Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सिक्सर किंग’चा स्वॅगच वेगळा! Abhishek Sharma ने पावरप्लेमध्ये ठोकलं षटकारांचं ‘शतक’; अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

Abhishek Sharma hit 100 Sixes in Powerplay T20I: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर अभिषेक शर्माने एक नवीन विक्रम रचला. पॉवरप्लेमध्ये १०० षटकार मारणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 24, 2026 | 09:19 PM
Abhishek Sharma

Abhishek Sharma

Follow Us
Follow Us:
  • फक्त २७ धावा, पण ऐतिहासिक कामगिरी
  • अभिषेक शर्माने T20I मध्ये केला अनोखा पराक्रम
  • पॉवरप्लेमध्ये १०० षटकार ठोकणारा पहिला फलंदाज
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी२० सामना आज क्राइस्टचर्च येथे खेळला गेला. भारताने हा सामना ४ विकेट्सने जिंकला. या विजयासह, भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्मा हा २७ धावांची खेळी करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. अभिषेक मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला असेल तरी, त्याने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. अभिषेक शर्मा आता टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पॉवरप्लेमध्ये षटकारांचे शतक पूर्ण करणारा जागतिक क्रिकेटमधील पहिला खेळाडू ठरला आहे. याशिवाय त्याने आणखी एक मोठी कामगिरी करण्यात यश मिळवले आहे. (Abhishek Sharma )

IND vs NZ: Arshdeep Singh ची भेदक गोलंदाजी! भुवनेश्वरला टाकलं मागे; T20 मध्ये पटकावला नंबर वनचा ताज

पावरप्लेमध्ये १०० षटकार ठोकणार अभिषेक पहिला फलंदाज

अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात एका नवा विक्रम आपल्या नावावर केला. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पॉवरप्लेमध्ये १०० षटकार मारणारा अभिषेक पहिला फलंदाज ठरला. न्यूझीलंडविरुद्ध आपला पहिला षटकार मारून त्याने हा टप्पा गाठला. हा पराक्रम करण्यासाठी अभिषेकने एकूण ७७६ चेंडूंचा सामना केला. अभिषेकने आतापर्यंत ६९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्यात त्याने १४७ षटकार मारण्यात यश मिळवले आहे. यापैकी १०० षटकार पहिल्या ६ षटकांमध्येच मारले आहेत.

या यादीत भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने पॉवरप्लेमध्ये एकूण ९८ षटकार मारले आहेत. यासाठी त्याने एकूण १६७२ चेंडूंचा सामना केला. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिल आहे. त्याने पॉवरप्लेमध्ये फलंदाजी करताना एकूण ९७ षटकार ठोकले आहेत.

टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू

  • अभिषेक शर्मा (भारत) – १०० षटकार
  • रोहित शर्मा (भारत) – ९८ षटकार
  • मार्टिन गुप्टिल (न्यूझीलंड) -९७ षटकार
  • पॉल स्टर्लिंग (आयर्लंड) -९४ षटकार
  • क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) -८७ षटकार

अभिषेक शर्माची टी२० कारकीर्द

अभिषेक शर्माची टी-२० आंतरराष्ट्रीय कारकीर्द शानदार राहिली आहे. त्याने ६९ सामन्यांमध्ये २१२७ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत तीन शतके आणि १४ अर्धशतकांसह एकूण १४७ षटकार ठोकले आहेत. अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली गेली. त्याने पाचपैकी एका सामन्यात अर्धशतक झळकावले, पण इतर सामन्यांमध्ये तो आपली छाप सोडू शकला नाही.

IND vs NZ: बॅटिंगमध्ये वादळ, फिल्डिंगमध्ये सुपरमॅन! Tilak Varma चा मैदानात ‘डबल धमाका’; T20I क्रिकेटमध्ये केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड

Web Title: Abhishek sharma hit 100 sixes powerplay t20i cricket breaks rohit sharma record pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 09:17 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Record

संबंधित बातम्या

IND vs NZ: Arshdeep Singh ची भेदक गोलंदाजी! भुवनेश्वरला टाकलं मागे; T20 मध्ये पटकावला नंबर वनचा ताज
1

IND vs NZ: Arshdeep Singh ची भेदक गोलंदाजी! भुवनेश्वरला टाकलं मागे; T20 मध्ये पटकावला नंबर वनचा ताज

IND vs NZ: बॅटिंगमध्ये वादळ, फिल्डिंगमध्ये सुपरमॅन! Tilak Varma चा मैदानात ‘डबल धमाका’; T20I क्रिकेटमध्ये केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड
2

IND vs NZ: बॅटिंगमध्ये वादळ, फिल्डिंगमध्ये सुपरमॅन! Tilak Varma चा मैदानात ‘डबल धमाका’; T20I क्रिकेटमध्ये केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड

IND vs NZ: १५ वर्षांच्या पोराचा मोठा पराक्रम! Vaibhav Sooryavanshi ने न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरताच मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम
3

IND vs NZ: १५ वर्षांच्या पोराचा मोठा पराक्रम! Vaibhav Sooryavanshi ने न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरताच मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

IND vs NZ 2nd T20 : किवींना धोबीपछाड! संकटमोचक ठरले तिलक-नीतीश; टीम इंडियाने थरारक अंदाजात जिंकला दुसरा T20
4

IND vs NZ 2nd T20 : किवींना धोबीपछाड! संकटमोचक ठरले तिलक-नीतीश; टीम इंडियाने थरारक अंदाजात जिंकला दुसरा T20

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.