Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Bicycle Day : ‘सायकलींचे शहर’ म्हणून पुण्याची ओळख नावापुरतीच? आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे चमक वाढली, पण ट्रॅक…

World Bicycle Day 2026 : आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे पुण्याची सायकलींचे शहर म्हणून ओळख बनवी आहे. परंतु, शहरातील ३५ किमी सायकल ट्रॅकपैकी केवळ ११% ट्रॅक चांगल्या स्थितीत असल्याचे ऑडिटमध्ये समोर आले.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 03, 2026 | 07:30 AM
World Bicycle Day

World Bicycle Day

Follow Us
Follow Us:
  • जागतिक सायकल दिन विशेष
  • आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे झळाळली प्रतिमा, पण सायकल ट्रॅकची अवस्था चिंताजनक
  • पुणे पुन्हा सायकलस्नेही होणार का?
World Bicycle Day 2026 : सुनयना सोनवणे : एकेकाळी ‘सायकलींचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख आज वेगाने बदलत आहे. शहराच्या विस्तारासोबत दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढली, तर सायकल दैनंदिन वाहतुकीच्या मुख्य प्रवाहातून हळूहळू बाजूला पडली. मात्र वाढती वाहतूक कोंडी, वायुप्रदूषण आणि शाश्वत वाहतुकीची गरज यामुळे सायकल पुन्हा चर्चेत आली आहे.

Navarashtra Special: ‘फुटबॉल लिली’ने बहरला विद्यापीठ परिसर; आकर्षक बहराने खुलले निसर्गसौंदर्य

पुणे हे शिक्षण आणि उद्योगांचे केंद्र म्हणून विकसित होत असताना हजारो विद्यार्थी, कामगार आणि नोकरदार सायकलवरूनच प्रवास करत होते. कमी खर्च, आरोग्यदायी जीवनशैली आणि पर्यावरणपूरक वाहतूक या कारणांमुळे सायकल शहराच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनली होती. मात्र गेल्या दोन दशकांत खासगी वाहनांची संख्या वाढल्याने सायकलचा वापर लक्षणीयरीत्या घटला.

सायकल वापराला चालना देण्यासाठी पुणे महापालिकेने विविध भागांत सायकल ट्रॅक उभारले. मात्र त्यांची सद्यस्थिती समाधानकारक नसल्याचे ‘परिसर’ संस्थेच्या सायकल ट्रॅक ऑडिट अहवालातून स्पष्ट झाले आहे. शहरातील १९ रस्त्यांवरील ३५ किलोमीटर लांबीच्या सायकल ट्रॅकची पाहणी करण्यात आली. ५०० मीटरच्या ७७ विभागांमध्ये विभागून सातत्य, सुरक्षितता आणि आरामदायीपणा या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. त्यानुसार केवळ ११ टक्के ट्रॅक चांगल्या दर्जाचे आढळले, तर ६१ टक्के ट्रॅक मध्यम आणि २८ टक्के ट्रॅक निकृष्ट श्रेणीत असल्याचे समोर आले. अतिक्रमणे, वाहनांचे पार्किंग, खराब पृष्ठभाग, तुटक मार्ग आणि अपुरी सुरक्षितता या प्रमुख समस्या असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

याच वास्तवाच्या पार्श्वभूमीवर एक सकारात्मक बाजूही समोर येत आहे. ‘पुणे सायकल ग्रँड टूर’ आणि ‘पुणे सायकल ग्रँड चॅलेंज’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे पुणे पुन्हा जागतिक सायकलिंग नकाशावर झळकले. देश-विदेशातील हजारो सायकलपटूंच्या सहभागामुळे शहराची सायकलनगरी म्हणून असलेली जुनी ओळख पुन्हा चर्चेत आली. मात्र या प्रतिमेला साजेशा दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्याचे आव्हान अद्याप कायम आहे.

एकीकडे आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धांमुळे पुण्याची सायकलनगरीची ओळख उजळत असताना, दुसरीकडे सायकल ट्रॅकची दुरवस्था शहरासमोर मोठे आव्हान म्हणून उभी आहे. सायकल हा केवळ क्रीडा किंवा छंदाचा विषय न राहता दैनंदिन वाहतुकीचा सक्षम पर्याय बनला, तरच पुणे पुन्हा खऱ्या अर्थाने ‘सायकलींचे शहर’ म्हणून ओळखले जाईल असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

परिसर सायकल ट्रॅक ऑडिटमधील प्रमुख निष्कर्ष

  • तपासलेले सायकल ट्रॅक : ३५ किमी
  • तपासलेले रस्ते : १९
  • मूल्यमापन विभाग : ७७
  • चांगल्या दर्जाचे ट्रॅक : ११%
  • मध्यम दर्जाचे ट्रॅक : ६१%
  • निकृष्ट ट्रॅक : २८%
  • प्रमुख समस्या : अतिक्रमणे, वाहनांचे पार्किंग, खराब पृष्ठभाग, अपुरी सुरक्षितता, तुटक मार्ग
  • प्रमुख शिफारस : शहरव्यापी सलग आणि सुरक्षित सायकल मार्गांचे जाळे

जागतिक सायकल दिन

दवर्षी ०३ जून रोजी जागतिक सायकल दिन साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश शाश्वत वाहतूक, आरोग्य संवर्धन आणि प्रदूषण कमी करणे असून यंदाची थीम हरित भविष्यासाठी सायकलिंग या संकल्पनेवर आधारित आहे.

Global Day Of Parents : आई-वडिलांच्या निरपेक्ष प्रेमाला वंदनाचा दिवस! जाणून घ्या का साजरा केला जातो? आणि याचा रंजक इतिहास

Web Title: World bicycle day 2026 pune losing identity as city of cycles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 07:30 AM

Topics:  

  • Marathi News
  • pune news
  • World Bicycle Day

संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral Pune Donje: नाना पाटेकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
1

Nana Patekar Funeral Pune Donje: नाना पाटेकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक
2

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही
3

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गिरीश गुरनानी यांच्यावर मोठी जबाबदारी; कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती
4

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गिरीश गुरनानी यांच्यावर मोठी जबाबदारी; कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.