Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Team India वर दुखापतीचे संकट! ८ महिन्यांत १० खेळाडू जखमी; BCCI बदलणार फिटनेसचे नियम?

10 indian Players Injured before ind vs sl Test: गेल्या आठ महिन्यांत जवळपास १० भारतीय खेळाडू जखमी झाल्यामुळे, बीसीसीआय आपल्या फिटनेस नियमावलीचा अंतर्गत आढावा घेत आहे. मंडळ फिटनेस मानकांमध्ये बदल करण्याचा आणि ब्रॉन्को चाचणी अधिक प्रभावीपणे लागू करण्याचाही विचार करू शकते.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 07, 2026 | 03:56 PM
Team India वर दुखापतीचे संकट! ८ महिन्यांत १० खेळाडू जखमी; BCCI बदलणार फिटनेसचे नियम?
Follow Us
Follow Us:
  • दुखापतींनी वाढवली टीम इंडियाची डोकेदुखी
  • गेल्या ८ महिन्यांमध्ये १० खेळाडू जखमी
  • फिटनेसचे नियम बदलणार का?
श्रीलंका दौऱ्यापूर्वी कर्णधार शुभमन गिलच्या दुखापतीमुळे सराव सामन्यातून बाहेर पडला. यामुळे टीम इंडियाची चिंता वाढली. कोलंबोमध्ये सरावादरम्यान गिलच्या उजव्या बोटाला दुखापत झाली. वैद्यकीय पथकाने तात्काळ त्याच्यावर आवश्यक उपचार केले. त्यानंतर तो थोड्याच वेळात नेटमध्ये परतला, पण क्षेत्ररक्षणाच्या सरावादरम्यान त्याच्या हाताला पुन्हा दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर वैद्यकीय पथकाने त्याला मैदानावर परतण्यास मनाई केली. श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशीही त्याने क्षेत्ररक्षण केले नाही.

 

गिलला झालेली दुखापत अशा वेळी झाली आहे, जेव्हा भारतीय क्रिकेटमध्ये खेळाडूंची फिटनेस आणि फिजिओथेरपिस्टच्या मुद्द्यांवरून जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या आठ महिन्यांत जवळपास १० भारतीय खेळाडू जखमी झाल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) देखील आपल्या तंदुरुस्तीच्या नियमावलीचा आढावा घेण्याची तयारी करत आहे.

Hardik Pandya चा मुंबई इंडियन्सला रामराम? २५ कोटींसह कर्णधारपदाची ऑफर; ‘या’ संघात जाणार?

गेल्या ८ महिन्यांमध्ये १० खेळाडू जखमी

गेल्या आठ महिन्यांत भारतीय संघाचे जवळपास १० खेळाडू जखमी झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह, कर्णधार शुभमन गिल, हार्दिक पांड्या आणि हर्षित राणा यांसारख्या नावांचा समावेश आहे. खेळाडूंच्या वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे फिटनेस प्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि फिटनेस सपोर्ट स्टाफ यांच्यातही याबाबतीत चर्चा झाली आहे. खेळाडूंच्या फिटनेस आणि दुखापत व्यवस्थापन प्रणालीचा बीसीसीआय अंतर्गत आढावा घेत असल्याचेही समोर आले आहे.

बीसीसीआय अॅक्शन मोडमध्ये, फिटनेसचे नियम बदलणार का?

भारतीय खेळाडूंना एकापाठोपाठ एक दुखापती झाल्यामुळे, संघाचे फिजिओ आणि फिटनेस व्यवस्था देखील तपासणीखाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दीर्घ आणि आव्हानात्मक वेळापत्रकासाठी खेळाडू तयार आहेत याची खात्री करण्यासाठी बोर्ड फिटनेस मानकांवर पुनर्विचार करू शकते. अहवालानुसार, खेळाडूंची खालावलेली फिटनेस आणि वाढत्या दुखापतींची संख्या बीसीसीआयने गांभीर्याने घेतली आहे. संघाच्या कामगिरीवर आणि खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर परिणाम करणाऱ्या घटकांची तपासणी करण्यासाठी मंडळ अंतर्गत आढावा घेत आहे. अहवालानुसार, दुखापतग्रस्त खेळाडूंसाठी फिटनेस चाचण्या पूर्वीपेक्षा अधिक कठोर केल्या जाऊ शकतात. इतकेच नाही, तर दुखापतग्रस्त खेळाडूंना फिट घोषित करण्यापूर्वी वेगवेगळ्या दिवशी दोनदा ब्रॉन्को चाचण्यांना सामोरे जावे लागू शकते.

ब्रॉन्को टेस्ट’ अद्याप लागू झालेली नाही

भारतीय संघात तंदुरुस्ती चाचणीसाठी ब्रॉन्को टेस्टबाबत चर्चा सुरू आहे. गेल्या वर्षी संघाच्या स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षकाने ही चाचणी लागू करण्याचा पुढाकार घेतला होता, परंतु त्यासाठी कोणतेही निश्चित निकष नव्हते. माहितीनुसार, ब्रॉन्को टेस्टसाठी काही निकष निश्चित करण्यात आले होते, परंतु खेळाडूंची कामगिरी लक्षात घेता त्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली. बीसीसीआयने पुरुष क्रिकेटपटूंसाठी फिटनेस चाचणीत ५.१५ ते ५.२० मिनिटांची वेळमर्यादा निश्चित केली होती, तर सीओईने दोन किलोमीटर धावण्यासाठी नऊ ते दहा मिनिटांचा वेळ निश्चित केला आहे. परंतु, ही चाचणी अद्याप पूर्णपणे लागू झालेली नाही.

R Praggnanandhaa ची विजयी चाल! एक फेरी बाकी… तरीही चॅम्पियन; सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ विजेतेपदावर कोरले नाव

Web Title: 10 players injured before ind vs sl test bcci action mode

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • bcci
  • Jasprit Bumrah
  • Shubhman Gill
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs NZ: 4 दिवसाच्या विश्रांतीने बिघडला खेळ, जसप्रीत बुमराह – शुभमन गिलचे 2 ODI मुकणार
1

IND vs NZ: 4 दिवसाच्या विश्रांतीने बिघडला खेळ, जसप्रीत बुमराह – शुभमन गिलचे 2 ODI मुकणार

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी
2

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम
3

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
4

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.