Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Ukraine War : इराण युद्धाआड रशियाचा युक्रेनमध्ये कहर; ड्रोन हल्ल्यात 2 वर्षाच्या चिमुकल्यासह तीन जणांचा बळी

Russia Ukraine War Update : मध्यपूर्वेतील तणावादरम्यान रशियाचा युक्रेनमध्ये नरसंहार सुरुच आहे. रशियाने युक्रेनच्या ओडेसा शहरावर हल्ला केला असून यामध्ये २ वर्षाच्या चिमुकल्याचा बळी गेला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 06, 2026 | 06:14 PM
Russia Attack on Ukraine's Odesha City

Russia Attack on Ukraine's Odesha City

Follow Us
Follow Us:
  • इराण युद्धाचा फायदा उचलत आहे रशिया
  • युक्रेनच्या ओडेशा शहरावर भीषण हल्ला
  • २ वर्षाच्या चिमुकल्यासह तीन जणांचा मृत्यू
Russia Attack on Ukraine’s Odesa City : मॉस्को/कीव्ह : अमेरिका इराण युद्ध (US Iran War) सुरु असतानाच रशिया आणि युक्रेन संघर्षही धोकादायक वळणावर येऊन पोहचला आहे. जगाचे लक्ष मध्यपूर्वेकडे असताना रशियाचा युक्रेनमध्ये नरसंहार सुरुच आहे. सोमवारी (०६ एप्रिल २०२६) रशियाने युक्रेनच्या ओडेसा बंदर शहरावर भीषण हल्ला केला असून यामध्ये दोन महिला आणि एका २ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.

Putin-Trump मध्ये गुप्त डील? अमेरिका-NATO तणावाची युक्रेनला मोजावी लागणार किंमत; झेलेन्स्कींचा वाढलं टेन्शन

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री उशिरा झालेल्या हल्ल्यात ओडेसा शहरातील एका निवासी इमारतीला लक्ष्य करण्यात आले होते. रशियाने जोरदार ड्रोन हल्ले केल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक लोक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असून रात्रभर त्यांना बाहेर काढण्याचे कार्य सुरुच होते. यामध्ये चार व्यक्तींना सुखरुप वाचवण्यात आले आहे. परंतु या हल्ल्यात २ वर्षाच्या चिमुकलीचा आणि दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. यामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी यावर दुख व्यक्त केले आहे.

झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावर या हल्ल्यांची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियन ड्रोन हल्ल्यात ११ लोक गभीर जखमी झाले आहे. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. यामध्ये गर्भवती महिला, लहान मुलांचाही सामवेश आहे. आतापर्यंत युद्ध सुरु झाल्यापासून युक्रेनमध्ये १५,००० हून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.

युक्रेनचा पलटवार

ओडेसा शहरावरील हल्ल्याचा बदला म्हणून युक्रेनने देखील रशियाच्या नोव्होरोसिस्क बंदराला लक्ष्य केले आहे. युक्रेनने आपल्या लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनने रशियाच्या तेल निर्यातीचा कणा मानल्या जाणाऱ्या बंदरावर हल्ला केला आहे. परंतु यामध्ये कोणतेही नुकसान झाले नसल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. त्यांच्या सैन्याने युक्रेनचे ५० ड्रोन हवेतच पाडल्याचा दावा केला आहे. परंतु एक ड्रोन हल्ल्यात आठ लोक जखमी झआले आहे.

सद्य परिस्थिती

सध्या रशियन सैन्याने इराण युद्धाचा फायदा घेत युक्रेनच्या एकूण भूभागापैकी २० टक्के प्रदेशावर ताबा मिळवला आहे. नव्या शांतता चर्चेस रशियाने सहमती दिली आहे. परंतु इराण युद्धामुळे ही चर्चा लांबल्याने इकडे युक्रेनवर हल्ले सुरुच आहेत. यामुळे रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) दिवसेंदिवस हिंसक होत चालले आहे.

Russia Ukraine War : इराण युद्धाचा फायदा घेत आहे रशिया? युक्रेनमध्ये नरसंहार सुरुच; ‘या’ महत्त्वाच्या शहरावर थरारक हल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: रशियाने युक्रेनच्या कोणत्या शहरावर हल्ला केला?

    Ans: सोमवारी (०६ एप्रिल २०२६) रशियाने युक्रेनच्या ओडेसा बंदर शहरावर भीषण हल्ला केला आहे.

  • Que: रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये किती जीवितहानी झाली?

    Ans: रशियाने केलेल्या हल्ल्यात ओडेसा शहरातील एका निवासी इमारतीला लक्ष्य करण्यात आले असून यामध्ये दोन वर्षाच्या चिमुकलीसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • Que: युक्रेनने रशियाच्या हल्ल्याला कसे प्रत्युत्तर दिले?

    Ans: ओडेसा शहरावरील हल्ल्याचा बदला म्हणून युक्रेनने देखील रशियाच्या नोव्होरोसिस्क बंदराला लक्ष्य केले आहे. युक्रेनने आपल्या लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनने रशियाच्या तेल निर्यातीचा कणा मानल्या जाणाऱ्या बंदरावर हल्ला केला आहे.

Web Title: Russia ukraine war russia attack on ukraines odesa city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 06:08 PM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

Great Wall Of China : कशी फुटली चीनची सर्वात मजबूत प्रसिद्ध भिंत? 19 फूट खोल खड्ड्यामुळे चिनी सरकारने घेतला मोठा निर्णय
1

Great Wall Of China : कशी फुटली चीनची सर्वात मजबूत प्रसिद्ध भिंत? 19 फूट खोल खड्ड्यामुळे चिनी सरकारने घेतला मोठा निर्णय

North Korea POW Row : राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर दक्षिण कोरिया भडकला; सेऊलची युक्रेनकडे माफीची मागणी
2

North Korea POW Row : राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर दक्षिण कोरिया भडकला; सेऊलची युक्रेनकडे माफीची मागणी

Abraham Accords : इराणची नजर अमेरिकेवर असताना नेतान्याहू अबू धाबीत; जाणून घ्या इस्रायल आणि यूएईच्या गुप्त बैठकीचे गूढ काय?
3

Abraham Accords : इराणची नजर अमेरिकेवर असताना नेतान्याहू अबू धाबीत; जाणून घ्या इस्रायल आणि यूएईच्या गुप्त बैठकीचे गूढ काय?

AIIB Meeting : कतारमध्ये अर्थमंत्र्यांचे जोरदार स्वागत; जागतिक गुंतवणूकदार आणि 6 देशांच्या अर्थमंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका
4

AIIB Meeting : कतारमध्ये अर्थमंत्र्यांचे जोरदार स्वागत; जागतिक गुंतवणूकदार आणि 6 देशांच्या अर्थमंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.