
Dinvishesh
महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक तेजस्वी संत आणि महान कवयित्री संत जनाबाई यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले. लहानपणीच आई-वडियांच्या मायेला पोरख्या झालेल्या जनाबाईंनी संत नामदेवांच्या दासी म्हणून राहिल्या. यामुळे त्यांची ओळख नामयाची दासी, दासी जनी म्हणून झाली होती. जनाबाईंची भक्ती केवळ देवळातली नव्हती, तर त्यांच्या कार्यात, कर्मात होती. त्याना घरकाम-करताना, पांडुरंगाचे नामस्मरण करायच्या. त्यांचे शब्द आजही वारकीर संप्रदायात अजरामर आहेत. दळिता कांडिता तुज गाईन अनंता. जनाबाईंनी हजारो अभंग रचले होते. परंतु सध्या त्यातील ३०० ते ४०० अभंगच उपब्ध आहेत. त्यांनी जातीभेद आणि स्री पुरुष समानतेच्या काळात आपल्या विठ्ठल भक्तीतून एक स्वत:ची ओळख निर्माण केली होती. त्यांची पुण्यतिथी आषाढ कृष्ण त्रयोदशीला साजरी केली जाते.
15 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
1718 : जगातील पहिल्या मशीन गनचे पेटंट जेम्स पुकल यांनी केले.
1730 : रॉबर्ट वॉलपोल युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान बनले.
1811 : पॅराग्वेला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.
1836 : सूर्यग्रहणापूर्वी दिसणारे बेलीचे मणी प्रथम शास्त्रज्ञ फ्रान्सिस बेली यांनी पाहिले.
1928 : प्लेन क्रेझी शोमध्ये मिकी माऊस कार्टून प्रथम प्रसारित झाले.
1935 : मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.
1940 : दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
1940 : सॅन बर्नार्डिनो, कॅलिफोर्निया येथे पहिले मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट उघडले.
1958 : सोव्हिएत युनियनने स्पुतनिक 3 लाँच केले.
1960 : सोव्हिएत युनियनने स्पुतनिक 4 लाँच केले.
1961 : पुण्यातील चतु:श्रृंगी पॉवर स्टेशनमध्ये झालेल्या भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला.
2000 : दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू – काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला.
15 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)
1817 : ‘देवेन्द्रनाथ टागोर’ – भारतीय तत्त्ववेत्ते आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 19 जानेवारी 1905)
1859 : ‘पिअर क्युरी’ – नोबेल पारितोषिकविजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 19 एप्रिल 1906)
1903 : ‘रामचंद्र श्रीपाद जोग’ – साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत यांचा जन्म. (मृत्यू: 21 फेब्रुवारी 1977)
1907 : ‘सुखदेव थापर’ – क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू: 23 मार्च 1931)
1967 : ‘माधुरी दिक्षीत-नेने’ – अभिनेत्री यांचा जन्म.
1988 : ‘राम पोथिनेनी’ – भारतीय फिल्म अभिनेता यांचा जन्म.
15 मे रोजी मृत्यू दिनविशेष
1350 : ‘संत जनाबाई’ – यांचे निधन.
1729 : ‘खंडेराव दाभाडे’ – मराठा साम्राज्याचे कुशल सरदार यांचे निधन.
1993 : ‘के. एम. करिअप्पा’ – स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल यांचे निधन. (जन्म: 28 जानेवारी 1899)
1994 : ‘ओम अग्रवाल’ – जागतिक हौशी स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता यांचे निधन.
1994 : चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अध्वर्यू पी. सरदार यांचे निधन.
2000 : ‘सज्जन’ – जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते यांचे निधन.
2007 : ‘जेरी फेलवेल’ – लिबर्टी विद्यापीठाचे स्थापक यांचे निधन. (जन्म: 11 ऑगस्ट 1933)
2010 : ‘भैरोंसिंह शेखावत’ – भारताचे माजी उपराष्ट्रपती यांचे निधन.
Sri Sri Ravi Shankar :आधुनिक काळातील ऋषींच्या आध्यात्मिक प्रवासाचे रहस्य काय? पहा एका क्लिकवर