तायक्वांदो स्पर्धेला भरघोस प्रतिसाद (फोटो- सोशल मिडिया)
स्नुकरचा थरार! स्कायलाईन स्ट्रायकर्सचा तिसरा, तर बदामीकर स्टार्सचा दुसरा शानदार विजय
स्पर्धेविषयी माहिती देताना सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य तथा नगरसेवक सनी निम्हण म्हणाले, “विनायकी क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून पुणे शहर आणि जिल्ह्यातील युवा खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तायक्वांदो स्पर्धेला जिल्ह्यातून तब्बल ९०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून, ही अत्यंत उत्साहवर्धक बाब आहे. खेळाडूंमध्ये शिस्त, आत्मविश्वास, जिद्द आणि खिलाडूवृत्ती निर्माण करण्यासाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.”
पुण्याचा १९ वर्षीय सार्थक चव्हाण ठरला नॅशनल चॅम्पियन! मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर ऐतिहासिक विजेतेपद!
पुणे जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या मान्यतेखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा क्युरोगी आणि पुंगसे या दोन प्रकारांमध्ये होणार आहे. यामध्ये फ्रेशर्स, सब ज्युनियर, कॅडेट, ज्युनियर आणि वरिष्ठ अशा विविध वयोगटांतील खेळाडूंचा समावेश असून, विविध वजनी गटांमध्ये सामने खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना रोख रकमेची पारितोषिके, प्रशस्तिपत्रके, करंडक आणि टी-शर्ट प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ‘बेस्ट फायटर’ पुरस्कारानेही गौरविण्यात येणार आहे.






