Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv : तेर जिल्हा परिषद गटातील निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप; सक्षणा सलगरांची खासदार-आमदारांवर घणाघाती टीका

Dharashiv ZP election result 2026 : राजकीय हाडवैराचा दिखावा करताना प्रत्यक्षात ‘गावकीपेक्षा भावकीला प्राधान्य देत’ भाजपाच्या अर्चना पाटील यांना विजयी करण्यासाठी नियोजनबद्ध राजकारण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 09, 2026 | 07:01 PM
तेर जिल्हा परिषद गटातील निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप; सक्षणा सलगरांची खासदार-आमदारांवर घणाघाती टीका

तेर जिल्हा परिषद गटातील निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप; सक्षणा सलगरांची खासदार-आमदारांवर घणाघाती टीका

Follow Us
Follow Us:

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : तेर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या पराभूत उमेदवार व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत जिल्ह्यातील राजकारण ढवळून काढले आहे. राजकीय हाडवैराचा दिखावा करताना प्रत्यक्षात ‘गावकीपेक्षा भावकीला प्राधान्य देत’ भाजपाच्या अर्चना पाटील यांना विजयी करण्यासाठी नियोजनबद्ध राजकारण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तेर गटाचा निकाल जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना सलगर यांनी आपली नाराजी आणि खदखद स्पष्टपणे व्यक्त केली. “तेर गटात गावच्या हिताऐवजी भावकीच्या विजयासाठी राजकारण झाले. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भावजय असलेल्या अर्चना पाटील यांना निवडून आणण्यासाठी आखलेला प्लॅन यशस्वी झाला. मी त्यांना विजयानिमित्त शुभेच्छा देते,” असे सांगत त्यांनी टोला लगावला.

‘या’ परीक्षेवेळी महिलांना मंगळसूत्र काढण्याची सक्ती; परीक्षा केंद्राबाहेर संताप, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

पुढे बोलताना सलगर यांनी आरोप केला की, “जिल्ह्यात इतर ठिकाणी महाविकास आघाडी अस्तित्वात होती. अगदी शेजारच्या गटातही आघाडी करण्यात आली; मात्र तेर गटात जाणीवपूर्वक आघाडी न करता राजकीय गणिते जुळवली गेली. आपल्या दोघांपैकी कुणालाही दुसऱ्याच्या प्रभावक्षेत्रात प्रवेश मिळू नये, यासाठी हे नियोजन करण्यात आले.”

याचवेळी त्यांनी निवडणूक प्रक्रियेवरही गंभीर आरोप केले. “तेरमध्ये निवडणुकीच्या काळात करोडो रुपयांचा ‘महापूर’ होता. रात्री बारा वाजल्यानंतर अर्चना पाटील यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचे वाटप करण्यात आले. गावातील कुठलेही सीसीटीव्ही फुटेज तपासले, तर सत्य समोर येईल,” असा दावा सलगर यांनी केला. या आरोपांमुळे तेर गटाच्या निकालानंतर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणावर संबंधित नेत्यांची भूमिका काय असते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यभरात १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांचे निकाल हाती आले. धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले असून, जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपने बाजी मारली आहे. जिल्हा परिषदेच्या 55 जागांपैकी शिवसेना शिंदे गटाला 15 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला 18 जागा मिळाल्या आहे. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाला 8 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 6 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 3 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष 4 निवडून आले आहेत. तर समाजवादी पक्षाला 1 जागा मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार पक्षाला एकही जागा मिळाली नाही.

Navi Mumbai Municipal Politics: नवी मुंबईत शिवसेना-भाजप आमनेसामने! खा. म्हस्केंनी दाखवली घोटाळ्यांची फाईल

Web Title: After the results in the teri zilla parishad group political accusations and counter accusations sakshana salgar scathing criticism of mps and mlas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra
  • ZP Election Result 2026

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
1

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
2

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?
3

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी
4

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.