Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

38th National Games, Uttarakhand 2024-25 : टेबल टेनिसमधील महिला गटात महाराष्ट्राला रौप्य, अंतिम सामन्यात पश्चिम बंगालकडून पराभूत

38th National Games Uttarakhand 2025 : उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये महिला गटाने रौप्यपदक मिळवत मोठी कामगिरी केली.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 11, 2025 | 02:34 PM
38th National Games Uttarakhand 2024-25 Maharashtra Wins Silver in Women's Table Tennis Loses to West Bengal in Final

38th National Games Uttarakhand 2024-25 Maharashtra Wins Silver in Women's Table Tennis Loses to West Bengal in Final

Follow Us
Close
Follow Us:

देहरादून : उत्कंठापूर्ण लढतीत महाराष्ट्राला टेबल टेनिस मधील महिलांच्या सांघिक अंतिम सामन्यात पश्चिम बंगाल संघाकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांना ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अटीतटीने झालेल्या या लढतीमधील पहिल्या सामन्यात महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष हिला सुतीर्था मुखर्जी हिच्याकडून ८-११, ११-६,१२-१४,११-२, ५-११ असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर महाराष्ट्राची कर्णधार दिया चितळे हिन अहीका मुखर्जी हिच्यावर १२-१०, ११-६, ११-६ असा विजय मिळवित १-१ बरोबरीसह सामन्यातील उत्कंठा वाढविली.

तिसऱ्या सामन्यात महाराष्ट्राच्या तनिषा कोटेचा पराभूत

एकेरीच्या तिसऱ्या सामन्यात महाराष्ट्राच्या तनिषा कोटेचा हिला पोयमाती बैस्या हिच्याकडून ८-११, ७-११, ११-६, ६-११ अशी हार पत्करावी लागली. एकेरीच्या चौथ्या लढतीत महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष हिला अहिका मुखर्जी हिने ११-८, ११-६, १३-११ असे पराभूत करीत बंगालच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. महिलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने हरियाणाचा ३-० असा पराभव केला. त्यावेळी एकेरीच्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्राची कर्णधार दिया चितळे हिने स्नेहा भौमिक हिच्यावर११-३,१२-१४,११-८,१२-१० अशी मात केली शेवटच्या गेम मध्ये दोन गुणांनी पिछाडीवर असलेल्या दिया हिने टॉप स्पीन फटक्यांचा बहारदार खेळ करीत विजयश्री खेचून आणली.

महाराष्ट्राचा विजय

पाठोपाठ महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष हिने पृथ्वीकी चक्रवर्ती हिचा ११-६,११-२,११-९ असा सरळ तीन गेम्समध्ये पराभव करीत महाराष्ट्राला २-० अशी आघाडी मिळवून दिली. एकेरीच्या तिसऱ्या लढतीत महाराष्ट्राच्या तनिषा कोटेचा हिने श्रीदतरी रॉय हिला ११-६, ७-११, ११-७, ११-३, ११-६ असे पराभूत केले आणि महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तेलंगणा संघाचा 3-0 असा पराभव

पुरुष उपांत्य सामन्यात महाराष्ट्राने बलाढ्य तेलंगणा संघाला ३-० असे पराभूत करीत सनसनाटी विजय नोंदविला. त्यावेळी महाराष्ट्राकडून जश मोदी याने फ्रेडेल रिफीक याचा ११-६,११-७,११-९ असा सहज पराभव केला. त्याने काउंटर अटॅक पद्धतीचा सुरेख खेळ केला. पाठोपाठ रेगन अल्बुकर्क याने मोहंमद अली याच्यावर ११-९, ११-९, ११-६ असा सरळ गेममध्ये विजय मिळविला. तिसऱ्या लढतीत महाराष्ट्राच्या चिन्मय सोमय्या याने स्वरमेंदु सोम याला १०-१२, ११-१, ११-९, ११-३ असे पराभूत केले आणि महाराष्ट्राचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. पहिली गेम गमावल्यानंतर सोमय्या याने टॉप स्पिन फटके व प्लेसिंग याचा सुरेख खेळ करीत विजयश्री मिळविली. महाराष्ट्र संघाचे प्रमुख संजय शेटे, स्मिता शिरोळे , सुनील पूर्णपात्रे यांनी महाराष्ट्र संघास भेट देऊन प्रोत्साहन दिले.

हेही वाचा : 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25; जिम्नॉस्टिक्समध्ये महाराष्ट्राची रूपेरी कामगिरी

हेही वाचा : मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला झहीर खानने दिला इशारा, म्हणाला – ‘या गोष्टी तुम्हाला त्रास देतील’

Web Title: 38th national games uttarakhand 2024 25 maharashtra wins silver in womens table tennis loses to west bengal in final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 02:32 PM

Topics:  

  • 38th National Games
  • maharashtra
  • Silver Medal
  • West bengal

संबंधित बातम्या

Mumbai Rains Local Train Updates : मुंबईत पावसाचा हाहा:कार; मध्य आणि हार्बरची लोकल सेवा ठप्प
1

Mumbai Rains Local Train Updates : मुंबईत पावसाचा हाहा:कार; मध्य आणि हार्बरची लोकल सेवा ठप्प

CM Mamata Banerjee : बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावे, दरमहा ५ हजार देणार… ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
2

CM Mamata Banerjee : बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावे, दरमहा ५ हजार देणार… ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा

Maharashtra Rain Update: 19 ऑगस्टलाही सावधान…, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
3

Maharashtra Rain Update: 19 ऑगस्टलाही सावधान…, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Maharashtra Rain Update : नागरिकांनो सतर्क राहा! ढगफुटी अन् मुसळधार पावसाचा कहर, ‘या’ जिल्ह्यांना धोक्याचा इशारा
4

Maharashtra Rain Update : नागरिकांनो सतर्क राहा! ढगफुटी अन् मुसळधार पावसाचा कहर, ‘या’ जिल्ह्यांना धोक्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.