Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

38th India National Games : महाराष्ट्र संघाचे आदिती स्वामी, प्रतिक वाईकर ध्वजवाहक; अजित पवारांच्या हस्ते ध्वज हस्तांतरण समारंभ

डेहराडून (उत्तराखंड) येथे होणार्‍या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र संघाची सलग दुसर्‍या विजेतेपदासाठी जय्यत तयारी सुरू आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Jan 25, 2025 | 08:38 PM
38th India National Games : महाराष्ट्र संघाचे आदिती स्वामी, प्रतिक वाईकर ध्वजवाहक; अजित पवारांच्या हस्ते ध्वज हस्तांतरण समारंभ

38th India National Games : महाराष्ट्र संघाचे आदिती स्वामी, प्रतिक वाईकर ध्वजवाहक; अजित पवारांच्या हस्ते ध्वज हस्तांतरण समारंभ

Follow Us
Follow Us:

पुणे : 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची जोरदार तयारी सुरु आहे. स्पर्धेसाठी जागतिक पदक विजेती आर्चरी खेळाडू आदिती स्वामी व जगज्जेत्या भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर यांना महाराष्ट्र संघाचे ध्वजवाहक होण्याचा मान मिळाला आहे. स्पर्धेसाठी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नेहमीच वर्चस्व गाजविणारे महाराष्ट्राचे दोन्ही खो खो संघ रविवारी उत्तराखंडला रवाना होणार आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे (एमओए) महासचिव नामदेव शिरगावकर यांनी ही माहिती दिली.
38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी संजय शेटे यांची निवड
38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी संजय शेटे यांची महाराष्ट्र संघाचे पथकप्रमुख निवड करण्यात आली असून, उदय डोंगरे, सुनील पूर्णपात्रे व स्मिता शिरोळे यांची उपपथकप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात जागतिक पदक विजेती आर्चरी खेळाडू आदिती स्वामी व जागतिक विजेता खो-खो क्रीडापटू प्रतिक वाईकर हे ध्वजवाहक असणार आहेत.
शिवाजीनगर येथे होणार हस्तांतरण समारंभ
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा ध्वज सन्मानपूर्वक रविवारी 26 जानेवरीला रविवारी सकाळी 8 वाजता शिवाजीनगर येथील पोलिस मैदानात हा ध्वज हस्तांतरण समारंभ होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते पथकप्रमुख संजय शेटे यांच्याकडे ध्वज हस्तांतरित करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री उत्तराखंडच्या स्वारीवर जाणार्‍या खेळाडूंंना शुभेच्छा देतील.
महाराष्ट्राचा खो-खो संघ सर्वप्रथम रवाना
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नेहमीच वर्चस्व गाजविणारे महाराष्ट्राचे दोन्ही खो खो संघ (पुरूष व महिला) रविवारी पहाटे उत्तराखंडला रवाना होणार आहेत. ठाण्याच्या गजानन शेंगाळ याच्याकडे पुरूष खो-खो संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले असून, महिला संघाच्या नेतृत्वाची धुवा धाराशीवच्या संपदा मोरे हिच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्राचे दोन्ही खो-खो संघ गतवर्षीचे सुवर्णपदक विजेते आहेत. महाराष्ट्र खो खो संघटनेचे सचिव व महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रजीत जाधव यांच्या उपस्थितीत खेळाडूंना निरोप देण्यात आला.
क्रीडा प्रकारांत देशभरातील खेळाडू कौशल्य पणाला
38 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 28 जानेवारी 14 फेब्रुवारी या कालावधित रंगणार असून, 32 विविध क्रीडा प्रकारांत देशभरातील खेळाडू कौशल्य पणाला लावणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रातील जवळजवळ 900 पुरुष व महिला खेळाडू पदाधिकारी, मार्गदर्शक, संघव्यवस्थापक, अधिकारी व पदाधिकारी सहभागी होत आहेत. गतवर्षीच्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत अव्वल स्थानी राहिलेला महाराष्ट्राचा संघ यंदाही गतवर्षीच्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Web Title: 38th india national games maharashtra teams aditi swami pratik waikar flag bearers flag handover ceremony by ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 08:36 PM

Topics:  

  • 38th India National Games
  • ajit pawar
  • maharashtra
  • Pune

संबंधित बातम्या

Wai Mahaganpati Ghat: महागणपती घाटावर पार्किंगचा ‘खासगी’ कारभार; वाहनांच्या रांगा, पालिकेकडे अधिकृत व्यवस्थेची मागणी
1

Wai Mahaganpati Ghat: महागणपती घाटावर पार्किंगचा ‘खासगी’ कारभार; वाहनांच्या रांगा, पालिकेकडे अधिकृत व्यवस्थेची मागणी

Hingoli Earthquake: गडगडाट अन् जमीन हादरली! हिंगोलीत दोन तासांत दोन भूकंपाचे धक्के; 4.5 तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये भीती
2

Hingoli Earthquake: गडगडाट अन् जमीन हादरली! हिंगोलीत दोन तासांत दोन भूकंपाचे धक्के; 4.5 तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये भीती

MBMC Land Deal: टीडीआरमध्ये मोफत मिळालेल्या जागेसाठी २० कोटींचा मोबदला? मीरा-भाईंदर महापालिकेवर गंभीर आरोप
3

MBMC Land Deal: टीडीआरमध्ये मोफत मिळालेल्या जागेसाठी २० कोटींचा मोबदला? मीरा-भाईंदर महापालिकेवर गंभीर आरोप

Yavatmal News: प्लास्टिक कोटेड कपातून चहा! नियम असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष? महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेत स्पष्ट बंदी
4

Yavatmal News: प्लास्टिक कोटेड कपातून चहा! नियम असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष? महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेत स्पष्ट बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.