
शुभमन गिलने कर्णधार म्हणून रचला विक्रम
विराट कोहली अन् तेंडुलकरशी केली बरोबरी
केकेआरचा गुजरातवर दणदणीत विजय
Gujarat Titans In IPL 2026: काल ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात टायटन्समध्ये सामना पार पडला. केकेआरने गुजरातचा 29 रन्सने पराभव केला आहे. त्यामुळे आता पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ झाली आहे. प्लेऑफचे समीकरण कठीण झाले आहे. मात्र या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
कर्णधार शुभमन गिलने कालच्या केकेआरविरुद्ध 49 बॉलमध्ये 85 रन्स केल्या. त्यामध्ये त्याने आपल्या नावावर काही रेकॉर्ड नोंदवले आहेत. शुभमन गिलने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून एकापेक्षा जास्त हंगामात 500 पेक्षा जास्त रन्स करण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे असा विक्रम करणाऱ्या विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्या विशेष क्लबमध्ये तो सामील झाला आहे.
केकेआरविरुद्ध शुभमन गिलने 85 रन्सची कहली केली त्यानंतर आता ऑरेंज कपचे समीकरण बदलले आहे. आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गिल दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यांना या हंगामात 552 रन्स केल्या आहेत. पहिल्या क्रमाकांवर साई सुदर्शन असून, त्याने 554 रन्स केल्या आहेत.