ढोले पाटील अकादमीचा तिसरा विजय (फोटो- सोशल मिडिया0
Naushad Khan Viral Video: वडिलांची शिकवण कामी आली! नौशाद खान यांच्या लेकाने मोडला ३५ वर्षांचा विक्रम
दुसऱ्या सामन्यात ढोले पाटील क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २५ षटकांत सात गडी गमावून २२४ धावांचा भक्कम डोंगर उभारला. नुवान चांदेकर याने ४१ चेंडूंत १० चौकारांसह ५२ धावांची खेळी केली. त्याला प्रतीक राठोड याने नाबाद ५४ धावा करत मोलाची साथ दिली. प्रतीकने ३५ चेंडूंत नऊ चौकार लगावले. पार्थ निकम यानेही २४ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकारासह नाबाद ३७ धावा करत धावसंख्येत भर घातली.
२२५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना व्हिबग्योर क्रिकेट अकादमीचा डाव १९.५ षटकांत अवघ्या ७२ धावांत आटोपला. आवीर सेठी (१०) याच्याशिवाय अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. ढोले पाटीलकडून रिदान देसाई याने केवळ एका धावेच्या मोबदल्यात चार गडी बाद करत प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडले. प्रतीक राठोड यानेही २२ धावांत दोन गडी बाद केले. भेदक गोलंदाजी करणारा रिदान देसाई सामनावीर ठरला. या विजयासह ढोले पाटील अकादमीने स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.
Cricket News: प्रियांश राठोडची फटकेबाजी, विहान बोकरियाचा विकेट्सचा चौकार; सीएनए अंतिम फेरीत






