Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांचा नाद खुळा! आंतरराष्ट्रीय Taekwondo स्पर्धेत 15 ‘सुवर्ण’ तर…; तब्बल 28 पदकांची कमाई

Taekwondo: हैदराबाद येथे झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारत, श्रीलंका, मॉरिशस, नेपाळ, झिम्बाब्वे आणि ब्राझील या सहा देशांतील तसेच भारताच्या विविध भागांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 26, 2026 | 09:24 PM
Taekwondo Competition

Taekwondo Competition

Follow Us
Follow Us:
  • जागतिक तायक्वांदो स्पर्धेत पुण्याने जिंकली 15 सुवर्ण पदके
  • आर. बी. होरांगी, सेंट फेलिक्सच्या खेळाडूंची तायक्वांदोमध्ये शानदार कामगिरी 
  • हैदराबाद येथे पार पडली खुल्या जागतिक तायक्वांदो स्पर्धा 
पुणे/Taekwondo: हैदराबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय खुल्या जागतिक तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत पुण्यातील आर. बी. होरांगी तायक्वांदो दो-जांग असोसिएशन आणि सेंट फेलिक्स हायस्कूलच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत तब्बल १५ सुवर्ण, ११ रौप्य आणि २ कांस्यपदकांची कमाई केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आयोजकांच्या वतीने आर. बी. होरांगी तायक्वांदो दो-जांग असोसिएशनला ‘सर्वोत्कृष्ट तायक्वांदो संघ’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत क्रिश केडगोनी याने पूमसे प्रकारात सुवर्णपदक, तर क्योरुगी प्रकारात रौप्यपदक मिळवले. रायन नोरोन्हा याने क्योरुगीमध्ये सुवर्ण, तर पूमसेमध्ये रौप्यपदक पटकावले. स्वराज धनमेहेर याने पूमसेमध्ये सुवर्ण आणि क्योरुगीमध्ये रौप्यपदकाची कमाई केली.नव्या विश्वकर्मा हिने वेगवान पंच आणि वेगवान किकमध्ये सुवर्णपदक, तसेच पूमसेमध्ये कांस्यपदक मिळवले. आयुषी गाडे हिने क्योरुगीमध्ये रौप्य आणि पूमसेमध्ये कांस्यपदक पटकावले. सिमांतिका पवार हिने वेगवान किकमध्ये सुवर्ण, तर पूमसे आणि वेगवान पंचमध्ये रौप्यपदक मिळवले.

युगांतिका पवार हिने पूमसे, वेगवान किक आणि वेगवान पंच या तिन्ही प्रकारांत सुवर्णपदके मिळवत विशेष कामगिरी केली. अमेर शेख हिने वेगवान पंचमध्ये सुवर्ण, वेगवान किकमध्ये रौप्य आणि पूमसेमध्ये कांस्यपदक मिळवले. दियारा नायर हिने वेगवान किकमध्ये सुवर्ण, तर पूमसेमध्ये रौप्यपदक पटकावले. मैत्रेयी बिर्जे हिने वेगवान किकमध्ये सुवर्ण, तर क्योरुगी आणि वेगवान पंचमध्ये रौप्यपदक मिळवले. क्षिराज गुट्टे याने वेगवान किक आणि वेगवान पंचमध्ये सुवर्ण, तर पूमसेमध्ये रौप्यपदक पटकावले. झारा खान हिने पूमसेमध्ये सुवर्ण, तर वेगवान पंचमध्ये रौप्यपदक मिळवले.

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम

सहा देशांतील खेळाडूंचा सहभाग

हैदराबाद येथे झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारत, श्रीलंका, मॉरिशस, नेपाळ, झिम्बाब्वे आणि ब्राझील या सहा देशांतील तसेच भारताच्या विविध भागांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेत १,१५० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. विविध देशांतील ग्रँडमास्टर्सचीही स्पर्धेला प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी दिपाली मिश्रा, सीमा पवार आणि रिझवाना शेख या पालकांनी मोलाचे सहकार्य केले.

मास्टर रवींद्र भंडारी यांचे संघ व्यवस्थापन

संपूर्ण स्पर्धेदरम्यान आर. बी. होरांगी तायक्वांदो दो-जांग असोसिएशनचे अध्यक्ष आणि तांत्रिक संचालक मास्टर रवींद्र भंडारी यांनी संघ व्यवस्थापनासह खेळाडूंच्या प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळली. समारोप समारंभात मास्टर रवींद्र भंडारी आणि संपूर्ण आर. बी. होरांगी संघाला व्यासपीठावर आमंत्रित करून त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. संघाच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना सर्वोत्कृष्ट तायक्वांदो संघांपैकी एक म्हणून गौरविण्यात आले.

आशियाई आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या लेकीने भारताच्या नावावर केली चार पदके

सेंट फेलिक्समध्ये यशस्वी खेळाडूंचा सत्कार
दरम्यान, सेंट फेलिक्स हायस्कूलच्या वतीने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या सर्व खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्रांतीय वरिष्ठ सिस्टर उर्सुला पिंटो, सिस्टर जेनिफर परेरा, शाळा व्यवस्थापक सिस्टर रोझमेरी अल्मेडा, मुख्याध्यापिका लीना पॉल, सिस्टर एल्सा, पर्यवेक्षक बेला डिसिल्वा तसेच क्रीडा शिक्षिका सोनाली राजेभोसले आणि रूपाली बनसोडे उपस्थित होत्या.

Web Title: 15 gold 11 silver and 2 bronze medals won hyderabad international taekwondo championship pune students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 09:24 PM

Topics:  

  • Hyderabad
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

‘Maharashtra Energy Expo’ मध्ये पुणेकरांचे लक्ष! जेनस इनोव्हेशनकडून ‘हाय-फ्लो हायब्रिड सोलर इन्व्हर्टर’ सादर
1

‘Maharashtra Energy Expo’ मध्ये पुणेकरांचे लक्ष! जेनस इनोव्हेशनकडून ‘हाय-फ्लो हायब्रिड सोलर इन्व्हर्टर’ सादर

Badminton कोर्टवर भारताचा डंका! आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अर्जुन रेड्डीचा आदित्य किरणवर थरारक विजय
2

Badminton कोर्टवर भारताचा डंका! आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अर्जुन रेड्डीचा आदित्य किरणवर थरारक विजय

Pune Election Department: पुण्यातील २२ लाख मतदारांवर टांगती तलवार! जिल्हा निवडणूक शाखेचा मोठा निर्णय
3

Pune Election Department: पुण्यातील २२ लाख मतदारांवर टांगती तलवार! जिल्हा निवडणूक शाखेचा मोठा निर्णय

COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार
4

COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.