 मे रोजी मृत्यू दिनविशेष
1643 : ‘लुई (तेरावा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म: 27 सप्टेंबर 1601)
1923 : ‘चार्ल्स दि फ्रेसिने’ – फ्रांसचा पंतप्रधान यांचे निधन.
1923 : ‘सर नारायण गणेश चंदावरकर’ – कायदेपंडित, समाजसुधारक यांचे निधन. (जन्म: 2 डिसेंबर 1855)
1963 : ‘डॉ. रघू वीरा’ – भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार यांचे मोटार अपघातात निधन झाले. (जन्म: 30 डिसेंबर 1902)
1978 : ‘जगदीश चंद्र माथूर’ – नाटककार व लेखक यांचे निधन. (जन्म: 16 जुलै 1917)
1978 : ‘रॉबर्ट मेंझिस’ – ऑस्ट्रेलियाचे बारावे पंतप्रधान यांचे निधन.
1988 : ‘विलेम ड्रीस’ – नेदरलॅंड्सचा पंतप्रधान यांचे निधन.
1998 : ‘फ्रँक सिनात्रा’ – हॉलिवूड मधील अभिनेते व गायक यांचे निधन. (जन्म: 12 डिसेंबर 1915)
2000 : ‘ओबुची कीझो’ – जपानी पंतप्रधान यांचे निधन.
2012 : ‘तरुणी सचदेव’ – रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार यांचे निधन. (जन्म: 14 मे 1998)
2013 : ‘असगर अली इंजिनिअर’ – भारतीय लेखक यांचे निधन.