 
        
            IND vs AUS 2nd T20 :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत अभिषेक शर्माच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने सर्वबाद १२५ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला हा सामना खिशात टाकण्यासाठी १२६ धावा कराव्या लागणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवुडने सारवधिक ३ विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या भारतीय सलामीवीर जोडीने डावाची सुरुवात केली. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शुभमन गिल ५ धावा करून माघारी गेला. त्याला हेझलवूडने बाद केले. त्यानंतर संजू सॅमसनला ४ चेंडूत २ धावा देऊन एलिसने माघारी पाठवले. तिलक वर्मा शून्यावर बाद झाला. त्यालाही हेझलवूडने बाद केले. त्यानंतर अक्षर पटेल ७ धावा करून धावबाद झाला. त्यानंतर हर्षित राणा ३३ चेंडूत ३५ धावा काढून संघांला आधार दिला.
मात्र टीम इंडियाचा स्कोअर १०० धावसंख्या ओलांडताच, बार्टलेटने एकाच षटकात भारतीय संघाला दोन धक्के दिले. प्रथम, हर्षित राणा ३५ धावांवर झेलबाद केले. त्याने अभिषेक शर्मासोबत ४७ चेंडूत ५६ धावांची चांगली भागीदारी केली. त्यानंतर शिवम दुबेला फक्त ४ धावांवर बाद केले. दरम्यान अभिषेक शर्मा एका बाजूने धावा काढत होता. त्याने चौफेर फटकेबाजी केली. परंतु, त्याला इतर फलंदाजांनकडून चांगली साथ मिळू शकली नाही. अभिषेक शर्मा १८.३ ओव्हरमध्ये बाद झाला. त्याने ३७ चेंडूत ६८ धावा केल्या. यामध्ये त्याने ८ चौकार आणि २ षटकार मारले. कुलदीप यादव ० धावा आणि जसप्रीत बुमराह ० धावा करून बाद झाले आणि वरुण चक्रवर्ती ० धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने ४ ओव्हरमध्ये १३ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर झेवियर बार्टलेट आणि नॅथन एलिसने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर मार्कस स्टोइनिसने १ विकेट घेतली.
हेही वाचा : भारताची धाकड फलंदाज अडकणार लग्नबंधनात! स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल करणार आयुष्याची नवी सुरुवात
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकिपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकिपर), मार्कस स्टोइनिस, टिम डेव्हिड, मिशेल ओवेन, जोश फिलिप, नॅथन एलिस, झेवियर बार्टलेट, मॅथ्यू कुहनेमन आणि जोश हेझलवुड.
बातमी अपडेट होत आहे…






