Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिसेंबरमध्ये होणार IPL 2026 चा लिलाव! अभिषेक नायरची KKR च्या मुख्य प्रशिकक्षकपदी वर्णी; रोहित शर्माबाबतही मोठी अपडेट 

डियन प्रीमियर लीगचा १९ वा हंगाम २०२६ मध्ये सुरू होणार आहे. त्यापूर्वी एक बातमी समोर आली आहे. कोलकाता नाइट रायडर्सच्या मुख्य प्रशिकक्षकपदी अभिषेक नायरची वर्णी लागली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 31, 2025 | 04:22 PM
IPL 2026 auction to be held in December! Abhishek Nair appointed as KKR head coach; Big update on Rohit Sharma too

IPL 2026 auction to be held in December! Abhishek Nair appointed as KKR head coach; Big update on Rohit Sharma too

Follow Us
Close
Follow Us:
  • डिसेंबरमध्ये आयपीएल २०२६ चा होणार लिलाव 
  • अभिषेक नायरची केकेआरच्या मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी
  • इंडियन प्रीमियर लीगचा १९ वा हंगाम २०२६ मध्ये रंगणार

Abhishek Nair appointed as KKR head coach :  इंडियन प्रीमियर लीगचा १९ वा हंगाम २०२६ मध्ये रंगणार आहे. त्यापूर्वी आयपीएलची चर्चा सुरू झाली आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामासाठी डिसेंबर २०२६ मध्ये लिलाव पार पडणार आहे. याआधी काही संघांच्या सपोर्ट स्टाफमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. आयपीएलचे तीन वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सनेही कोचिंग टीममध्ये बदल केले आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांचा आणि तीन हंगामात मुख्य प्रशिक्षकपद सांभाळणाऱ्या चंद्रकांत पंडित यांचे मार्ग वेगळे झाले होते. त्यामुळे आता कोलकाताने अभिषेक नायर या नव्या मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे.

हेही वाचा : IND vs AUS 2nd T20 : मेलबर्नमध्ये कांगारूंनी उडवली भारताची दाणादाण; ऑस्ट्रेलियासमोर १२६ धावांचे लक्ष्य; हेझलवुड चमकला

माजी क्रिकेटपटू अभिषेक नायर आता आयपीएल २०२६ पासून कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळणार आहे. अभिषेक गेल्या अनेक वर्षांपासून या संघासोबत आहे. अभिषेकला प्रशिक्षकपदाचा अनुभवही आहे. तो भारतीय संघाचाही साधारण ८ महिने सहाय्यक प्रशिक्षक होता. ४२ वर्षीय नायर गेल्या ५ वर्षांपासून कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग राहिला आहे. तो यादरम्यान भारतीय संघाचा सहाय्यक प्रशिक्षक असताना मात्र कोलकाता संघापासून दूर होता. पण सहाय्यक प्रशिक्षकपद सोडल्यानंतर तो पुन्हा आयपीएल २०२५ दरम्यान, कोलकाता संघात परतला होता. त्याने कॅरेबियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये त्रिनबॅगो नाईट रायडर्सचेही मुख्य  प्रशिक्षकपद सांभाळले आहे. नायर हा भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्माचा चांगला मित्र आहे. त्याने नुकतेच गेल्या काही महिन्यात रोहितला ११ किलो वजन कमी करण्यासाठी मदतही केली होती.

अभिषेक नायरची क्रिकेट कारकीर्द

त्याने १०३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ५७४९ धावा केल्या आणि १७३ विकेट्स घेतल्या. तसेच ९९ लिस्ट ए क्रिकेटमध्ये २१४५ धावा केल्या आहेत आणि ७९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ९५ टी२० सामने खेळले असून १२९१ धावा केल्या आहेत आणि २७विकेट्स घेतल्या आहेत. कोलकाताच्या कोचिंग टीममध्ये ड्वेन ब्रावो मेंटॉर आहे. मात्र कोलकाताला गोलंदाजी प्रशिक्षकही शोधावा लागणार आहे. कोलकाताने २०२४ मध्ये चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. मात्र आयपीएल २०२५ मध्ये संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नव्हती.

हेही वाचा : कोण आहेत Amol Muzumdar? त्यांनी भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही, पण विश्वचषक जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर

रोहित शर्मा एमआयची साथ सोडण्याच्या विचारात

इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पर्वासाठी मुंबई इंडियन्सने संघबांधणीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आयपीएल २०२५ पूर्वी पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये अंबानी यांच्या फ्रँचायझीला अपेक्षित संघ बांधता आला नाही. पण, आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या मिनी ऑक्शनसाठी एमआयने कंबर कसली आहे. पण, पुन्हा एकदा रोहित शर्मा भवती चर्चा येऊन थांबली आहे. हार्दिक पांड्याला कर्णधार केलं, तेव्हाही रोहित मुंबई इंडियन्सची साथ सोडतोय अशी चर्चा होती. आता रोहितचा खास मित्र अभिषेक नायर केकेआरचा कोच झाल्याने रोहित फ्रँचायझी बदलाची चर्चा रंगली आहे

 

Web Title: Abhishek nair appointed as kkr head coach for ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 04:22 PM

Topics:  

  • Abhishek Nair
  • IPL 2026
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

IPL 2026 : मोठी अपडेट समोर! युवराज सिंग आयपीएलमध्ये ‘या’ संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची धुरा सांभाळणार 
1

IPL 2026 : मोठी अपडेट समोर! युवराज सिंग आयपीएलमध्ये ‘या’ संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची धुरा सांभाळणार 

“जेव्हा मी टीम इंडियाचा मुख्य…”, ‘द वॉल’ राहुल द्रविडचे रोहित शर्माबद्दल मोठे विधान; वाचा सविस्तर 
2

“जेव्हा मी टीम इंडियाचा मुख्य…”, ‘द वॉल’ राहुल द्रविडचे रोहित शर्माबद्दल मोठे विधान; वाचा सविस्तर 

IND vs AUS 1st T20 : ‘सूर्यकुमार यादवने रचला इतिहास! ‘मिस्टर 360’ ची T20 मध्ये ‘या’ विक्रमात अव्वल स्थानी एंट्री 
3

IND vs AUS 1st T20 : ‘सूर्यकुमार यादवने रचला इतिहास! ‘मिस्टर 360’ ची T20 मध्ये ‘या’ विक्रमात अव्वल स्थानी एंट्री 

ICC Ranking : कर्णधार शुभमन गिलला हिटमॅनने टाकले मागे! रोहित शर्मा जगातील नंबर 1 ODI फलंदाज
4

ICC Ranking : कर्णधार शुभमन गिलला हिटमॅनने टाकले मागे! रोहित शर्मा जगातील नंबर 1 ODI फलंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.