
जपान येथील शिमांतो सिटी मध्ये ३ ते ६ सप्टेंबरदरम्यान आंतरराष्ट्रीय पुरुष सॉफ्टबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारताच्या राष्ट्रीय संघात प्रथमच ५ महाराष्ट्राच्या खेळाडूंना वर्णी लागली असून यात जळगावच्या कल्पेश कोल्हे, प्रीतीश पाटील, सुमेध तळवेलकर, जयेश मोरे आणि नागपूरचा अभिषेक सेलोकरचा यांचा समावेश आहे.
सॉफ्टबॉल स्पर्धेचे शिबिर ७ ते १४ ऑगस्टदरम्यान विभागीय क्रीडा संकुलात पार पडले. संघ २२ ऑगस्ट रोजी दिल्लीवरून स्पर्धेस रवाना होईल. शिबिरात १४ खेळाडूंचा समावेश आहे. या शिबिराचे उद्घाटन औरंगाबादचे सहसंचालक उच्च शिक्षण सतीश देशपांडे, विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, डीएसओ चंद्रशेखर घुगे, लता लोंढे, गोकुळ तांदळे यांच्या हस्ते झाले.
असा असेल सॉफ्टबॉलचा भारतीय संघ :
कल्पेश कोल्हे, प्रीतीश पाटील, सुमेध तळवेलकर, अभिषेक सेलोकर, जयेश मोरे (महाराष्ट्र), आयुष (जम्मू-काश्मीर), परशुराम (कर्नाटक), स्टीफन राज (पुद्दुचेरी), मानस, मोहन, भूपेन, आशिष (छत्तीसगड), बिरू, मनोजकुमार (ओडिशा), राहुल तनवार (राजस्थान), संजीतकुमार (दिल्ली). प्रशिक्षक शाकेर अली (राजस्थान),अमितकुमार.